कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचे आगमन

कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचे आगमन

कोकणातल्या गणेशोत्सवाची सुरुवात भाद्रपद प्रतिपदेपासून होते. कोकणातल्या पहिल्या देवरुखमधील मानाच्या गणपतीचं आगमन झाले.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा

चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेत तर दुसरीकडे सलग सुट्ट्यांचा विकेंड यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वाहनांचा रांगा दिसत आहेत.

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेबरोबरच एसटीही फुल्ल

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेबरोबरच एसटीही फुल्ल

मुंबईत राहणारा कोकणी माणूस गणेशोत्सवात कोकणात आपल्या मूळ गावी जातो म्हणजे जातोच. सोमवारपासून गणेशोत्सव सुरू होणार असल्याने मुंबईतून कोकणात जाणा-यांची लगबग वाढली आहे. रेल्वेबरोबरच एसटीने मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांची गर्दी झाली आहे. 

गणेशोत्सव : कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी पास मिळणार पोलीस ठाण्यात

गणेशोत्सव : कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी पास मिळणार पोलीस ठाण्यात

गणेशोत्सवाच्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टोल माफी मिळण्याबाबत निर्माण झालेली संभ्रमावस्था आता दूर झाली आहे. जवळच्या पोलीस चौकीत किंवा वाहतूक चौकीतच टोल माफीचे पासेस देण्याचं काम सुरू झाले आहे.

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर १८० जादा गाड्या

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर १८० जादा गाड्या

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने मध्य रेल्वेसोबत १८० ट्रेन्सची घोषणा केली आहे.  

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या ट्रेनची बुकिंग हाऊसफुल्ल

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या ट्रेनची बुकिंग हाऊसफुल्ल

गौरी-गणपतीच्या काळात कोकणात जाणा-या चाकरमान्यांची संख्या वाढतच चाललीय. कोकण रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनचं बुकिंग अवघ्या काही मिनिटांत हाऊसफुल्ल झालंय. सर्वच ट्रेनची वेटिंग लिस्ट थेट 500 पर्यंत पोहचलीय. 

गणेश उत्सवात वसईत अश्लील डान्स, पैसेही उडवलेत

गणेश उत्सवात वसईत अश्लील डान्स, पैसेही उडवलेत

वसईमध्ये गणेश उत्सवात धांगडधिंगाणा आणि बीभत्स डान्सचा प्रकार गणेश उत्सवात पाहायला मिळाला. अनेकांनी स्टेजवर पैशाचा नोटाही उडवल्यात. विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पोलिसांना रात्री उशिरापर्यंत सुरु असलेला अश्लील डान्स आणि आवाज पोहोचला नाही.

अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घरचा बाप्पा

अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घरचा बाप्पा

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घरातील बाप्पा. बेर्डे कुटुंबात प्रत्येकाला मान मिळतो. दरवर्षी येणारा हा मान यावर्षी लक्ष्मीकांत यांचा मुलगा अभिनय याला मिळाला आहे. 

सचिन तेंडुलकर कुटुंबासह लालबाग राजाच्या चरणी

सचिन तेंडुलकर कुटुंबासह लालबाग राजाच्या चरणी

राज्यातसह देशात बाप्पाचे आगमन मोठ्या उत्सहात होत असताना मुंबईत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याच्या कुटुंबीयांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

बाप्पा मोरया, गणेशोत्सवाला सुरुवात

बाप्पा मोरया, गणेशोत्सवाला सुरुवात

गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. सकाळपासूनच भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली. बाप्पाचे आगमन वाजत गाजत होत आहे.

मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंद

मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंद

गणपती उत्सवाला कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे. ही बंदी सुरक्षितेच्या दृष्टीने करण्यात आली आहे, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आलेय. १४ सप्टेंबरपासून बंदी करण्यात आली आहे. 

कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी आणखी २६ विशेष गाड्या

कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी आणखी २६ विशेष गाड्या

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी एक चांगली बातमी आहे. पश्चिम रेल्वे गणपतीसाठी २६ विशेष गाड्या सोडणार आहे. वसई ते रत्नागिरी आणि मडगावसाठी या विशेष गाड्या असणार आहेत.

गणपती उत्सवाची शाळा, कॉलेजला 5 दिवसांची सुट्टी?

गणपती उत्सवाची शाळा, कॉलेजला 5 दिवसांची सुट्टी?

राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. विशेष कोकणात जोरदार तयारी असते. त्यामुळे शाळा, कॉलेजना सुट्टी देण्याची मागणी जोर धरते. गतवर्षी शाळा, कॉलेजला सुट्टी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे यावर्षीही पाच दिवसांची सुट्टी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. ही मागणी मान्य झाली तर मुंबईत शाळा, कॉलेजना पाच दिवसांची सुट्टी मिळेल.

कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी या विशेष गाड्या

कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी या विशेष गाड्या

गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर वाढती गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आणखी ११९ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. तर पनवेल - चिपळूण मार्गावर विशेष डेमू रेल्वे चालविण्यात येणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर २२४ गाड्या, १७ स्टेशनवर सीसीटीव्ही

कोकण रेल्वे मार्गावर २२४ गाड्या, १७ स्टेशनवर सीसीटीव्ही

गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर २२४ गाड्या सोडण्यात येणार आहे. तसेच महत्वाच्या १७ स्टेशनवर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे, अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे.

गणपतीला दाखवायचा असा नैवेद्य

गणपतीला दाखवायचा असा नैवेद्य

आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, गणपतीला दाखवायचा असा नैवेद्य. ज्यानं तुमचा गणपतीबाप्पा एकदम खूष होऊन जाईल. अतिशय क्रिएटीव्ह आणि इनोव्हेटिव्ह मोदकांची व्हरायटी खास तुमच्यासाठी.

गणपती उत्सव : राज्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त

गणपती उत्सव : राज्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त

 गणेशोत्सवासाठी राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईत महिला छेडछाड विरोधी पथकासह ४४ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. लालबाग राजा कार्यकर्त्यांना नीट वागण्याची पोलीस आयुक्तांची तंबी दिली आहे.

मुंबई पालिकेला खड्डे बुजवण्याची सुबुद्धी

मुंबई पालिकेला खड्डे बुजवण्याची सुबुद्धी

अखेर गणपतीनं महापालिकेला खड्डे बुजवण्याची सुबुद्धी दिलीय. गणपतीच्या आगमनाची महापालिकेनं तयारी केलीय. त्यासाठी खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

गणपतीसाठी कोकणात जाण्याऱ्या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक

गणपतीसाठी कोकणात जाण्याऱ्या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक

कोकण रेल्वे मार्गावर गणपती उत्सवासाठी तब्बल १२४ विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. मध्य आणि कोकण रेल्वेकडून विशेष ९0 रेल्वे गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. यात ५२ आरक्षित आणि ३८ अनारक्षित रेल्वेंचा समावेश आहेत. यातील २ गाड्या या कोल्हापूरसाठी आहेत. या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट, ८ जणांचा मृत्यू

राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागलं आहे. राज्यात तब्बल आठ जणांचा विसर्जन मिरवणुकीदरम्यान मृत्यू झालाय.

गणेश भक्तांनो सावधान! गिरगाव चौपाटीवर `स्टिंग रे`

गिरगाव चौपाटीवर स्टिंग रे सदृश मासे सापडल्यानं बीएमसी अधिकारी घटनास्थळी तपासणीसाठी दाखल झालेत. मासे बॉटलमध्ये टाकून तपासणीसाठी नेण्यात आले आहेत. गणेश भक्तांनो समुद्रात जाताना घबरदारी घ्या. नाहीतर तुमच्या जीवावर धाडस बेतू शकते.