वाहतुकीचा खेळखंडोबा

 

 

 ====================================================================================

आसनगाव – कसारा वाहतूक बंद, एक्सप्रेस गाड्या रद्द

गोंदिया विदर्भ एक्‍सप्रेसला झालेल्‍या अपघातानंतर मध्‍य रेल्‍वेची वाहतूक आसनगाव ते कसारा या स्‍थानकांदरम्‍यान पूर्णपणे ठप्‍प झाली आहे. ही वाहतूक आज सायंकाळपर्यंत बंदच राहणार आहे. तर लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अन्य गाड्यांच्या मार्गात बदल कऱण्यात आला आहे.