आसाराम बापू

आसाराम बापुला सुप्रीम कोर्टाचा दणका

आसाराम बापुला सुप्रीम कोर्टाचा दणका

आसाराम बापू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला फटकारलं आहे. सुप्रीम कोर्टाने आसाराम बापुंच्या अडचणी वाढवल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने आसाराम बापुंना जामीन देण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की, प्रकरणाची ट्रायल खूपच हळू सुरु आहे. त्यामुळे त्यांना जामीन नाही देता येणार. कोर्टाने आसाराम बापुंना जामीन देण्यास साफ नकार दिला आहे आणि पुढील सुनावणी दिवाळीच्या पुढे ढकलली आहे.

Aug 28, 2017, 03:16 PM IST
व्हिडिओ: राम रहीम, आसाराम बापू आणि बाबा रामपाल जेव्हा एकत्र लावतात ठूमके

व्हिडिओ: राम रहीम, आसाराम बापू आणि बाबा रामपाल जेव्हा एकत्र लावतात ठूमके

लोकही मोठे चतूर आसतात. घटना कोणतीही असो, त्यात त्यांना विनोद सूचतो. बाबा राम रहीम प्रकरणातही लोकांनी विनोद शोधला. बाबा राम रहीम, आसाराम बापू आणि आणखी एक बाबा रामपाल या त्रिकूटांचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. ज्यात 'जेल करावेगी छोरी, जेल करावेगी', गाण्यावर हे त्रिकूट ठूमके लावताना दिसत आहे.

Aug 27, 2017, 01:15 PM IST
सलमानमुळे आसारामच्याही आशा पल्लवीत...

सलमानमुळे आसारामच्याही आशा पल्लवीत...

कोर्टानं सलमान खानला निर्दोष जाहीर केल्यानंतर लैंगिक अत्याचार प्रकरणात सध्या तुरुंगाची हवा खात असलेल्या आसारामच्याही आशा पल्लवीत झाल्यात. 

Jan 24, 2017, 11:10 AM IST
आसाराम बापूचा आचरटपणा सुरुच

आसाराम बापूचा आचरटपणा सुरुच

अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून आसाराम बापू तिहार जेलमध्ये आहे.

Sep 25, 2016, 07:57 PM IST
आसाराम बापूकडे २३०० कोटींची अघोषित मालमत्ता

आसाराम बापूकडे २३०० कोटींची अघोषित मालमत्ता

प्राप्तिकर विभागाच्या चौकशीत, स्वयंघोषित धर्मगुरु आसाराम बापू याच्याकडे तब्बल २३०० कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे त्याच्या धर्मादाय संस्थांना दिल्या जाणाऱ्या करसवलती मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. देशातील धर्मादाय संस्थांना प्राप्तिकर नियम 80 जीनुसार सवलत दिली जाते.

Jun 22, 2016, 05:45 PM IST
आसारामचे भक्त पोलिसांना नडले

आसारामचे भक्त पोलिसांना नडले

आसाराम बापू्च्या भक्तांनी नवी दिल्लीतल्या पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनबाहेर हिंसक आंदोलन केलं.

May 16, 2016, 09:51 PM IST
 शार्पशूटरचा खुलासा, साक्षीदारांना मारल्यानंतर आवडलेली साधिका देत होते आसाराम

शार्पशूटरचा खुलासा, साक्षीदारांना मारल्यानंतर आवडलेली साधिका देत होते आसाराम

 अल्पवयीन मुलीवर रेप प्रकरणार जेलमध्ये असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी वाढताना दिसत आहे. 

Mar 16, 2016, 06:56 PM IST
सलमानप्रमाणेच माझीही सुटका होईल : आसाराम बापू

सलमानप्रमाणेच माझीही सुटका होईल : आसाराम बापू

'हिट अँड रन' प्रकरणात अभिनेता सलमान खानला उच्च न्यायालयाने आरोपातून निर्दोष मुक्त केल्यानंतर आसाराम बापूंनाही आपली सुटका होईल अशी आशा वाटतेय. सलमानप्रमाणेच आपलीही सुटका होईल असे आसाराम यांनी शनिवारी सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाने २००२मधील हिट अँड रन प्रकरणात सलमानची मुक्तता केली.

Dec 13, 2015, 09:21 AM IST
छत्तीसगढ इथं शाळेत वाटले आसाराम बापूच्या सेक्स टिप्सचे पुस्तकं

छत्तीसगढ इथं शाळेत वाटले आसाराम बापूच्या सेक्स टिप्सचे पुस्तकं

'दिव्य प्रेरणा प्रकाश ज्ञान परीक्षे'साठी आसाराम बापू समर्थकांनी शाळांमध्ये जे पुस्तकं वाटले, त्यात सेक्स एज्युकेशनच्या नावावर आक्षेपार्ह बाबी लिहिल्या आहेत. सरकारनं ही परीक्षा रद्द केलीय. मात्र हे पुस्तकं उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी वाचत आहेत.

Oct 6, 2015, 01:15 PM IST
आसाराम जेलमध्ये करतात रोज फूल बॉडी मसाज

आसाराम जेलमध्ये करतात रोज फूल बॉडी मसाज

लैंगिक शोषणच्या आरोपात अटक झालेले आसाराम बापू यांनना जोधपूरमध्ये एकदम व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत आहे. आसाराम यांच्यावर आश्रमातील १५ वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. सूत्रांच्या हवाल्याने एका बातमीत म्हटले आहे की, आसाराम यांना जेलमध्ये कोणतीच अडचण नाही. जेलमध्ये ते देखील ऐशो-आरामात राहत आहेत. 

Sep 4, 2015, 03:23 PM IST
आसाराम प्रकरणातील प्रमुख साक्षीदार कृपाल सिंहचा मृत्यू

आसाराम प्रकरणातील प्रमुख साक्षीदार कृपाल सिंहचा मृत्यू

आध्यात्मिक गुरू आसारामबापू यांच्यावरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख साक्षीदार कृपाल सिंहवर शुक्रवारी रात्री गोळ्या घालून ठार मारण्यात आलंय. या खटल्यातील नऊ साक्षीदारांवर आतापर्यंत हल्ला झाला असून, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला.

Jul 12, 2015, 08:43 AM IST
आसाराम बापूच्या मुलाला जामीन मंजूर

आसाराम बापूच्या मुलाला जामीन मंजूर

बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याला गुजरात हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय. 

Apr 16, 2015, 08:01 PM IST
बलात्काराचा आरोप असणाऱ्या कैद्यावर गहमंत्र्यांची स्तुतीसुमनं...

बलात्काराचा आरोप असणाऱ्या कैद्यावर गहमंत्र्यांची स्तुतीसुमनं...

गृहमंत्री राजनाथ सिंह आणि विश्व परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल सध्या वादात अडकलेत. १६ वर्षांच्या तरुणीवर बलात्काराच्या प्रकरणात सध्या तुरुंगात बंद असलेल्या आसारामवर कौतुकाचा वर्षाव केल्यानं सिंह आणि सिंघल यांच्यावर अनेकांनी टीका केलीय. 

Feb 24, 2015, 09:53 PM IST
आसाराम बापू खटल्यातील महत्वाच्या साक्षीदाराची हत्या

आसाराम बापू खटल्यातील महत्वाच्या साक्षीदाराची हत्या

अखिल गुप्ता या आसाराम खटल्यातील महत्वाच्या साक्षीदाराची हत्या करण्यात आली आहे. अखिल गुप्ता यांच्यावर मुजफ्फरनगरमधील नवी मंडी परिसरात गोळी घालून हत्या करण्यात आली. 

Jan 12, 2015, 12:29 PM IST

अॅसिड हल्ला : पुण्याच्या 'त्या' तरुणाला अटक

सध्या तुरुंगात असलेला कथित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू आणि त्याचा पुत्र नारायण साई यांच्या विरोधात साक्ष देणाऱ्या व्यक्तींना काही अज्ञातांकडून लक्ष्य केलं जातंय.

Mar 18, 2014, 04:14 PM IST