'चला हवा येऊ द्या'मध्ये भरली पत्रकार परिषद

'चला हवा येऊ द्या'मध्ये भरली पत्रकार परिषद

मुंबई : चला हवा येऊ द्यामध्ये पत्रकार परिषद भरली, याला थुक्रटवाडीची सर्व मंडळी पत्रकार म्हणून हजर होती, त्यांच्या प्रश्नाने सर्वांनाच हसून हसून लोटपोट केलं. शेवटी ही पत्रकार परिषद सर्वांना आठवणीत राहिल अशीच ठरली.

'बाळासाहेब असताना सत्तेचा असा वापर झाला नाही' 'बाळासाहेब असताना सत्तेचा असा वापर झाला नाही'

आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.

राज्यात युती सरकार टिकेल, राष्ट्रवादी पाठिंबा देणार नाही - शरद पवार राज्यात युती सरकार टिकेल, राष्ट्रवादी पाठिंबा देणार नाही - शरद पवार

सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची स्वतःचीच भूमिका निश्चित नाही. त्यामुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला पाठिंबा देणार नाही असा खुलासा, शरद पवार यांनी केला आहे. 

 पत्रकार परिषदेत फोन कॉलने काजोल घाबरली  पत्रकार परिषदेत फोन कॉलने काजोल घाबरली

बॉलीवूडची अभिनेत्री काजोल आज पत्रकार परिषदेत होती. काजोलची बहिण तनिषा मुखर्जीचं नाटक द ज्युरीसाठी ही पत्रकार परिषद होती. 

दाऊदला भारतात आणण्याबाबत होत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही- पवार दाऊदला भारतात आणण्याबाबत होत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही- पवार

मुंबई बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिमला भारतात आणण्याबाबत होत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.

मला देशाचा ब्रँड अम्बेसेडर व्हायचंय - सलमान खान मला देशाचा ब्रँड अम्बेसेडर व्हायचंय - सलमान खान

'हिट अँड रन' प्रकरणी जामीन मिळालेल्या सलमान खानला आता देशाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर व्हायचं आहे. जम्मू काश्मीरचा ब्रँड अॅम्बेसेडर होणार का? असा सवाल विचारला असता मला ब्रँड अॅम्बेसेडर व्हायचं असेल तर भारताचा होईन, असं सूचक विधान त्यानं केलं आहे. 

शिवसेनेला कायदा समजत नाही : नारायण राणे शिवसेनेला कायदा समजत नाही : नारायण राणे

शिवसेनेला कायदा समजत नाही, शिवसेना आणि कायदा यांचा संबंध नाही. त्यामुळे प्रचार संपला असताना पत्रकार परिषद घेऊ नये असा कोणताही नियम नसल्याचा टोला माजी मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत लगावला. 

मालेगाव घटनेसाठी भगवा आतंकवाद शब्द वापरला होता - शरद पवार मालेगाव घटनेसाठी भगवा आतंकवाद शब्द वापरला होता - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सरकारविषयी आणि विश्वासमताविषयी आपली भूमिका मांडली. आम्हाला राज्यात स्थिरता हवी आहे, त्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका आहे, असं पवार म्हणाले. 

भाजपची युती तोडण्याची भाषा, मित्र पक्षांची धावपळ भाजपची युती तोडण्याची भाषा, मित्र पक्षांची धावपळ

'झी २४ तास'नं युती तुटल्याचं वृत्त दाखवल्यानंतर राजकीय विश्वात एकच खळबळ उडाली. महायुतीच्या नेत्यांचीही धावपळ सुरू झाली. युती टिकावी अशीच भूमिका घेतल्याचं भाजप सांगत असलं तरी युती तोडण्याची प्रस्तावनाच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत केली. 

राज्याचे  काँग्रेस प्रचारप्रमुख राणेंचा मोदी सरकारवर 'प्रहार'! राज्याचे काँग्रेस प्रचारप्रमुख राणेंचा मोदी सरकारवर 'प्रहार'!

यूपीएची सत्ता असताना परकीय गुंतवणूकीला विरोध दर्शवणाऱ्या 'स्वदेशी' समर्थक भाजपनं सत्तेवर येताच संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस मंजूरी दिली, असं निदर्शनास आणून देत भाजप हा रंग बदलणारा पक्ष असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रचारप्रमुख आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केली आहे. 'अच्छे दिन येणार' असं सांगणाऱ्यांनी महागाईवरुन जनतेचा भ्रमनिरास केला असा टोलाही नारायण राणेंनी मोदी सरकारला लगावला आहे. 

बेळगावात कन्नडीकांचा धिंगाणा, तणाव वाढला बेळगावात कन्नडीकांचा धिंगाणा, तणाव वाढला

बेळगावात कन्नडीकांचा धिंगाणा सुरु आहे. हजारो कन्नड कार्यकर्ते शहरात दाखल झाले आहेत. त्यामुळे येळ्ळूर मध्येही ताणावाचं वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कन्नड रक्षण वेदिका संघटनेचे अध्यक्ष नारायण गौडाला पोलिसांनी अटक केली आहे. 

शिवसेना नेते रावतेंची कर्नाटक पोलिसांनी पत्रकार परिषद उधळली शिवसेना नेते रावतेंची कर्नाटक पोलिसांनी पत्रकार परिषद उधळली

कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषिकांवर अमानुष लाठीमार करत घरात घुसून मारहाण केली. या मराठी भाषिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बेळगावात गेलेले शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पत्रकार परिषद घेण्यास मज्जाव करत त्यांची पत्रकार परिषद उधळून लावली.

माझ्या विरोधात षडयंत्र रचलं जातंय - घोसाळकर

नगरसेविका शितल म्हात्रे यांच्या तक्रारीवरुन अडचणीत आलेले शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळलेत.

`आम आदमी पक्षा`ची पत्रकार परिषद महागड्या हॉटेलमध्ये!

आम आदमी पक्षाचा अकोला जिल्ह्यात पहिलाच जाहीर कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमासंदर्भात आयोजित `आप`ची पत्रकार परिषद शहरातील एका महागड्या हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यामुळं `आम आदमी पक्षा`च्या `खास` पणाची अकोल्यात चांगलीच चर्चा होतेय.

मराठी मुलानं केजरीवालांच्या अंगावर फेकली काळी शाई!

आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेत आज एकच गोंधळ उडाला. एका तरूणानं आज केजरीवालांची पत्रकार परिषद सुरू असताना, त्यांच्या अंगावर काळी शाई उडवली.

सचिन बोलला 'कुठं ना कुठं क्रिकेट खेळतच राहणार'

भारतरत्न सचिन तेंडुलकरनं आज निवृत्त झाल्यावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं सचिन मोकळेपणानं उत्तर दिलं. या पत्रकार परिषदेतल्या भारतीय पत्रकारांसोबतच जगातले पत्रकार उपस्थित होते. यावेळी बोलतांना काही दिवस आपण आराम करणार असून आपण आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या प्रकारे क्रिकेट खेळतच राहणार असल्याचं म्हटलं.

मुख्यमंत्र्याची पत्रकार परिषद `भलत्याच` विषयावर!

मुख्यमंत्र्यांची एक पत्रकार परिषद सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरलीय. दाभोलकर हत्या प्रकरण आणि मुंबई बलात्कार प्रकरण याविषयी महत्त्वाची माहिती मिळेल, अशी अपेक्षा होती.... पण घडलं वेगळंच....

पंतप्रधानपदाचा उमेदवार NDA बैठकीतच- उद्धव

उद्धव ठाकरे यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही.

पत्रकार परिषदेत उदयनराजेंची चौफेर टोलेबाजी!

राष्ट्रवादीचे चर्चीत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सात-यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या बिनधास्त शैलीत चौफेर टोलेबाजी केली.

मराठी'राज'... 'माझी भूमिका मराठी माणसासाठीच...'

माझी भूमिका ही मराठी माणसांसाठीच आहे आणि त्यात अजिबात बदल होणार नाही, असं ठासून सांगत राज ठाकरेंनी एकप्रकारे आपल्या कार्यकर्त्यांच्या कृत्याचं समर्थनच केलंय.

`माझा पुण्यात कोणताही कार्यक्रम नाही`

मनसे आणि `दादां`च्या राष्ट्रवादीमध्ये शाब्दिक चकमकीनंतर केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यस्थाची भूमिका घेतली. राज यांना अडवू नये, अशी सूचना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पवारांनी केलीय. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी मुंबईत पत्रकार परिषद घेतलीय. पाहुयात काय काय म्हणालेत ते या पत्रकार परिषदेत...