हैदराबाद बॉम्बस्फोटप्रकरणी यासीन भटकळला फाशीची शिक्षा

हैदराबाद बॉम्बस्फोटप्रकरणी यासीन भटकळला फाशीची शिक्षा

हैदराबादमधल्या दिलसुखनगरच्या बॉम्बस्फोटप्रकरणी यासीन भटकळला एनआयए कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली आहे.

दहशतवादी यासिन भटकळ कारागृहातून  पळण्याच्या तयारीत

दहशतवादी यासिन भटकळ कारागृहातून पळण्याच्या तयारीत

भारतविरोधी कारवाया करणाऱ्या इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या यासिन भटकळ कारागृहातून  पळण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. 

मुंबई पोलिसांना मुजाहिद्दीनचं धमकीचं पत्र, शहरात हाय अलर्ट

मुंबई पोलिसांना मुजाहिद्दीनचं धमकीचं पत्र, शहरात हाय अलर्ट

मुंबई पोलिसांना एक धमकीचं पत्र मिळालंय. हे धमकीचं पत्र इंडियन मुजाहिद्दीनच्या नावानं आलंय. आलेल्या धमकीच्या पत्रामुळं मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आलंय. 

इंडियन मुजाहिद्दीनच्या टार्गेटवर पुणे

इंडियन मुजाहिद्दीनच्या टार्गेटवर पुणे

पुण्यात झालेल्या स्फोटासाठी  वापरण्यात आलेली मो़डस ऑपरेंडी पाहता यात इंडियन मुजाहिद्दीनच्या नवीन स्लीपर सेलचा हाथ असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असल्याचं एटीएसच्या एका वरिष्ठ अधिका-यांनं सांगितलंय. 

पुण्यातला स्फोट, बॉम्बस्फोटच! - एटीएसला संशय

पुण्यातला स्फोट, बॉम्बस्फोटच! - एटीएसला संशय

पुण्यात फरासखाना पोलीस स्टेशनजवळच्या पार्किंगमध्ये झालेला स्फोट बॉम्बस्फोटच असल्याचा संशय एटीएसनं व्यक्त केलाय. त्यामुळं दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा पुण्याला लक्ष्य केल्याचं यानिमित्तानं उघड झालंय.

मोदींवर हल्ल्यासाठी दहशतवादी तयार

इंडियन मुजाहिद्दीन आणि `सिमी`या दहशतवादी संघटनांकडून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना धोका निर्माण झाला आहे.

इंडियन मुजाहिद्दीनच्या ४ दहशतवाद्यांना जोधपूरमध्ये पकडलं

दिल्ली एटीएस आणि जयपूर पोलिसांच्या पथकानं दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला असून इंडियन मुजाहिद्दीनच्या ४ दहशतवाद्यांना अटक केलीय. मुंबईच्या झवेरी बाजार आणि हैदराबादच्या दिलसुखनगरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात हात असलेल्यांसह इंडियन मुजाहिदीनच्या चार दहशतवाद्यांना जोधपूर इथं पकडण्यात आलं.

भटकळच्या सुटकेसाठी नेत्यांच्या अपहरणाचा डाव

२०१४ च्या लोकसभा निडवणुकांवर दहशतवादाचं सावट दिसून येतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत सगळ्या पोलीस उपायुक्तांना एक अलर्ट जारी करण्यात आलाय.

यासिन भटकळ आता महाराष्ट्र एटीएसच्या कस्टडीत

इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य यासिन भटकळची महाराष्ट्र एटीएसनं कस्टडी घेतलीये. २८ ऑगस्ट २०१३ला यासिनला इंडो-नेपाळ सीमेवरुन अटक करण्यात आली होती. त्यानंतर दिल्ली पोलीस, हैद्राबाद पोलीस आणि आता महाराष्ट्र एटीएसनं यासीन भटकळची कस्टडी घेतलीये.

भटकळच्या सुटकेसाठी अरविंद केजरीवालांच्या अपहरणाचा कट

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धोका असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिलीय. केजरीवाल यांचं अपहरण होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय. पोलिसांच्या अटकेत असलेला दहशतवादी यासिन भटकळच्या सुटकेसाठी हा अपहरणाचा कट रचला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय.

बोधगया बॉम्बस्फोटाचा तपास लावण्यात एनआयएला यश

बोधगया इथं झालेल्या १० साखळी बॉम्बस्फोटांचा तपास लावण्यात एनआयएला यश आलंय. या स्फोटांमागं इंडियन मुजाहिदीनच्या रांची मॉडेलचा हात असल्याचं एनआयएनं स्पष्ट केलंय.

कसं झालं पाटणा बॉम्बस्फोटाचं प्लानिंग?

पाटण्यामध्ये नरेंद्र मोदींच्या झालेल्या सभेच्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय. स्फोटासाठी अनेक दिवसांपासून प्लानिंग सुरू असल्याचं मिळालेल्या पुराव्यांवरून स्पष्ट होतंय.

पाटणा स्फोट: १३ संशयीत ताब्यात, इंडियन मुजाहिद्दीनवर संशय

नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅलीआधी पाटणामध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा हात असल्याचा संशय आहे.

पोलिसांना चकवा देऊन ‘आयएम’चा दहशतवादी फरार

मुंबई सेशन्स कोर्टात आज एक धक्कादायक घटना घडलीय. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा अफजल उस्मानी हा दहशतवादी फरार झालाय.

`भारतात उपस्थित ४० दहशतवाद्यांचा विमान अपरणाचा कट`

सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या देशात इंडियन मुजाहिद्दीनचे ३०-४० दहशतवादी उपस्थित असल्याचं भटकळनं कबूल केलंय.

भटकळला कसाब फाशीचा घ्यायचा होता बदला!

इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या यासिन भटकळच्या अटकेनंतर काही महत्त्वाची माहिती उघड झालीय. कसाबच्या फाशीच्या बदला घेण्याचा भटकळचा इरादा होता. त्यासाठी सणांच्या काळात विविध ठिकाणी मोठे स्फोट करण्याचा त्याचा प्लॅन होता. मात्र बुद्धगयेत स्फोट अपयशी झाल्यामुळे भटकळवर आयएसआय नाराज होतं, अशी माहिती सध्या हाती आली आहे.

`इंडियन मुजाहिद्दीन`चा म्होरक्या यासिन भटकळ अटकेत!

कुख्यात दहशतवादी यासीन भटकळ याला नेपाळमध्ये अटक करण्यात आलीय. एनआयएच्या टीमनं नेपाळमधून त्याला अटक केलीय.

पुढचं टार्गेट ‘मुंबई’ – इंडियन मुजाहिद्दीन

बिहारच्या बोधगयास्थित महाबोधी मंदिरात रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी ‘इंडियन मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेनं स्विकारलीय.

बोधगया बॉम्बस्फोट : सीसीटीव्ही फुटेज जाहीर

बुद्धगयामधील स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध करण्यात आलंय. बिहार पोलीसांनी हे फुटेज प्रसिद्ध झालंय.

इंडियन मुजाहिद्दीनच्या हिटलिस्टवर पुणे

दहशतवाद्यांनी पुण्याकडे मोर्चा वळवलाय. त्यामुळे पुण्यातलं येरवडा जेल आणि कोर्टाची इमारत इंडियन मुजाहिद्दीनच्या टार्गेटवर असल्याचं समोर आलंय.

मुकेश अंबानींना दहशतवाद्यांची धमकी

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसोबत मैत्री वाढविली, तसेच गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरुच ठेवली तर ठार करू, असं धमकीचं पत्र रिलायन्स इंडस्ट्रिजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना आले आहे.