`झी २४ तास`नं चारा छावणीची `बोगसगिरी`केली बंद

सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळ निवारणाच्या कामात गोलमाल सुरू असल्याबाबतचं वृत्त `झी २४ तास`नं प्रसारित केल्यानंतर जिल्हा प्रशासनानं याची गंभीर दखल घेतली आहे.

`झी २४ तास`चा दणका... रिक्षा दरात कपात

डोंबिवलीतली रिक्षा भाडेवाढ मागे घेण्यात आलीय. रिक्षा संघटनांच्या बैठकीनंतर हा निर्णय झालाय. १ ते १५ रुपयांपर्यंतची दरवाढ मागे घेण्यात आलीय. ‘झी २४ तास’नं या दरवाढी संदर्भातली बातमी दाखवली होती. त्यानंतर बैठक घेऊन ही दरवाढ मागे घेण्यात आलीय.

'झी २४ तास'चा दणका, पोलीस निलंबित

उस्मानाबादच्या बलात्कारीत कुमारी मातेची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अझीझ अनदूरकर यांना निलंबित करण्यात आलं आहे.

'झी २४ तास'चा दणका, गावकऱ्यांना पाणीपुरवठा सुरू

सांगलीमधल्या तिकोंडा ग्रामस्थांचा सत्ताधाऱ्यांनी पाणीपुरवठा बंद करून अडवणूक केली होती. मात्र 'झी २४ तास'नं या प्रश्नाला वाचा फोडताच गावकऱ्यांचा पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.

दारु पार्टी, झी २४ तासचा दणका

राज्यभर निवडणुकांचा मौसम आहे.... अशातच एक खळबळजनक बातमी उस्मानाबादमधून.... जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणा-या काँग्रेसच्या व्यंकट गुंड या उमेदवारानं ग्रामस्थांसाठी मटण आणि दारुची पार्टी झोडली आणि तीही चक्क एका शाळेत. झी २४ तासच्या दणक्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.