अंडर वॉटर ह्यूमन साखळीच्या माध्यमातून समानतेचा संदेश

अंडर वॉटर ह्यूमन साखळीच्या माध्यमातून समानतेचा संदेश

आपण सर्व एक आहोत, सर्व जण सामान आहेत हा संदेश देण्याच्या उद्देशानं पिंपरी चिंचवड आणि पुण्यातले काही उद्योजक एकत्र आले. त्यांनी हा संदेश देण्यासाठी थायलंडमध्ये सर्वात मोठी अंडर वॉटर ह्यूमन चैन अर्थात मानवी साखळी तयार केली. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे.

'तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नही होते'

'तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नही होते'

दामिनी सेन... तिला आज सारं जग सलाम करतं. हातांविनाच तिनं साऱ्या जगावर विजय मिळवला. 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये तिचं नाव कोरलं गेलंय.

अभिषेक बच्चनचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

अभिषेक बच्चनचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

बॉलीवूडचा ज्युनियर बच्चन अशी ओळख असलेल्या अभिषेक बच्चनच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालीये. १२ तासांत सर्वाधिक वेळा जनतेसमोर येणारा स्टार म्हणून त्याची गिनीज बुकात नोंद झालीये. 

'बाहुबली'नं तोडला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

'बाहुबली'नं तोडला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

एस. एस. राजमौली यांचा सुपरहिट चित्रपट 'बाहुबली'नं आणखी एक रेकॉर्ड बनवलाय. चित्रपटाचं पोस्टर ५० हजार स्क्वेअर फूट मोठं बनवलं होतं. ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालीय.

पूजा-शैलेशचं 'अंडर वॉटर' लग्न, गिनीज बुकात नोंद

पूजा-शैलेशचं 'अंडर वॉटर' लग्न, गिनीज बुकात नोंद

आपलं लग्न कसं खास ठरावं यासाठी प्रत्येक जोडप्याची काही स्वप्न असतात. त्यासाठी अनेक जणं विविध क्लृप्त्या लढवतात. नुकतंच एका जोडप्यानं 'अंडर वॉटर' विवाह करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलंय. 

डोंबिवलीचं नाव गिनीज बुकात, सर्वात मोठं पझल बनवण्याचा विक्रम

डोंबिवलीचं नाव गिनीज बुकात, सर्वात मोठं पझल बनवण्याचा विक्रम

सांस्कृतिक शहर डोंबिवलीचं नाव आता गिनीज बुकात नोंदलं गेलंय. ११० दिवस मेहेनत करून जिगसॉ पझल तयार करण्यात आलंय. जगातलं हे सर्वात मोठं जिगसॉ पझल आहे. डोंबिवलीतल्या बंदिस्त क्रीडासंकुलात हे अनोखं भव्य पझल प्रेक्षकांसाठी पाहायला खुलं आहे.

वर्ल्ड रेकॉर्ड! किडनीतून निघाला ७०० ग्रामचा स्टोन

दिल्लीतील एका हॉस्पिटलमध्ये ४५ वर्षीय महफूज अहमद नावाच्या व्यक्तीच्या किडनीतून जगातला सर्वात मोठा किडनी स्टोन काढण्यात आलाय. ९ सेमी व्यासाच्या या स्टोनचं वजन तब्बल ७०० ग्राम आहे.

‘नटसम्राटाला’ गिनीज बुकात मिळणार घर?

‘कुणी घर देता का घर?’ अशी सार्त हाक घालणाऱ्या नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकरांना ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये घर मिळण्याची शक्यता निर्माण झालीय.

स्टंट, मृत्यूचा खेळ !

स्टंट करतांना एका स्टंटमॅनला आपला जीव गमवावा लागलाय. तो सगळा प्रकार अंगावर काटा आणणारा आहे. जीव धोक्यात घालून अशा प्रकारे स्टंट करणं कितपत योग्य आहे ? असा सवाल आता केला जात आहे. पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये स्टंट करतेवेळी जी घटना घडला ती हादरवून सोडणारी आहे. हजारो फूट उंचीवर स्टंट करतांना एका स्टंटमॅनचा मृत्यू झालाय.

गिनीज बुक विक्रमवीर स्‍टंटमॅनचा दुर्दैवी मृत्यू

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या एका विक्रमवीराचा अत्यंत दुर्दैवी असा मृत्यू झालाय. पश्चिम बंगालमध्ये होमगार्ड असलेले ४९ वर्षीय शैलेंद्रनाथ रॉय यांचा विश्वविक्रम करतानाच असंख्य समर्थकांसमक्षच मृत्यू झाला.

वीणा मलिक करणार १०० वेळा लिपलॉक kiss!

नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकलेली पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक आपला वाढदिवस सर्वांच्या लक्षात राहावा यासाठी नेहमी काही ना काही नवीन करते. विचार करा या वेळेस वीणा काय करणार आहे. तर वीणाला यावेळी एक स्पेशल गिफ्ट मिळणार आहे, जे तिला वर्ल्ड रेकॉर्ड बनविण्यासाठी मदत करणार आहे.

प्रशांत सादर करतोय विश्वविक्रमी प्रयोग!

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या आणि अनेक रेकॉर्ड आपल्या नावे करणारा प्रशांत आज विश्वविक्रमी प्रयोग सादर करणार आहे.

जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेचं निधन...

‘जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती’ म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदल्या गेलेल्या बेसी कूपर यांचं निधन झालंय. मृत्यूसमयी त्यांचं वय होतं ११६ वर्ष...

‘लो लल्ला लूट लो’ला बनवायचाय वर्ल्ड रेकॉर्ड!

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आता एक चित्रपट आपल्या नावाची नोंद करण्याच्या तयारीत आहे. ‘लो लल्ला लूट लो’ हा तब्बल दोन तासांचा सिनेमा एकाच टेकमध्ये चित्रित केला जाणार आहे. हा प्रयत्न यशस्वी झाला तर तो निश्चितच नवा रेकॉर्ड असेल.