थंडीत कशी घ्याल त्वचेची खास काळजी थंडीत कशी घ्याल त्वचेची खास काळजी

जसजसे हवामान अधिक थंड होत जाते, आद्र्र आणि हवेशीर वातावरण आपल्या त्वचेला सहज नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळे त्वचा नेहमीपेक्षा अधिक नाजूक होत जाते. त्यामुळेच, त्वचेचे संरक्षक कवच म्हणून काम करणारे उत्कृष्ट स्कीन केअर क्रीम हे नाजूक आणि कोरडय़ा त्वचेसाठी योग्य निवारक उपाय ठरतात. चेहरा आणि शरीरासाठी शिआ बटर, कोका बटर, ग्लिसरिन, कॅफिन, हायल्युरॉनिक एॅसिड, स्कॅलेन, पेट्रोलॅटम यासारखे घटक असणारे खास मॉइश्चरायझर वापरायला हवेत. त्वचेची रंध्रे बंद करण्यासाठी आणि तिला पुनरुज्जीवित करण्यासाठी आंघोळीनंतर लगेचच मॉइश्चरायझर लावणे हा उत्तम पर्याय आहे.