राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून पैशाचे वाटप

कल्याणमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या डोंबिवली एमआयडीसीतल्या ऑफिससमोर राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांना पैसे वाटताना ताब्यात घेण्यात आलंय. सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. या कार्यकर्त्यांकडून १ लाख २१ हजार रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केलीय.

शिवसेना पक्षनेतृत्वाला विचार करण्याची गरज -शरद पवार

ज्या पक्षाचे खासदार पक्ष सोडू जातात त्या पक्षनेतृत्वाला विचार करण्याची गरज असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केलीय. डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपेंच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या पक्षनेतृत्वावर प्रश्न उपस्थित केलाय.

कल्याणमध्येही सरकते जिने सुरू!

कल्याण स्टेशनमध्ये आज सरकत्या जिन्याचं उद्घाटन करण्यात आलं. ठाणे जिल्ह्यातला हा तिसरा सरकता जिना आहे. यापूर्वी ठाणे आणि डोंबिवलीत हे सरकते जिने सुरू करण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचं उपोषण साधणार काय?

ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंटचा मुद्दा शिगेला

राजकीय पक्षांची स्टंटबाजी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचं उपोषण, नगरसेवकही बसले उपोषणाला

काही ठिकाणी फोडल्या बसगाड्या..

डोंबिवली - ठाणे खाडी पुलाला अजून परवानगीच नाही!

डोंबिवली - ठाणे खाडी पुलाला कोणतीही परवानगी दिलेली नसल्याचं एमएमआरडीएनं स्पष्ट केलं आहे. या प्रकल्पाबाबत केवळ चर्चा सुरू असल्याचं एमएमआरडीनं म्हटलंय.

डोंबिवली-ठाण्यामध्ये पूल, आता रस्ता फक्त २० मिनिटांचा!

डोंबिवली आणि ठाणेकरांसाठी गूड न्यूज आहे. डोंबिवली पश्चिमेतल्या खाडी किना-याहून ठाण्यात जाणा-या माणकोलीला जोडणा-या 200 कोटींच्या प्रकल्पाला मंजूर मिळाली आहे.

'विटावा सबवे'साठी परांजपे- आव्हाडांमध्ये हेवेदावे

ठाण्यातल्या विटावामधल्या सबवेचं गेल्या वर्षापासून काम सुरू आहे. शिवसेना खासदार आनंद परांजपे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड या सबवेच्या ठिकाणी पोहोचले. आणि अचानक नारळ फोडून या मार्गाचं उद्घाटन केलं.

आनंद परांजपे यांची खासदारकी धोक्यात

शिवसेना खासदार आनंद परांजपे यांची खासदारकी धोक्यात आली आहे. परांजपेंची खासदारकी रद्द करण्याची याचिका शिवसेनेच्या वतीने लोकसभाध्यक्षा मीराकुमार यांच्याकडे दाखल करण्यात आली आहे.

आनंद परांजपेंची पुन्हा शिवसेनेवर टीका

शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले खासदार आनंद परांजपे यांनी ठाण्यात मतदान केलं. यावेळीही त्यांनी शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडली नाही. मला शिवसेनेनं प्रचारासाठी बोलावलं नाही असा आरोप त्यांनी सेनेवर केला.

उल्हासनगरमध्ये 'आनंद'

उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला गेलेल्या राष्ट्रवादीच्या ज्योती कलानींसोबत खासदार आनंद परांजपेंनीही हजेरी लावल्यामुळे वातावरणात एक वेगळाच रंग भरला होता.

आनंद शिवसेनेत मावेना रं मावेना....

ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीच्या फोडाफोडी फोडीच्या राजकारणात शरद पवार यांनी आज शिवसेनेला जबरदस्त झटका दिला आहे. कल्याण डोंबिवलीचे आमदार आनंद परांजपे आज शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत नाट्यमयरित्या दाखल झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

खा.परांजपेंची राज ठाकरेंनी केली कोंडी

शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे मनसेत यायला उत्सुक होते, या मनसे आमदार राम कदम यांच्या गौप्यस्फोटाला राज ठाकरेंनीही दुजोरा दिलाय.