ग्रहण

रजनीकांतच्या कबाली सिनेमालाही 'लीक'चं ग्रहण

रजनीकांतच्या कबाली सिनेमालाही 'लीक'चं ग्रहण

प्रदर्शनाआधीच सिनेमा लीक होण्याचं ग्रहण अभिनेता रजनीकांतला लागलं आहे. कारण बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित कबाली हा सिनेमाही ऑनलाईन लीक झाला आहे. कबाली रिलीज होण्यासाठी अजून तीन दिवस बाकी आहे. येत्या 22 जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. मात्र त्यापूर्वीच हा सिनेमा विविध वेबसाईट्सवर उपलब्ध असल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी कबाली टीमने तातडीने संबंधित वेबसाईट्सशी संपर्क करुन, सिनेमा हटवण्याची मागणी केली आहे. हा चित्रपट अद्याप चित्रपट शेअरींग साइट असलेल्या टोरन्टवर आलेला नाही. 

Jul 19, 2016, 10:59 PM IST
नाशिक-मुंबई हवाईसेवेला लागलेले ग्रहण कायम

नाशिक-मुंबई हवाईसेवेला लागलेले ग्रहण कायम

मुंबई हवाईसेवेला लागलेले ग्रहण सुटण्याची अजून चिन्हे नाहीत. मुंबई विमानतळाचा कारभार सांभाळणा-या जीव्हीके कंपनीने टेक ऑफ आणि लँडिंगसाठी जागा दिली नसल्यानं या सेवेचा मुहूर्त पुन्हा एकदा टळलाय. या सेवेसाठी 70 सीटर विमानसेवा एअर इंडियानं सुरु करण्याचा प्रस्ताव दिला होता.. मात्र जीव्हीकेच्या आडमुठ्या भूमिकेमुळं एक मेचा मुहूर्त टळला आहे.

May 1, 2016, 09:16 PM IST
ग्रहणाप्रमाणे पृथ्वीवर १५ दिवस अंधार होणार

ग्रहणाप्रमाणे पृथ्वीवर १५ दिवस अंधार होणार

गोंधळून जाऊ नका, ही बातमी पूर्णपणे निराधार आहे, सोशल नेटवर्किंगवर हा खोडसाडपणा करण्यात आला आहे, कारण हे ऐकून तुम्हाला नक्की आश्चर्य होणार आहे की,  पंधरा दिवसांसाठी ग्रहणाच्या वेळी होतो तसा पृथ्वीवर अंधार होणार आहे.

Aug 11, 2015, 08:58 PM IST
आज चंद्र दिसणार सूर्यासारखा लाल!

आज चंद्र दिसणार सूर्यासारखा लाल!

नवी दिल्लीः आज चंद्रग्रहणामुळं आकाशात एक सुंदर दृश्य पाहयला मिळणार आहे. तेजस्वी प्रकाशासाठी ओळखला जाणार चंद्र हा संध्याकाळी पूर्णपणे सूर्यासारखा लाल रंग परिधान करणार आहे. सर्वसामान्यांसाठी खास करून शास्त्रज्ञांसाठी हे दृश्य मनोरंजक असून आज पूर्ण चंद्र ग्रहण दिसणार आहे.   

Oct 8, 2014, 12:35 PM IST

वर्षातलं पहिलं ग्रहण आज दिसणार

आज भारतीय खगोल प्रेमींना या वर्षातील पहिले ग्रहण पाहता येणार आहे. गुरूवारी मध्यरात्री १ वाजून २४ मिनिटांनी हे ग्रहण देशाच्या सर्व भागातून पाहायला मिळणार आहे.

Apr 25, 2013, 03:54 PM IST