पब्लिक टॉयलेट वापरा आणि फ्रीमध्ये पाहा, रजनीचा 'कबाली'!

पब्लिक टॉयलेट वापरा आणि फ्रीमध्ये पाहा, रजनीचा 'कबाली'!

सार्वजनिक टॉयलेट वापरलं तर तुम्हाला तुमचा फेव्हरेट स्टार अभिनेता रजनीकांतचा आगामी सिनेमा 'कबाली' मोफत पाहण्याची संधी मिळू शकते. 

Jul 1, 2016, 06:19 PM IST
'किरण बेदी यांच्यामुळे भाजपचा पराभव'

'किरण बेदी यांच्यामुळे भाजपचा पराभव'

 दिल्ली विधानसभेतील पराभवाचं खापर अखेर मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्यावर फोडण्यात आलं आहे. कारण किरण बेदी यांच्यामुळेच पक्षाचा पराभव झाला आहे, असं आरएसएसने म्हटलंय.

किरण बेदींना हरवणाऱ्या एसके बग्गा यांची ओळख

किरण बेदींना हरवणाऱ्या एसके बग्गा यांची ओळख

 कृष्णानगर विधानसभा मतदार संघातून किरण बेदी यांचा पराभव झाला आहे. आम आदर्मी पार्टीचे एसके बग्गा यांनी किरण बेदींचा २ हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. 

बेदींचा नव्हे नरेंद्र मोदींचा व्यक्तीगत पराभव  : अण्णा हजारे

बेदींचा नव्हे नरेंद्र मोदींचा व्यक्तीगत पराभव : अण्णा हजारे

 दिल्लीत सहा सभा घेऊनही भाजपला आलेले अपयश हा नरेंद्र मोदींचा व्यक्तिगत पराभव आहे. तसेच नरेंद्र मोदी यांची हवा नव्हती आणि नाही, लोकांना जे आश्वासन दिलं होतं, त्याचं पालन न केल्यानं नरेंद्र मोदी यांची विश्वासार्हता कमी झाली,  या विजयानंतर आप चांगले काम करेल, अशी आशा आहे असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

मोदी, बेदींकडून अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन

मोदी, बेदींकडून अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन

आम आदमी पार्टीमुळे दिल्ली भाजप, काँग्रेस मुक्त झाल्याचे पाहायला मिळालेय. 'आप'ला 65 जागांवर आघाडी घेतल्याने सत्ता आणि विरोधक याच पक्षाचे असणार आहे. या मोठ्या विजयामुळे मुख्यमंत्री पदाचे दावेदार अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या पराभूत मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी अभिनंदन केलेय.

सट्टे बाजारातही 'आप' हॉट फेव्हरेट!

सट्टे बाजारातही 'आप' हॉट फेव्हरेट!

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच सट्टे बाजारात आप हॉट फेव्हरेट आहे. सट्टा बाजारात आपसाठी १०० पैसे तर भाजपसाठी ४० पैसे असा दर असल्याचं दिसून येतंय. तर आघाडीचं सरकार आल्यास त्यासाठी ६० पैसे भाव आहे. 

...आणि किरण बेदींना 'अश्रू' कोसळले!

...आणि किरण बेदींना 'अश्रू' कोसळले!

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी बुधवारी  प्रचार दौऱ्यादरम्यान भावूक झालेल्या दिसून आल्या.

भाजपचं व्हिजन: दिल्लीला वर्ल्ड क्लास सिटी बनवणार

भाजपचं व्हिजन: दिल्लीला वर्ल्ड क्लास सिटी बनवणार

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आज आपलं व्हिजन डॉक्युमेंट सादर केलं. व्हिजन डॉक्युमेंटमध्ये भ्रष्टाचार मुक्तीला प्राधान्य देण्यात आलंय. दिल्ली वर्ल्ड क्लास सिटी बनवण्यावर भर देण्यात आलाय.

...म्हणून भाजपानं बेदींना निवडलं - आरएसएस

...म्हणून भाजपानं बेदींना निवडलं - आरएसएस

राजधानी दिल्लीत जनमत फारसं अनुकूल दिसत नसल्यानं चिंताग्रस्त भारतीय जनता पक्षानं किरण बेदींना पक्षात आणत त्यांची 'मुख्यमंत्री'पदाची उमेदवार म्हणून घोषणा केल्याची कबुली 'ऑर्गनायझर' या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात देण्यात आली आहे. तसंच या लेखात भाजपाला धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

किरण बेदींच्या दिल्लीतल्या कार्यालयावर हल्ला, कार्यकर्ते जखमी

किरण बेदींच्या दिल्लीतल्या कार्यालयावर हल्ला, कार्यकर्ते जखमी

दिल्लीत विधानसभा निवडणुकीत हिंसाचाराला सुरूवात झालीय. भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्या कृष्णनगर येथील कार्यालयावर सोमवारी हल्ला करण्यात आला. 

बेदींवर 'विश्वास'चा तोल सुटला, भाजपकडून तक्रार दाखल

बेदींवर 'विश्वास'चा तोल सुटला, भाजपकडून तक्रार दाखल

दिल्लीमधल्या प्रचारानं आता सभ्यतेची मर्यादा ओलांडल्याचं दिसतंय. आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास यांनी भाजपच्या उमेदवार किरण बेदी यांच्यावर टीका करताना अतिशय असभ्य भाषा वापरलीये. अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप ठेवत भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आपचे नेते कुमार विश्वास यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तर भाजपानं माझ्यावर केलेले आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारणातून संन्यास घेईन, असे विश्वास यांनी ठणकावून सांगितले आहे. 

खुर्चीत बसायला नाही, सेवा करायला आलोय - नरेंद्र मोदी

खुर्चीत बसायला नाही, सेवा करायला आलोय - नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी यांनी आज दिल्लीतील कडकडडुमा इथं दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचाराराचं रणशिंग फुंकलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचं कौतुक करताना, ज्यांना सरकार चालवण्याचा अनुभव आहे त्यांच्याच हाती सत्ता द्या, असं आवाहन दिल्लीकरांना केलं. 

शांतीभूषण यांच्याकडून किरण बेदींवर स्तुतीसुमनं

शांतीभूषण यांच्याकडून किरण बेदींवर स्तुतीसुमनं

आपचे नेते शांतीभूषण यांनी भाजपच्या मु्ख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचं कौतुक केलं आहे. किरण बेदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळतांना भूषण म्हणाले, आप नेते अरविंद केजरीवाल यांच्या इतक्‍याच बेदी याही कर्तबगार आणि लायक आहेत, असं प्रशस्तीपत्र शांती भूषण यांनी दिलं आहे.

माजी पोलीस अधिकारी बेदींकडे ११ करोडोंची संपत्ती!

माजी पोलीस अधिकारी बेदींकडे ११ करोडोंची संपत्ती!

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या भाजपच्या  मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी नामांकन पत्र दाखल करताना आपली संपत्ती जाहीर केलीय. माजी पोलीस अधिकारी किरण बेदी आणि त्यांच्या पतीकडे एकूण ११.६५ करोड रुपये किंमतीची मालमत्ता आहे. 

केजरीवाल, किरण बेदींनी भरला उमेदवारी अर्ज

केजरीवाल, किरण बेदींनी भरला उमेदवारी अर्ज

दिल्ली विधासभा निवडणुकीचा अर्ज भरण्याचा आजचा दिवस शेवटचा असताना माजी मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी उमेदवारी अर्ज भरला.

किरण बेदींना तीव्र विरोध, दिल्ली भाजप कार्यालयात जोरदार हंगामा

किरण बेदींना तीव्र विरोध, दिल्ली भाजप कार्यालयात जोरदार हंगामा

 दिल्ली भाजपच्या कार्यालयात काल दुपारी जोरदार हंगामा झाला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत किरण बेदी यांना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून भाजपनं प्रोजेक्ट करायचं ठरवलंय. त्यामुळं भाजप नेते सतीश उपाध्याय यांचे समर्थक प्रचंड नाराज झाले असून, त्यांनी भाजप कार्यालयात गोंधळ घातला.

दिल्लीकरांची पसंती अरविंद केजरीवाल यांनाच

दिल्लीकरांची पसंती अरविंद केजरीवाल यांनाच

दिल्लीत भाजपनं मुख्यमंत्री पदासाठी किरण बेदींच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असलं तरी दिल्लीकरांचा ओपिनीयन पोल काही वेगळंच सांगतोय. झी न्यूज आणि तालीम यांनी केलेल्या सर्वेच्या आधारे दिल्लीकरांनी मुख्यमंत्रीपदासाठी अरविंद केजरीवाल यांनाच पसंदी दिली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूक: भाजपची ६२ उमेदवारांची लिस्ट

दिल्ली विधानसभा निवडणूक: भाजपची ६२ उमेदवारांची लिस्ट

भाजपनं दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या ६२ उमेदवारांची यादी मध्यरात्री जाहीर केलीय. भाजपचे महासचिव आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी पक्षाचे ६२ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. 

भाजपने किरण बेदी यांना बळीचा बकरा बनवला - आप

भाजपने किरण बेदी यांना बळीचा बकरा बनवला - आप

आम आदमी पार्टीतून थेट भाजपमध्ये दाखल झालेल्या किरण बेदी यांना भाजपने मुख्यमंत्री पदाच्या रिंगणात उतरवले. मात्र, त्यांना बळीचा बकरा केल्याची टीका आम आदमी पार्टीचे नेते सोमनाथ भारती यांनी केली आहे. पराभवाचं खापर मोदींच्या माथी फुटू नये यासठी भाजपची ही खेळी असल्याचंही ते म्हणालेत.

किरण बेदी भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार

किरण बेदी भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार

अखेर भाजपने दिल्लीसाठी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी या भाजपकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील, अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली. 

किरण बेदी यांचा अखेर भाजपात प्रवेश!

किरण बेदी यांचा अखेर भाजपात प्रवेश!

दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी आणि दिवस मोजणं आता सुरू झालंय. दिल्लीची लढाई आप आणि भाजपमध्ये होणार हे आता जवळपास सिद्धच झालंय.