आचारसंहिता होणार लागू, उद्याची मंत्रीमंडळाची बैठक आजच बोलावली

आचारसंहिता होणार लागू, उद्याची मंत्रीमंडळाची बैठक आजच बोलावली

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज बोलावण्यात आली आहे. नेहमी मंत्रिमंडळाची बैठक दर आठवड्यात मंगळवारी होते. मात्र आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठीचा निवडणूक कार्यक्रम, राज्य निवडणूक आयोग आज जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू झाल्यानंतर, महत्त्वाच्या घोषणा करणं सरकारला अशक्य होईल. त्या पार्श्वभूमीवर उद्या होणारी मंत्रिमंडळ बैठक आज बोलावण्यात आली आहे.

 ठाण्यात बंदी, कल्याणमध्ये उद्धव ठाकरेच्या कार्यक्रमाला परवानगी

ठाण्यात बंदी, कल्याणमध्ये उद्धव ठाकरेच्या कार्यक्रमाला परवानगी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजच्या ठाण्यातील कार्यक्रमाला आचारसंहितेचा फटका बसला असला तरी उद्या कल्याणमध्ये  बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण  सोहळ्याचा आचारसंहितेचा अडथळा दूर झाला आहे. 

ब्रिटीश बँडच्या 'कोल्ड प्ले' आचारसंहिता लागू करावी - काँग्रेस

ब्रिटीश बँडच्या 'कोल्ड प्ले' आचारसंहिता लागू करावी - काँग्रेस

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या 'कोल्ड प्ले' या ब्रिटीश बँड कार्यक्रमासाठी आचारसंहीता लागू व्हावी या मागणीसाठी मुंबई कॉंग्रेसचं शिष्टमंडळ आज राज्य निवडणूक आयोगाला भेटलं.

आचारसंहिता झाली शिथील, कुठे कुठे पाहा

आचारसंहिता झाली शिथील, कुठे कुठे पाहा

निवडणूक आयोगाकडून आचार संहिता शिथील करण्यात आलीय. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक क्षेत्रातच आचारसंहिता लागू असणार आहे.

'आचारसंहिता' म्हणजे काय रे भाऊ?

'आचारसंहिता' म्हणजे काय रे भाऊ?

नुकताच महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा बिगूल वाजला आणि त्या क्षणापासून आचारसंहिता लागू झाली. ही आचारसंहिता पाळणं राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार आणि सरकार यांच्यासाठी बंधनकारक आहे. ही आचार संहिता काय असते, ती तोडली तर काय होतं, यासाठी कोणता कायद्याची तरतूद आहे, याचे काय परिणाम होतात असे अनेक आपल्या मनात असतात, पाहा काय आहेत ही उत्तरं?

विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा - शरद पवार

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी दोन महिने मिळणार आहेत. या कालावधीत मंत्र्यांनी जोमाने कामावे लागवे, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या मंत्र्यांना दिलेत.

ड्रीमगर्ल हेमा मालिनींविरोधात आचारसंहिता भंगचा गुन्हा

ज्येष्ठ अभिनेत्री आणि ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमा मालिनीवर आचारसंहिता भंगचा गुन्हा

मथुरामधून भाजपने उमेदवारी दिलेली बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी राज्यसभा सदस्य हेमा मालिनीवर आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसेवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

आचारसंहिता लागू असतानाही मनसेनं उमेदवाराचा प्रचार होईल अशा प्रकारे वर्तन केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मुंबईनाक्यातल्या युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष वाल्मिक मोटकरी यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल कऱण्यात आलाय.

मालमत्ता उघड करण्यास मंत्र्यांची टाळाटाळ...

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी आपली आणि आपल्या कुटुंबीयांची वार्षिक मालमत्ता जाहीर करण्याबाबत आदेश दिले होते. मात्र, बहुतांश मंत्र्यांनी आणि राज्यमंत्र्यांनी त्याला केराची टोपली दाखवलीय.

आज प्रचार तोफा थंडावणार

पालिका निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोचला आहे. आज संध्याकाळी प्रचाराची मुदत संपणार असल्यानं सर्वच पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनीही जोरदार प्रचार सुरू केला आहे. शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचता यावं यासाठी ‘रोड शो’वर उमेदवारांनी भर दिला आहे.

झेडपीच्या निवडणुकीची शाळेत दारू पार्टी !

उस्मानाबादमध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या व्यंकट गुंड या उमेदवारानं ग्रामस्थांसाठी मटण आणि दारुची पार्टी ठेवली होती. आचारसंहितेची ऐशीतैशी 'झी २४ तास'नं दाखवल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.

भुजबळांविरोधात आचारसंहिताभंगाची तक्रार दाखल

भुजबळ फाऊण्डेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नाशिक फेस्टिवलसंदर्भात ही तक्रार दाखल झाली आहे. नाशिकमध्ये आचारसंहिताभंगाचे अनेक प्रकार घडत असतानाही निवडणूक आय़ोग उदासीनच असल्याचा आरोप होत आहे.

निवडणूक आयोगाची भीती कमी ?

आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते आणि राज्यमंत्री गावीत यांनी केलेल्या आचारसंहिता उल्लंघनाची अजून निवडणूक आयोग चौकशी करत आहे. दीड आठवडा उलटूनही निवडणूक आयोगाची स्वतःची निरीक्षण यंत्रणा राबवण्यात आली नसल्यानं नाशिकमध्ये राजकारण्यांचा रामभरोसे कारभार सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

मुस्लिम आरक्षणाला स्थगिती

निवडणूक आयोगानं केंद्र सरकारच्या मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या निर्णयावर स्थगिती दिली आहे. पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत या निर्णयावर स्थगिती देण्यात आली आहे.

‘शिव वडापाव’ही झाका - नीतेश राणे

उत्तर प्रदेशात ज्या पद्धतीने मायावतींचे निवडणूक चिन्ह असलेल्या हत्तींना झाकण्याची कारवाई करण्यात आली, त्याच धर्तीवर शिवसेनेच्य ‘शिववडा या वडापावच्या गाड्यांवरील नावांवरही स्टिकर्स लावण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

पाचपुतेंनी केला आचारसंहितेचा भंग?

आचारसंहिता आहे हे माहित असूनही आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुतेंनी नाशिकमध्ये घोषणांचा पाऊस पाडला. विशेष म्हणजे राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांनीही त्यांचीच री ओढली.

मुंबईत निवडणूक आचारसंहिता आजपासून?

मुंबई महानगरपालिका निवडणुका येत्या फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे, महापालिका निवडणूकांच्या तारखा आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात येईल. तर त्यामुळे मुंबई पालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे आहे.