नीतेश राणे

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 'गझनी': नीतेश राणे

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 'गझनी': नीतेश राणे

नीतेश यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना 'गझनी' चित्रपटातील आमीर खानच्या भूमिकेशी केली आहे. उद्धव हे 'महाराष्ट्राचे गझनी' आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

Jul 16, 2017, 12:35 PM IST
मुंबईला खड्ड्यात घालणाऱयांना आता खड्ड्यात पुरण्याची वेळ आली आहे - नीतेश राणे

मुंबईला खड्ड्यात घालणाऱयांना आता खड्ड्यात पुरण्याची वेळ आली आहे - नीतेश राणे

आता मुंबईकरांच्या डोक्यावरून पाणी गेले आहे. गेली 25 वर्षे मुंबईकरांना खड्ड्यात घालणाऱया सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने मुंबईकरांच्या जीवाशी खेळ केला आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱयांना पालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवून  खड्ड्यात पुरण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केला. निमित्त होते ’मुंबईत खड्डे की खड्ड्यांची मुंबई’ या आगळ्यावेगळ्या चित्रप्रदर्शनाचे.

Jul 12, 2016, 09:10 PM IST

शिवसेना- नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

शिवसेना कार्यकर्ते आणि नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वरळीत तुंबळ हाणामारी झाली. कामगार संघटनांवरून हा राडा झाला. यावेळी पोलिसांचा लाठीचार्ज केला.

Feb 20, 2014, 06:49 PM IST

उद्धव-मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागे देवाणघेवाण - राणे

रेसकोर्सवर थीमपार्क उभारण्यावरून चांगलंच राजकारण तापलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीमागे देवाण-घेवाण झाल्याचा थेट आरोप उद्योगमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांनी केलाय.

Jun 3, 2013, 04:19 PM IST

‘शिव वडापाव’ही झाका - नीतेश राणे

उत्तर प्रदेशात ज्या पद्धतीने मायावतींचे निवडणूक चिन्ह असलेल्या हत्तींना झाकण्याची कारवाई करण्यात आली, त्याच धर्तीवर शिवसेनेच्य ‘शिववडा या वडापावच्या गाड्यांवरील नावांवरही स्टिकर्स लावण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Jan 10, 2012, 04:42 PM IST