घुसखोरी करणाऱ्या ४ दहशतवाद्यांना केलं ठार

घुसखोरी करणाऱ्या ४ दहशतवाद्यांना केलं ठार

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्यानं सलग दुस-या दिवशी पाकिस्तानच्या हल्ल्याचा कट उधळून लावला आहे.

लद्दाखमध्ये चीन सैनिकांना भारतीय सैनिकांनी मारून हाकलेले

लद्दाखमध्ये चीन सैनिकांना भारतीय सैनिकांनी मारून हाकलेले

 चीन आणि भारतीय सैनिक यांच्यात लद्दाखच्या बर्फाच्छादित परिसरात विरोध सुरू आहे. या भागात मनरेगाअंतर्गत सिंचनासाठी कॅनॉलचे बांधकाम सुरू होते. हे काम रोखण्यासाठी पिपल्स लिबरेशन आर्मीचे जवान घुसले. पण भारतीय सैनिकांनी त्याची ही घुसखोरी रोखून त्यांना मारून हाकलून दिले. 

घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी केलं ठार

घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी केलं ठार

पाकिस्तानने पुन्हा एकदा लाईन ऑफ कंट्रोलवर सीजफायरचं उल्लंघन केलं आहे. कश्मीरमधील नोगाममध्ये दानेश आणि लक्ष्मी पोस्टवर पाकिस्तानी लष्कराकडून फायरिंग करण्यात आली. भारताने ही त्यांना चोख प्रत्यूत्तर दिलं. सकाळीपर्यंत ही फायरिंग सुरु होती अशी माहिती मिळाली आहे.

पाकिस्तानविरोधात पंतप्रधान मोदींचा 'पंचसूत्री अॅक्शन प्लॅन'

पाकिस्तानविरोधात पंतप्रधान मोदींचा 'पंचसूत्री अॅक्शन प्लॅन'

काश्मीरमधील उरी हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी स्पेशल अॅक्शन प्लॅन आखला आहे.  देशभरातून पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यांना कठोर उत्तर देण्याची मागणी केली आहे.  त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

 अमिताभच्या बंगल्यात घुसणाऱ्या व्यक्तीस अटक

अमिताभच्या बंगल्यात घुसणाऱ्या व्यक्तीस अटक

अमिताभ यांच्या बंगल्यात घुसणाऱ्या एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील बंगल्याची भिंत ओलांडून हा व्यक्ती बंगल्यात शिरला होता, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

कोकणच्या आंब्यात कानडी आंब्याची घुसखोरी

कोकणच्या आंब्यात कानडी आंब्याची घुसखोरी

फळ मार्केटमध्ये कोकणातील हापूस आंब्याबरोबर कानडी आंब्यानंही जोरदार शिरकाव केला आहे. कोकणच्या हापूसच्या निम्म्या किमतीत कानडी हापूस विकला जातो. त्यामुळं आंब्याचे खवय्ये स्वस्तातल्या कानडी हापूसकडे आकर्षित होताना दिसतायंत. तर दुसरीकडं कोकणातल्या हापूसच्या पेटीत कानडी हापूस घुसडून चढ्या दरानं विकण्याचा गोरख धंदाही विक्रेत्यांनी सुरू केल्याचं बोललं जातंय. या सर्व प्रकाराला किरकोळ व्यापारीच जबाबदार असल्याचा आरोप घाऊक व्यापा-यांनी केलाय. 

...तर एकही पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसखोरी करणार नाही

...तर एकही पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसखोरी करणार नाही

पाकिस्तानी दहशतवाद्यांची भारतात होणारी घुसखोरी हा नेहमीच भारतासाठी चिंतेचा विषय राहिला आहे. या प्रश्नावर केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या मात्र अद्याप ही घुसखोरी पूर्णपणे रोखण्यात यश आलेले नाही. 

भारत - पाकिस्तान सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी भारत लावणार लेझर

भारत - पाकिस्तान सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी भारत लावणार लेझर

नवी दिल्ली : पाकिस्तानातून होणाऱ्या घुसखोरीमुळे देशात वाढणाऱ्या दहशतवादाला आळा घालण्यासाठी आता भारताने सुरक्षेच्या संदर्भात काही कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे.

चीनच्या राष्ट्रपतींसोबत घुसखोरीवर चर्चा होणार

चीनच्या राष्ट्रपतींसोबत घुसखोरीवर चर्चा होणार

चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्याशी भारताच्या सीमेत चीनी लष्कराने केलेल्या घुसघोरीवर चर्चा होणार असल्याचं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटलं आहे. एकीकडे चीनच्या राष्ट्रपतींचं भारतात जोरदार स्वागत होत असलं, तरी दुसरीकडे चीनी लष्कराची सीमेत घुसखोरी सुरूच आहे.

१०० भारतीय सैनिकांना ३०० चीनी सैनिकांनी घेरलं

१०० भारतीय सैनिकांना ३०० चीनी सैनिकांनी घेरलं

चीनचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर येत असतानाच चीनी सैन्याच्या जवानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करुन भारतीय जवानांना घेरल्याची संतापजनक घडली आहे. या घटनेमुळं भारत - चीन सीमा रेषेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. 

सीमाभागात चीनने घुसखोरी केल्याचं उघड

सीमाभागात चीनने घुसखोरी केल्याचं उघड

सीमाभागात चीनच्या कुरापती सुरूच आहेत. भारत-चीन सीमेवर लडाख भागात चीनी  सैनिकांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याचं उघडकीस आलं. 

१६ चीनी नागरिकांना घुसखोरी करताना अटक

भारत-चीन सीमा अनधिकृतरित्या ओलांडून भारतात घुसखोरी करण्याऱ्या १६ चीनी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यापैकी बहुसंख्य तिबेटमधील नागरिक आहेत.

‘केरन’ऑपरेशन संपलं, घुसखोरी मागे पाकिस्तानच- लष्करप्रमुख

केरन ऑपरेशन संपलं असून भारताच्या जवानांनी पाकिस्तानचे दात त्याच्याच घशात घातल्याचं मंगळवारी भारतीय लष्कर प्रमुख विक्रम सिंह यांनी स्पष्ट केलं. शिवाय पाकिस्तानच्या मदतीशिवाय दहशतवादी घुसखोरी करुच शकत नाही, असं स्पष्ट करत यामागे पाकचाच हात असल्याचे संकेत लष्करप्रमुखांनी दिले.

अरुणाचलमध्ये चीनची पुन्हा घुसखोरी

पाकिस्तानसोबतच आता भारतीय सैन्यासमोर चीनचं आव्हान आहे. भारत आणि चीनदरम्यान शांतता प्रस्थापित करण्याचे भारताचे प्रयत्न एका बाजूला सुरू असतानाच चीन मात्र छुप्या रीतीनं भारतात शिरण्याची कोणतीही संधी सोडत नाहीय. चीनच्या सैन्यानं लडाखमध्ये केलेल्या घुसखोरीची पुनरावृत्ती अरुणाचल प्रदेशमध्येही केल्याचं आता उघड झालंय.

पाकचं ‘नापाक’ कृत्य सुरूच, पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातल्या केरन सेक्टर इथं पहाटे तीन वाजता नियंत्रण रेषेवरून भारतीय हद्दीत घुसण्याचा दहशतवाद्यांचा डाव उधळून लावण्यात भारतीय सैन्याला यश आलंय.

नियंत्रण रेषा ओलांडून चीनी सैनिक घुसले भारताच्या हद्दीत

चीनच्या सैनिकांनी पुन्हा एकदा लडाख भागात घुसखोरी केलीय. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून सुमारे 100 हून अधिक चिनी सैनिक भारताच्या हद्दीत घुसले. `हा भाग चीनचा असून, तो खाली करा`, असे बॅनर त्यांच्या हातात होते.

सीमा घुसखोरीनंतर चीनची भारतात हवाई घुसखोरी

चीनची दादागिरी सुरुच असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. भारतीय सीमेवर घुसखोरी केल्यानंतर आता ड्रॅगननं हवाई घुसखोरी केल्याचं उघड झालंय. चीनच्या दोन हेलिकॉप्टर्सनी भारतीय लेहच्या चुमार भागात घुसखोरी केल्याचं वृत्त पीटीआयनं दिलंय.

काश्मिरमध्ये चीनची घुसखोरी

चीनची घुसखोरी सुरूच आहे. भारताच्या काही राज्यांमध्ये चीनने खुसखोरी करीत दावा करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे ही घुसखोरी भारताची डोकेदुखी झाली आहे.

पाच वर्षांच्या मुलानं दिला शहीद हेमराजला मुखाग्नि!

जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवर पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या दोन जवानांपैकी लान्स नायक हेमराज सिंह यांच्या पार्थीवावर बुधवारी रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारतीय जवानाचे शिर कापून पाकिस्तानी सैनिकांनी नेले

पाकिस्तानी सैनिकांचे कौर्य काल पुन्हा एकदा दिसून आले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय हद्दीत ६०० मीटरपर्यंत घुसखोरी करून पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले.

ठाकरे कुटुंबाची महाराष्ट्रात घुसखोरी - लालूप्रसाद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आज टिकेची झोड उठवली. ठाकरे कुटुंबानेच घुसखोरी केली आहे. मात्र, शिवसेनेन त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष केले आहे.