व्यंकय्या नायडूंच्या ट्वीटर अकाऊंटवर असाही गोंधळ

व्यंकय्या नायडूंच्या ट्वीटर अकाऊंटवर असाही गोंधळ

आजकाल मंत्र्यांमध्ये ट्विटर शुभेच्छा किंवा दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी जणू स्पर्धाच लागलेली असते, अशाच घाईगडबडीत. 

पत्ता 'नीट' न दिल्याने परीक्षा केंद्र गाठण्यात गोंधळ

पत्ता 'नीट' न दिल्याने परीक्षा केंद्र गाठण्यात गोंधळ

नाशिकच्या एकलव्य शाळेत हा प्रकार घडलाय.

खासदार रवींद्र गायकवाड यांची दबंगगिरी

खासदार रवींद्र गायकवाड यांची दबंगगिरी

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणापासून चर्चेत असलेले उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांचे आणखी एक प्रकरण पुढे आलं आहे. लातूर महानगरपालिका निवडणूकीची धामधूम एकीकडे सुरु असताना शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एसबीआयच्या एटीएमपुढे चांगलाच गोंधळ घातला. 

'मार्ड'च्या संपाचा गोंधळ अजूनही सुरूच...

'मार्ड'च्या संपाचा गोंधळ अजूनही सुरूच...

मार्डच्या संपाबाबत संभ्रम कायम असल्याचं समोर आलंय. 

उद्या विधिमंडळात अर्थसंकल्प सादर कसा होणार?

उद्या विधिमंडळात अर्थसंकल्प सादर कसा होणार?

विधीमंडळाच्या चालू अधिवेशऩात विरोधकांच्या गोंधळानं सरकारची चांगलीच कोंडी झालीय. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्याचं भाषण सुरळीत होईल की नाही याची चिंता आहे. कर्जमाफीची घोषणा केल्याशिवाय काम चालू देणार नाही असा इशारा दररोज दिला जातोय.

कर्जमाफीच्या मुद्यावरून गोंधळ, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज पाण्यात

कर्जमाफीच्या मुद्यावरून गोंधळ, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज पाण्यात

कर्जमाफीच्या मुद्यावरून विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळं राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं पहिल्या आठवड्याचं कामकाज पाण्यात गेलं.  कर्जमाफीच्या मुद्द्यावर सलग पाचव्या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेनंही आंदोलन केलं.

पैसे परत मिळवण्यासाठी भाजप इच्छुकांचा बापटांसमोर गोंधळ

पैसे परत मिळवण्यासाठी भाजप इच्छुकांचा बापटांसमोर गोंधळ

तिकिट न मिळाल्यानं नाराज झालेल्यांची सर्वच पक्षांमध्ये मोठी संख्या आहे.

'हे राम नथुराम'च्या प्रयोगावेळी राष्ट्रवादीचा गोंधळ

'हे राम नथुराम'च्या प्रयोगावेळी राष्ट्रवादीचा गोंधळ

ठाण्यातील गडकरी रंगायतन इथे हे राम नथुराम हे नाटक सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी गोंधळ घातला.

मुंबईतल्या मराठा मोर्चाच्या तारखांवरून दोन गट

मुंबईतल्या मराठा मोर्चाच्या तारखांवरून दोन गट

मुंबईत निघणाऱ्या मराठा मोर्चाच्या तारखेवरून दोन गट पडले आहेत.

विनायक मेटे यांच्या कार्यक्रमात गोंधळ

विनायक मेटे यांच्या कार्यक्रमात गोंधळ

आरक्षण मिळालं नाही, तर आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा मेटेंनी यावेळी केली. 

संसदेत एकही दिवस कामकाज नाही, 223 कोटी रुपयांचा चुराडा

संसदेत एकही दिवस कामकाज नाही, 223 कोटी रुपयांचा चुराडा

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शुक्रवारचा शेवटचा दिवसही गोंधळात वाया गेला.

मुख्यमंत्र्यांच्या सभेत अखिल भारतीय छावा संघटनेचा गोंधळ

मुख्यमंत्र्यांच्या सभेत अखिल भारतीय छावा संघटनेचा गोंधळ

नगरपालिकांच्या दुस-या टप्प्याचं मतदान 18 तारखेला होतंय.. या निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांनी प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. कालच्या बारामती दौर-यानंतर आज मुख्यमंत्री मराठवाड्यात सभांचा धडाका लावणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पैठणमधल्या सभेत अखिल भारतीय छावा संघटनेनं गोंधळ घातला.

'सर्वोच्च न्यायालयाचा मासोळी बाजार केला'

'सर्वोच्च न्यायालयाचा मासोळी बाजार केला'

सर्वोच्च न्यायालयाचा मासोळी बाजार केलाय अशा शब्दांत सरन्यायाधीश टी.एस.ठाकूर यांनी न्यायालयात गोंधळ घालणा-या वकिलांना फटकारलं आहे.

नोटबंदीवरून विरोधकांचा विरोध कायम, लोकसभा-राज्यसभेत गोंधळ

नोटबंदीवरून विरोधकांचा विरोध कायम, लोकसभा-राज्यसभेत गोंधळ

नोटबंदीवरून विरोधकांनी सुरू केलेला विरोध संपलेला नाही. विरोधकांच्या भूमिकेमुळे संसदेचे कामकाज ठप्प आहे. आज सकाळी संसदेचे कामकाज सुरु झाले. यावेळी विरोधक पुन्हा आक्रमक दिसलेत. लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळामुळे कामकाज थांबविण्यात आले आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवसही पाण्यात

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवसही पाण्यात

 नोटाबंदीच्या मुद्यावरून विरोधकांनी संसदेतला गोंधळ सुरूच ठेवलाय. त्यामुळं हिवाळी अधिवेशनातला कामकाजाचा चौथा दिवसही पाण्यात गेलाय.

'टीव्हीवर चमकण्यासाठी विरोधकांचा संसदेत गोंधळ'

'टीव्हीवर चमकण्यासाठी विरोधकांचा संसदेत गोंधळ'

टीव्हीवर चमकण्यासाठीच विरोधक संसदेत गोंधळ घालत आहेत असं वक्तव्य लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केलं आहे.

नोटाबंदीवरून लोकसभा सोमवारपर्यंत तहकूब

नोटाबंदीवरून लोकसभा सोमवारपर्यंत तहकूब

नोटाबंदीच्या मुद्द्यावरून आजही संसदेत जोरदार गदारोळ झाला.

पुण्याच्या पाणीकपातीवरून गोंधळात गोंधळ

पुण्याच्या पाणीकपातीवरून गोंधळात गोंधळ

पुण्यामधल्या धरणक्षेत्रामध्ये मुबलक पाऊस झाल्यामुळे पाणीकपात सोमवार पासून रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा महापौर प्रशांत जगताप यांनी केली होती. 

पोलीस भरती परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलल्याने गोंधळ,  दंगल विरोधी पथक दाखल

पोलीस भरती परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलल्याने गोंधळ, दंगल विरोधी पथक दाखल

पोलीस भरती दरम्यान होणारी परीक्षा पुढे ढकलली म्हणून वैतागलेल्या उमेदवारांनी जोरदार गोंधळ घातला. नागपूरच्या पोलीस मुख्यालयात हा प्रकार घडला. शारिरीक चाचणी झाल्यावर सलग तिसऱ्यांना लेखी परीक्षा पुढे ढकलल्याने उमेदवार संतापले. मात्र या उमेदवारांना योग्य उत्तर देण्याऐवजी दंगल विरोधी पथकाला पाचारण करण्यात आलं. 

असहिष्णुतेवर बरेच जण गोंधळात - सुशीलकुमार शिंदे

असहिष्णुतेवर बरेच जण गोंधळात - सुशीलकुमार शिंदे

सहिष्णुता आणि असहिष्णुता यांच्यात बरेच जणांचा गोंधळ उडालाय, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय. ते पुण्यात बोलत होते. 

'भारत माता की जय'वर विधानसभेत गोंधळ

'भारत माता की जय'वर विधानसभेत गोंधळ

'भारत माता की जय' च्या मुद्यावरून आज विधानसभेत सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष पुन्हा अनुभवायला मिळाला. 'भारत माता की जय न बोलणाऱ्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही' असं वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी अशी मागणी विधानसभेत विरोधकांनी केली. तर विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय.