राज ठाकरेंच्या उपस्थित उपरकरांचा `मनसे` प्रवेश

शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय. उपरकर उद्या मनसेत प्रवेश करणार आहेत. खेडमधील मनसेच्या जाहीर सभेत राज ठाकरेंच्या उपस्थितीत उपरकर प्रवेश करणार आहेत.

राजसाठीही `उपरे`च राहिले उपरकर...

शिवसेनेला राम-राम ठोकल्यानंतर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी ‘मनसे’ राज ठाकरेंच्या बाजुला उभं राहण्याची तयारी दाखवली. मात्र, राज ठाकरेंनी उपरकर यांना ‘उपरे’ असं संबोधत त्यांच्या पक्षात पाऊल ठेवण्याच्या इच्छेला लाल निशाण दाखवलाय.