एक लीटर पेट्रोलमध्ये १०० किलोमीटर धावणार ही भारतीय कार

एक लीटर पेट्रोलमध्ये १०० किलोमीटर धावणार ही भारतीय कार

टाटानं सर्वात स्वस्त कार टाटा नॅनो बाजारात आणून खळबळ माजवली होती. आता कंपनी आणखी एक धमाका करायला सज्ज आहे. यावेळी कंपनी एक अशी कार लॉन्च करतेय, जी नक्कीच सर्वांच्या मनावर राज्य करेल. कारण टाटा मोटर्स भारतात लवकरच १ लीटर पेट्रोलमध्ये १०० किलोमीटर धावणारी कार लॉन्च करणार आहे. २०१६पर्यंत ही कार बाजारात उपलब्ध होईल, अशी आशा आहे.

गुजरातमधील टाटाचा नॅनो कार प्रकल्प बंद ?

गुजरातमधील टाटा मोटर्सचा नॅनो कार प्रकल्प बंद करण्यात आला आहे. नॅनो कारला मागणी नसल्याने टाटा मोटर्सने आपला प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

टाटा मोटर्सच्या`कार्ल स्लेम`यांचा अपघात की आत्महत्या?

टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल स्लेम यांनी आत्महत्या केली असावी ,अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कार्ल स्लेम यांनी बँकॉक येथील एका हॉटेलाच्या २२व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, असल्याचे स्थानिक वृत्तपत्राद्वारे समजते.

कमी किंमतीची टाटा मोटर्सची नवी नॅनो ट्विस्ट दाखल

टाटा मोटर्सने आपल्या नॅनो कारच्या नव्या मॉडेलची दिमाखदारपणे एंट्री केली आहे. दिल्लीतील एका शोरूममध्ये नॅनोची नवीन नॅनो ट्विस्ट दाखल झाली आहे. या कारची किंमत आहे २.३६ लाख रूपये.

नॅनो आता सीएनजीवर धावणार

सामान्य माणसाचा छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद आणि गरज ओळखून टाटाने नॅनोला बाजारात आणलं आणि त्यांना आपल्या स्वप्नांची किल्ली देऊन गेलं. नॅनो नंतर नॅनोचे नवे मॉडेल सीएनजी बाजारात आणण्याचे टाटा कंपनीचे मालक रतन टाटा यांनी ठरवलं

मोठ्या `नॅनो`साठी सायरस सज्ज!

‘स्मॉल वंडर’ ठरलेल्या नॅनोनं भारतात एकच धमाल उडवून दिली होती. त्यामुळेच नॅनो आणि टाटांनी लोकांच्या अपेक्षा आणखी उंचीवर नेऊन ठेवल्यात, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. याच अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आता सायरस मिस्त्री यांच्या खांद्यावर आलीय.

टाटा मोर्टसचा विजय झाला हो झाला....

सिंगूर प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारला जोरदार झटका बसलाय. सिंगूर कायदा घटनाविरोधी असल्याचा निर्णय कलकत्ता हायकोर्टानं दिला.