पुणे महापालिका कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार, गणरायाच्या मूर्तींचा अपमान  पुणे महापालिका कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार, गणरायाच्या मूर्तींचा अपमान

हिंजवडीजवळ मुळा नदीपात्रात टाकण्यात आलेल्या या हजारो गणेशमूर्ती.. काही मूर्ती पाण्यात बुडालेल्या तर काहींचे अवशेष नदीकाठावर पडलेले… या मूर्ती याठिकाणी आल्या कुठून या प्रश्नाचं उत्तर जितकं धक्कादायक, तितकंच संतापजनक आहे. पुणे महापालिका कर्मचाऱ्यांचा हा प्रताप आहे.  पुणेकरांनी हौदात तसेच टाक्यांमध्ये विसर्जित केलेल्या मूर्ती पुन्हा नदीच्या स्वछ पाण्यात टाकण्यात आल्या आहेत. रात्रीच्या अंधारात नदीवरील पुलाचा कठडा तोडून मूर्तींनी भरून आणलेले डंपर्स नदी पात्रात रिकामे करण्यात आले आहेत.