साध्वी प्रज्ञाला ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारासाठी जामीनाची मागणी

साध्वी प्रज्ञाला ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारासाठी जामीनाची मागणी

साध्वी प्रज्ञाला ब्रेस्ट कॅन्सर आहे, तिला शस्त्रक्रियेची गरज असल्याचं कारण तिच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टाला दिले आहे

आंबेडकर भवनाची इमारत पाडल्याप्रकरणी गुन्हा नोंद सहा जणांना जामीन आंबेडकर भवनाची इमारत पाडल्याप्रकरणी गुन्हा नोंद सहा जणांना जामीन

दादर येथील आंबेडकर भवनाची इमारत पाडल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेल्या सहा जणांना शुक्रवारी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केलाआहे.

साध्वी प्रज्ञा सिंगची जामीन याचिका पुन्हा फेटाळली साध्वी प्रज्ञा सिंगची जामीन याचिका पुन्हा फेटाळली

एका विशेष एनआयए न्यायालयानं आज पुन्हा एकदा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिची जामीन याचिका फेटाळून लावलीय.

भुजबळ यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला भुजबळ यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

मनी लॉ़ड्रिंगप्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळांचा जेलमधला मुक्काम वाढला आहे. भुजबळांचा जामीन अर्ज विशेष ईडी न्यायालयानं फेटाळला. भुजबळ यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांची तुरूंगावासातून सुटका होण्याची आशा मावळली आहे.

छगन भुजबळांना दिलासा नाही छगन भुजबळांना दिलासा नाही

महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉन्ड्रींग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि आणि समीर भुजबळ यांना दिलासा मिळालेला नाही.

आमदार वैभव नाईक यांना अटक आणि सुटका आमदार वैभव नाईक यांना अटक आणि सुटका

सिंधुदुर्गातील कणकवलीचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह सर्व १४ संशयीताना सशर्त जामीन मंजूर करण्यात आलाय.

आसाराम प्रकरणात ३ साक्षीदारांचा मारेकरी जेरबंद आसाराम प्रकरणात ३ साक्षीदारांचा मारेकरी जेरबंद

एका अनुयायाला तीन साक्षीदारांची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

अखेर, जेएनयूच्या कन्हैया कुमारला जामीन मंजूर अखेर, जेएनयूच्या कन्हैया कुमारला जामीन मंजूर

देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैया कुमारला अखेर जामीन मिळालाय. 

कन्हैया कुमारच्या जामीनावर २९ फेब्रुवारीला सुनावणी कन्हैया कुमारच्या जामीनावर २९ फेब्रुवारीला सुनावणी

कन्हैया कुमारच्या जामीनावर २९ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. उमर खालीद शरण आल्यामुळं कन्हैयाच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी दिल्ली पोलिसांनी हायकोर्टात केलीय. 

'कॉमेडी नाईटस'च्या दादीला अटकपूर्व जामीन मंजूर 'कॉमेडी नाईटस'च्या दादीला अटकपूर्व जामीन मंजूर

 'कॉमेडी नाईटस् विथ कपिल'च्या 'पलक'ला अर्थात किकू शारदा याला अटक झाल्यानंतर याच कार्यक्रमातील 'दादी'ला अर्थात अली असगर याच्यावर अटकेची टांगती तलवार होती. परंतु, अली अजगर याला मुंबई हायकोर्टानं एका आठवड्याचा अटकपूर्व जामीन मंजूर केलाय.  

किकू शारदाला एक लाखांच्या मुचलक्यावर जामीन आणि पुन्हा अटक! किकू शारदाला एक लाखांच्या मुचलक्यावर जामीन आणि पुन्हा अटक!

'कॉमेडी नाईटस विथ कपिल' या कार्यक्रमात 'पलक'ची भूमिका साकारणारा अभिनेता किकू शारदा याला बुधवारी अटक करण्यात आली. त्यानंतर एक लाखांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर करण्यात आला. परंतु, फतेहबादला पोहचल्यानंतर कीकूला पुन्हा एकदा अटक करण्यात आलीय.

शाई हल्ला : शिवसेनेच्या सहा कार्यकर्त्यांना अटक, जामीन  शाई हल्ला : शिवसेनेच्या सहा कार्यकर्त्यांना अटक, जामीन

मुंबई भाजपचे माजी सदस्य आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन अध्यक्षचे सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर करण्यात आलेल्या शाई हल्ला प्रकरणी शिवसेनेच्या सहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

एफटीआयआय वाद : विद्यार्थ्यांची जामिनावर सुटका एफटीआयआय वाद : विद्यार्थ्यांची जामिनावर सुटका

एफटीआयआयचा ( फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट) वाद चिघळलाय. मध्य रात्री ज्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आलीय. या विद्यार्थ्यांनी जामीन मिळावा, यासाटी अर्ज केला होता.

राधे माँला दोन आठवड्यांचा दिलासा राधे माँला दोन आठवड्यांचा दिलासा

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँला अंतरिम दिलासा मिळालाय. राधे माँनं अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज हायकोर्टानं मंजूर केलाय. राधे माँला हायकोर्टानं दोन आठवड्यांसाठी अंतरिम दिलासा दिलाय. त्यामुळं दोन आठवड्यांनंतर राधे माँवर अटकेची टांगली तलवार पुन्हा लटकणार आहे. 

'ड्रग्ज' झाले 'अजिनोमोटो'; बेबी पाटणकरला जामीन 'ड्रग्ज' झाले 'अजिनोमोटो'; बेबी पाटणकरला जामीन

२२ कोटी रुपयांच्या एम डी ड्रग्स प्रकरणात मुंबई क्राईम ब्रान्चला जोरदार झटका बसलाय. हे प्रकरण आता मुंबई क्राईम ब्राचंच्या हातून जवळपास निसटल्यात जमा आहे... कारण या प्रकरणातील प्रमुख आरोपी बेबी पाटणकर हिला जामीन मंजूर करण्यात आलाय. 

जान्हवी गडकर हिचा जामीन नाकारला, कोठडी कायम जान्हवी गडकर हिचा जामीन नाकारला, कोठडी कायम

 हिट अँड रन प्रकरणातली आरोपी जान्हवी गडकर हिचा जामीन नाकारण्यात आला आहे. मुंबईतल्या कुर्ला न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिचा जामीन नाकारला. त्यामुळे जान्हवीला आता कोठडीतच रहावं लागणार आहे. 

सुब्रतो रॉय यांना जामीनासाठी द्यावे लागणार १०,००० करोड रुपये! सुब्रतो रॉय यांना जामीनासाठी द्यावे लागणार १०,००० करोड रुपये!

सुप्रीम कोर्टानं आज सहारा प्रमुख सुब्रतो रॉय सहारा यांना सशर्त जामीन मंजूर केलाय. सुब्रतो रॉय यांना जामीन हवा असेल तर त्यांना तब्बल 10 हजार करोड रुपये परत केल्यानंतरच तो मिळू शकेल, असं शिखर न्यायालयानं म्हटलंय. 

'सलमान मुस्लिम  म्हणूनच मिळाला जामीन' 'सलमान मुस्लिम म्हणूनच मिळाला जामीन'

सलमान खान मुस्लिम आहे... म्हणूनच त्याला जामीन मिळाला, असं धर्मांध आणि विखारी वक्तव्य केलंय साध्वी प्राची हिनं... 

पाहा, नेमका का मिळाला सलमानला हायकोर्टात जामीन पाहा, नेमका का मिळाला सलमानला हायकोर्टात जामीन

सलमान खानला 'हिट अॅन्ड रन' प्रकरणात सत्र न्यायालयानं सुनावलेली शिक्षा स्थगित करत हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय. नेमका का मिळाला सलमानला जामीन... पाहुयात...

'देशात गरिबांना न्याय मिळत नाही' - सत्यपाल सिंह 'देशात गरिबांना न्याय मिळत नाही' - सत्यपाल सिंह

सत्र न्यायालयाने सलमानला दिलेल्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि भाजपचे खासदार डॉ. सत्यपाल सिंह यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

सलमानला जामीन नामंजूर झाल्यास....कोणत्या जेलमध्ये ? सलमानला जामीन नामंजूर झाल्यास....कोणत्या जेलमध्ये ?

अभिनेता सलमान खानला जेल की बेल, याबाबात आज फैसला होणार आहे. मात्र, सुनावणीसाठी सलमानला कोर्टात हजर राहण्याची गरज नाही, असं दिसतंय. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाकडं लक्ष लागले आहे. जामीन नामंजूर झाल्यास तो कोणत्या जेलमध्ये जाईल याची चर्चा आहे.