डॉकयार्ड स्टेशन

इमारत दुर्घटना : ‘तो’ बारा तासानंतर सुखरूप...

डॉकयार्डमधली बाबू गेनू मंडई इमारतीमधून बारा तासानंतर एका कुत्र्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. हा कुत्रा ढिगा-याखाली बारा तास होता. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफच्या जवानांनी या कुत्र्याला बाहेर काढलं

Sep 28, 2013, 11:28 AM IST

डॉकयार्ड इमारत दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री चव्हाण, उद्धव यांची भेट

दुर्घटनेनंतर डॉकयार्डमधल्या बाबूगेनू इमारतीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बचाव कार्याची माहिती घेतली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भेट दिली. चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणालेत.

Sep 28, 2013, 08:04 AM IST

मुंबई डॉकयार्ड इमारत दुर्घटनेत ३१ जणांचा बळी

मुंबईत डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यत ३१ जणांचा बळी गेलाय. तर ३० जण जखमी आहेत. तर अजून सुमारे २७ जण बेपत्ता आहेत. आज एकाला जिवंत बाहेर काढण्यास जवानांना यश आलंय.

Sep 28, 2013, 07:32 AM IST

इमारत कोसळलीः चोरी करणाऱ्या जेसीबी ऑपरेटरची मती ढासळली

एकीकडे असं संकट अक्षरशः कोसळलं असताना त्यातही प्रेतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार झाला. मदतकार्यावर असलेल्या जेसीबीचा ऑपरेटर पैसे आणि दागिने चोरत होता..

Sep 27, 2013, 06:37 PM IST

डॉकयार्ड इमारत दुर्घटना : मृतांची संख्या ११ वर

मुंबईतल्या डॉकयार्ड स्टेशन परिसरात सकाळी पावणेसहाच्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता ११ वर पोहचलीय तर जखमींची संख्या ४२ वर पोहचलीय.

Sep 27, 2013, 12:21 PM IST

डॉकयार्ड इमारत दुर्घटना : ४ जणांना ढिगाऱ्यातून काढले, २ गंभीर

मुंबईतल्या डॉकयार्ड स्टेशन परिसरात सकाळी पावणेसहाच्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. इमारत ढिगाऱ्याखालून ४ जणांना सुरक्षित बाहेर काढले आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना जे जे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Sep 27, 2013, 10:07 AM IST