कोकणात पावसाचा धुमाकूळ, महामार्ग आणि रेल्वेची वाहतूक ठप्प

कोकणात पावसाचा धुमाकूळ, महामार्ग आणि रेल्वेची वाहतूक ठप्प

 मुंबई - गोवा महामार्गावर चिपळूणनजीक परशुराम घाटात दरड कोसळ्याने महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे. तर कोकण रेल्वे मार्गावर आरवली आणि संगमेश्वर दरम्यान रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे.  

 कोकणात पावसाचा धुमाकूळ, नारंगी, चोरद, जगबुडी नद्यांना पूर कोकणात पावसाचा धुमाकूळ, नारंगी, चोरद, जगबुडी नद्यांना पूर

पावसाने कोकणातील उत्तर रत्नागिरीमध्ये धुमाकूळ घातलाय. खेड आणि चिपळूण तालुक्याला पावसाने जोरदार झोडपून काढलं आहे.  खेड येथील नारंगी, चोरद, जगबुडी या नद्यांना मोठा पूर आलाय. 

कोकणातील तरुणांना कोकण रेल्वेत सहाय्यक लोकोपायलट बनण्याची संधी कोकणातील तरुणांना कोकण रेल्वेत सहाय्यक लोकोपायलट बनण्याची संधी

कोकण रेल्वेने कोकणातील तरुणांना रेल्वे मोटरमन बनण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी भरती प्रक्रिया सुरु केलेय. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचे आगमन कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचे आगमन

कोकणातल्या गणेशोत्सवाची सुरुवात भाद्रपद प्रतिपदेपासून होते. कोकणातल्या पहिल्या देवरुखमधील मानाच्या गणपतीचं आगमन झाले.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा

चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेत तर दुसरीकडे सलग सुट्ट्यांचा विकेंड यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वाहनांचा रांगा दिसत आहेत.

शिवसेनेला शह देण्यसाठी कोकणवासियांना ओढण्यासाठी भाजपची रणनीती शिवसेनेला शह देण्यसाठी कोकणवासियांना ओढण्यासाठी भाजपची रणनीती

शिवसेनेने गुजराती लोकांना आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली असताना दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या संख्येने असेलल्या कोकणवासियांनाही आपल्याकडे ओढण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. 

गणपतीला कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलसूट गणपतीला कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलसूट

यासाठी स्थानिक वाहतूक पोलिस आणि 'आरटीओ'मधून काही दिवस आधी पास मिळणार आहे.

कोकणात जाणाऱ्यांसाठी टोल सवलतीचा प्रयत्न : दीपक केसरकर कोकणात जाणाऱ्यांसाठी टोल सवलतीचा प्रयत्न : दीपक केसरकर

गणपतीला कोकणात जाणाऱ्या वाहनांना सरकार टोल सवलतीचा प्रयत्न करणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

...तर गाडीवर कोकण असे लिहा ...तर गाडीवर कोकण असे लिहा

गणेशोत्सवासाठी मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गऐवजी पर्यायी मुंबई-पनवेल-पुणे-सातारा-कोल्हापूर या मार्गाने आपल्या गावी जाणार्या गणेश भक्तांना जाता येता टोल माफी मिळावी अशी मागणी नितेश राणे यांनी केलीय. 

डबलडेकरच्या गाडीची वेळ बदलण्याचा प्रस्ताव डबलडेकरच्या गाडीची वेळ बदलण्याचा प्रस्ताव

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानींसाठी दिलासा देणारी बातमी. कोकणच्या प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या डबलडेकर गाडीची वेळ बदलण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाच्या विचाराधीन आहे. 

कोकणात पावसाचा धुमाकूळ, नद्यांच्या पुराचे पाणी बाजारपेठेत कोकणात पावसाचा धुमाकूळ, नद्यांच्या पुराचे पाणी बाजारपेठेत

कोकणात पावसाची संततधार सुरु आहे. खेड,चिपळणूमध्ये पुराचा धोका कायम आहे.  

विश्रांतीनंतर कोकणात पावसाची दमदार हजेरी विश्रांतीनंतर कोकणात पावसाची दमदार हजेरी

चार दिवसांच्या विश्रांतीनंतर कोकणात पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावलीय. पावसामुळे बळीराजा चांगलाच सुखावलाय. ग्रामीण भागात पावसाचा जोर चांगलाच पहायला मिळतोय. 

महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा

येत्या 24 तासात कोकण गोवा आणि विदर्भाच्या काही भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आलाय.  त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

कोकणसह मुंबईत पाऊस मात्र, राज्यातील धरण क्षेत्राकडे पाठ कोकणसह मुंबईत पाऊस मात्र, राज्यातील धरण क्षेत्राकडे पाठ

कोकण आणि मुंबईत पावसाने तळ ठोकला असला तरी राज्यातील धरणांच्या क्षेत्रात अद्यापही हवा तसा पाऊस सुरु झालेला नाही. त्यामुळे राज्यावरील पाणीटंचाईचं संकट अद्यापही कायमच आहे.

कोकणात मुसळधार पाऊस कोकणात मुसळधार पाऊस

कोकणात पाऊस आता जोर धरू लागला आहे. पालघर परिसरातही पावसाचं आगमन झाल्याने बळीराजा आनंदित झाला आहे.

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या 142 विशेष गाड्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या 142 विशेष गाड्या

मान्सून सुरू झाला असतानाच मुंबईकरांना गणेशोत्सवासाठी गावी जाण्याच्या रिझर्वेशनचे वेध लागतात. यासाठी कोकणात रेल्वेने 142 विशेष फे-या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोकणात अतिवृष्टीचा इशारा कोकणात अतिवृष्टीचा इशारा

मान्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण असून पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वृष्टी होण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून कोकण किनारपट्टीवर चांगला पाऊस होईल. त्याचवेळी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.

कोकणसह मुंबईत वादळी पावसाची शक्यता : कुलाबा वेधशाळा कोकणसह मुंबईत वादळी पावसाची शक्यता : कुलाबा वेधशाळा

 कोकण, मुंबईसह उपनगरांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय. हा मान्सून पूर्व पाऊस असल्याचं कुलाबा वेधशाळेनं म्हटलंय.

प्रतिक्षेत असलेला मान्सून राज्यात दाखल, कोकणसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात पाऊस प्रतिक्षेत असलेला मान्सून राज्यात दाखल, कोकणसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात पाऊस

मान्सून दोन दिवस आणखी लांबणार असे वृत्त हवामान विभागाने वर्तविले होते. मात्र, पावसाने त्याआधीच धडक दिलेय. कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार हजेरी लावली. त्याचवेळी केरळमध्ये मान्सून दाखल झालाय. तो महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकत आहे.

कोकण-गुजरातच्या आंब्यांची परदेशवारी... व्हाया नाशिक! कोकण-गुजरातच्या आंब्यांची परदेशवारी... व्हाया नाशिक!

कोकण आणि गुजरातेतील आंबा खरेदी करून परदेशात पाठवण्याचं काम नाशिकच्या शेतकऱ्यांची कंपनी करतेय. गेल्या वर्षी या कंपनीने पाच हजार टन आंबा प्रक्रिया करून गल्फमध्ये पाठवला होता. यावर्षी युरोपासह दहा हजार टन निर्यात अपेक्षित आहे. 

राजकारणी नाही बिझनेसमन नारायण राणे बोलले... राजकारणी नाही बिझनेसमन नारायण राणे बोलले...

मी पहिला व्यावसायिक नंतर राजकारणी आहे आणि त्यामुळेच टिकलो आहे, त्यामुळे मराठी माणसाने भावनांचा विचार न करता विकासाचा विचार करावा, असा सल्ला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. वाडी वस्ती या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.