रत्नागिरीत भाजप राष्ट्रवादीला मोठा धक्का देणार?

रत्नागिरीत भाजप राष्ट्रवादीला मोठा धक्का देणार?

रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष शिगेला पोहोचलाय. नाराज असलेल्या भास्कर जाधवांनी आपल्या संतापाला मोकळी वाट करून दिलीय तर रमेश कदम यांनी जाधवांवर तोफ डागलीय. दुसरीकडे दोघांच्या भांडणात राजकीय लोणी खाण्यासाठी भाजपा टपून बसल्याचीही चर्चा आहे. 

अकोल्यात बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर अपक्षांना भाव चढणार?

अकोल्यात बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर अपक्षांना भाव चढणार?

अकोला जिल्ह्यात पाच नगरपालिकांमध्ये निवडणुकीचा ज्वर चढायला सुरुवात झालीय.

रत्नागिरीत शिवसेनेचे 15 उमेदवार तर राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर

रत्नागिरीत शिवसेनेचे 15 उमेदवार तर राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर

 रत्नागिरी नगर परिषदेसाठी शिवसेनेने आपली 15 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, नगराध्यपदाचा उमेदावर जाहीर केलेला नाही. तर राष्ट्रवादीने उमेश शेट्ये यांना थेट नगराध्यपक्षासाठी उमेदवार जाहीर केलेय.

निलंग्याचे नागरिक आजोबा-नातवातल्या युद्धाला कंटाळले?

निलंग्याचे नागरिक आजोबा-नातवातल्या युद्धाला कंटाळले?

जिल्ह्यातल्या चार नगरपालिकांपैकी निलंगा नगरपालिकेचा रणसंग्राम चांगलाच रंगणार अशी चिन्ह आहेत. 

लातूरवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा वरचष्मा कायम राहणार?

लातूरवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा वरचष्मा कायम राहणार?

जिल्ह्यातल्या 4 नगरपालिकांच्या निवडणुका येत्या 14 डिसेंबरला होत आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी कंबर कसलीय.

विधान परिषद निवडणूक : काँग्रेस - राष्ट्रवादीत तिढा कायम

विधान परिषद निवडणूक : काँग्रेस - राष्ट्रवादीत तिढा कायम

विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपाचा काँग्रेस- राष्ट्रवादीमधील तिढा सुटायला तयार नाही. 

पंढरपूर पालिकेवर परिचारक की भालकेंचे वर्चस्व

पंढरपूर पालिकेवर परिचारक की भालकेंचे वर्चस्व

नगरपालिकांचा रणसंग्राममध्ये सोलापूर जिल्ह्यातली सर्वात मोठी नगरपालिका... सध्या पंढरपूर नगरपालिकेत विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांची नगरविकास आघाडी तर भारत भालके यांची तीर्थक्षेत्र विकास आघाडी आहे.

नगरपालिका रणसंग्राम : सोलापुरात काँग्रेस गड राखणार का?

नगरपालिका रणसंग्राम : सोलापुरात काँग्रेस गड राखणार का?

नगरपालिकांचा रणसंग्राममध्ये झी 24 तास आज घेऊन आलाय सोलापूर जिल्ह्यातला रणसंग्राम... काँग्रेस याठिकाणी आपलं वर्चस्व टिकवतं? की, राष्ट्रवादी किंवा भाजप बाजी मारतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारेय. 

मोदींचा अश्वमेध रोखण्यासाठी काँग्रेसचं 'प्रियांका'स्त्र

मोदींचा अश्वमेध रोखण्यासाठी काँग्रेसचं 'प्रियांका'स्त्र

प्रियांका गांधी या पहिल्यांदाच काँग्रेसच्या अधिकृत बैठकीला उपस्थित राहिल्या आहेत.

फडणवीस हे देशातील 'नवे सेन्सॉर बोर्ड': कॉंग्रेस

फडणवीस हे देशातील 'नवे सेन्सॉर बोर्ड': कॉंग्रेस

कॉंग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ते आता देशाचे 'नवे सेन्सॉर बोर्ड' झाले असल्याची टीका केली आहे. 

मुख्यमंत्री - मनसेमध्ये तोडपाणी झाल्याचा काँग्रेसचा आरोप

मुख्यमंत्री - मनसेमध्ये तोडपाणी झाल्याचा काँग्रेसचा आरोप

'ऐ दिल है मुश्कील सिनेमाच्या रिलीजप्रकरणी मुख्यमंत्री आणि मनसेमध्ये तोडपाणी झाल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.

भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेल तर नाना पटोलेंची प्रतिष्ठापणाला

भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेल तर नाना पटोलेंची प्रतिष्ठापणाला

 जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल तर भाजप खासदार नाना पटोलेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय. भंडारा म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादीला झटका दिला. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत आता चुरस निर्माण झालीय.

तुमसर नगर परिषदेमधील राष्ट्रवादी सत्ता कायम राखणार का?

तुमसर नगर परिषदेमधील राष्ट्रवादी सत्ता कायम राखणार का?

जिल्ह्यातल्या तुमसर नगर परिषदेत सद्यस्थितीत राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र यावेळी भाजप बाजी मारणार का? याची उत्सुकता आहे.  

वर्ध्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चुरस

वर्ध्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चुरस

जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे दोन-दोन नगरपालिका आहे. मात्र यंदा सर्वच ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागलेत. 

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला धक्का, रिता बहुगुणा जोशी भाजपमध्ये

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला धक्का, रिता बहुगुणा जोशी भाजपमध्ये

उत्तर प्रदेश निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशमधल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रीता बहुगुणा जोशींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  

राष्ट्रवादीच्या पूर्व विदर्भ गडात भाजपची सत्ता, पटेल-बडोलेंची प्रतिष्ठा पणाला

राष्ट्रवादीच्या पूर्व विदर्भ गडात भाजपची सत्ता, पटेल-बडोलेंची प्रतिष्ठा पणाला

 गोंदिया हा राष्ट्रवादीचा गड समजला जात असला तरी सध्या इथं भाजपची सत्ता आहे. प्रफुल्ल पटेल आणि राजकुमार बडोलेंची प्रतिष्ठा याठिकाणी पणाला लागलीय. 

तिरोडा नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला कोण शह देणार?

तिरोडा नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला कोण शह देणार?

जिल्ह्यातील तिरोडा नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी आपली सत्ता कायम राखणार का, याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच याठिकाणी सर्वेसर्वा असली तरी त्यांना मात देण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. 

न.प. निवडणुकीत नागपुरात भाजपला जोरदार फटका बसणार?

न.प. निवडणुकीत नागपुरात भाजपला जोरदार फटका बसणार?

शेतीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी नाराज आहेत. त्याचाच फटका भाजपला बसेल असा दावा विरोधकांनी केला आहे. आगामी नगर परिषद निवडणुकीत सत्ता काबीज करण्याचं लक्ष भाजपचं असलं तरी वाटतो तेवढा हा प्रवास सोपा नक्कीच नाही. नागपुरातली काटोल नगर परिषद लक्षवेधी ठरणार आहे. काय वैशिष्ट्य आहेत इथली... कोण कुणाला आव्हान देऊ शकतं पाहूयात त्यासंदर्भातला रिपोर्ट. 

नागपूर नगरपरिषद निवडणुकीत मुख्यमंत्री, गडकरी यांची प्रतिष्ठा पणाला

नागपूर नगरपरिषद निवडणुकीत मुख्यमंत्री, गडकरी यांची प्रतिष्ठा पणाला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच्या या शहरात भाजप वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्नशील असतील तर विरोधक त्यांना रोखण्यासाठी झटतील, अशी स्थिती दिसत आहे.

ठाण्यात पक्ष प्रवेशावरुन शिवसेना-मनसेत शह-काटशह

ठाण्यात पक्ष प्रवेशावरुन शिवसेना-मनसेत शह-काटशह

ठाण्यातील काही शिवसैनिकांनी मनसेचा रस्ता धरलाय. दिव्यातील मनसेचे नगरसेवक शैलेश पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळं नाराज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट कृष्णकुंज गाठून मनसेत प्रवेश केला. 

शिवसेनेत राष्ट्रवादी, मनसेच्या नगरसेवकांचा प्रवेश

शिवसेनेत राष्ट्रवादी, मनसेच्या नगरसेवकांचा प्रवेश

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आयाराम-गयारामचा सुळसुळाट वाढला आहे. शिवसेनेने अन्य राजकीय पक्षातील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्यास सुरुवात केली आहे.