पुण्यात मुठा नदीपात्रालगत राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचे आदेश

पुण्यात मुठा नदीपात्रालगत राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचे आदेश

जिल्ह्यात चांगला पाऊस कोसळत आहे. या पावसाने खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. या खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आल्याने मुठा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, नदीपात्रालगत राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत.

कोल्हापुरात पावसाची उसंत,  पूरस्थिती जैसे थे

कोल्हापुरात पावसाची उसंत, पूरस्थिती जैसे थे

पावसाने उसंत घेतली असली तरी पूरस्थिती जैसे थे आहे. पंचगंगा नदी अजूनही इशारा पातळीवरुन वाहत असून जिल्ह्यातील अनेक मार्ग सलग चौथ्या दिवशाही बंद आहेत. त्यामुळे पाण्यातून वाट काढत लोकांना जावं लागते. 

पावसामुळे गोठा कोसळून तीन म्हशींचा मृत्यू , महिला जखमी

पावसामुळे गोठा कोसळून तीन म्हशींचा मृत्यू , महिला जखमी

कर्जत तालुक्यातील शिरसे गाव इथं गुरांचा गोठा कोसळून तीन म्हशींचा मृत्यू झालाय तर एक महिला जखमी झालीय. मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडलीय. 

लोणावळ्यात जोरदार पाऊस, एक्सप्रेस हायवेवरची वाहतूकही मंदावली

लोणावळ्यात जोरदार पाऊस, एक्सप्रेस हायवेवरची वाहतूकही मंदावली

लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसरात अतिवृष्टी झालीये. मागील २४ तासांपासून या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे.

पंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल, जांभळीतील संपर्क तुटला

पंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल, जांभळीतील संपर्क तुटला

जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून पंचगंगा नदीची राजाराम बंधारा पातळी ४१ फूट २ इंच इतकी झालीय.

पुरात अडकलीत दोन माकडं, पाच दिवस झाडावर अडकून

पुरात अडकलीत दोन माकडं, पाच दिवस झाडावर अडकून

कोल्हापूर जिल्ह्यात पुराच्या पाण्यात पाच दिवसांपासून झाडावर अडकून पडलेल्या माकडांना अन्न पुरवण्यात आले आहे. त्यामुळे या माकडांचा जीव वाचलाय.

पूरपरिस्थितीमुळे कोल्हापूर - रत्नागिरी वाहतूक बंद

पूरपरिस्थितीमुळे कोल्हापूर - रत्नागिरी वाहतूक बंद

जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून जांभळी आणि कासारी नदीला देखील पूर आलाय. इतकंच नव्हे तर या पुराचं पाणी बाजारभोगाव इथल्या  बाजारपेठेत शिरले आहे. दरम्यान, कोल्हापूर - रत्नागिरी मार्ग पूर्णत: वहातुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. शिवाजी पुलावरील वहातूक प्रशासनान थांबवली आहे.

सांगलीत वारणा धरणाच्या परिसरात अतिवृष्टी

सांगलीत वारणा धरणाच्या परिसरात अतिवृष्टी

 सांगली  जिल्ह्यात पावसाचा जोर  कायम  असून  वारणा धरणाच्या परिसरात अतिवृष्टी  झाली आहे.  

कोल्हापुरात दोन दिवसापासून पावसाची संततधार

कोल्हापुरात दोन दिवसापासून पावसाची संततधार

कोल्हापुरातही गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं अजिबात उसंत घेतलेली नाही.

चिपळुणात वाशिष्ठी नदीला पूर, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद

चिपळुणात वाशिष्ठी नदीला पूर, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद

रत्नागिरीला पावसाने झोडपून काढलंय. चिपळूणमध्ये पावसाने कहर केलाय. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर आलाय. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक बंद केलीय. 

भारत वि ऑस्ट्रेलिया : पावसामुळे सामन्यात व्यत्यय

भारत वि ऑस्ट्रेलिया : पावसामुळे सामन्यात व्यत्यय

महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनल सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय असल्याने खेळ सुरु होऊ शकलेला नाहीये. 

ओडिशात हवामान खात्याकडून प्रचंड पावसाची शक्यता

ओडिशात हवामान खात्याकडून प्रचंड पावसाची शक्यता

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये.

निम्मा देश पाण्याखाली, बळींची संख्या ७३ वर

निम्मा देश पाण्याखाली, बळींची संख्या ७३ वर

सध्या निम्मा देश पाण्याखाली गेलेला दिसतोय. देशाच्या बहुतांशी भागात वरुणराजानं जोरदार कमबॅक केलं असून ईशान्य भारतात पूराचा हाहाकार पाहायला मिळतोय. 

सलग सहाव्या दिवशीच्या पावसानं कोयनेच्या साठ्यात वाढ

सलग सहाव्या दिवशीच्या पावसानं कोयनेच्या साठ्यात वाढ

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग सहाव्या दिवशी मुसळधार पावसाची संततधार कायमच राहिल्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासात तब्बल 5 टीएमसीने वाढ झाली आहे. 

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, संगमेश्वर-चिपळुणात पूर परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, संगमेश्वर-चिपळुणात पूर परिस्थिती

सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले. मध्यरात्री थोडीशी उसंत घेतलेल्या पावसानं सकाळपासून पुन्हा धुवॉधार बॅटिंग सुरु केलीय. रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. 

विदर्भाला पावसानं झोडपलं!

विदर्भाला पावसानं झोडपलं!

विदर्भातल्या अकोला, वर्धा आणि भंडारा जिल्ह्याला जोरदार पावसानं झोडपलं आहे.

विरारमध्ये पावसामुळे १२ गावांचा संपर्क तुटला

विरारमध्ये पावसामुळे १२ गावांचा संपर्क तुटला

आज सलग दुसऱ्या दिवशी विरारमध्ये १२ गावांचा संपर्क तुटला आहे. भाताने पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्यानं ही परिस्थिती उद्धभवली आहे. आज सकाळ पासून पावसाने उसंत घेतल्याने पुलावरील पाण्याची पातळी कमी झाली पण अजूनही वाहतूक सुरु होऊ शकलेली नाही. त्यामुळे गावांचा संपर्क तुटलेलाच आहे.

महाड बाजारपेठेत सावित्रीचे पाणी घुसले, सतर्कतेचा इशारा

महाड बाजारपेठेत सावित्रीचे पाणी घुसले, सतर्कतेचा इशारा

रायगड जिल्ह्यात महाड पोलादपूर भागात जोरदार पाऊस सुरू आहे. महाडजवळून वाहणाऱ्या सावित्री नदीतली पाणीपातळी कमालीची वाढलीय. पुराचं पाणी महाड शहरात घुसलेय.

मुसळधार पावसाने भिवंडीत  ३० ते ४० घरांमध्ये पाणी शिरले

मुसळधार पावसाने भिवंडीत ३० ते ४० घरांमध्ये पाणी शिरले

भिवंडी महापालिका क्षेत्रासोबतच तालुक्यात रात्रीपासून पड़त असलेल्या पावसाने अनेक भागात पाणी साचलेय. नदीनाका परिसरात सुमारे ३० ते ४० घरांमध्ये पाणी शिरलं. यामुळे महापालिकेचे नालेसफाई झाल्याचे दावे वाहून गेले. 

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यात वाढ

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यात वाढ

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आठवडाभरापासून पावसानं दमदार हजेरी लावलीय. त्यामुळं पाणीसाठा वाढायला लागलाय. तानसा, मोडकसागर, भातसा या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेय.

विदर्भाला मुसळधार पावसाने झोडपले

विदर्भाला मुसळधार पावसाने झोडपले

मुंबई आणि कोकणात जोरदार पाऊस सुरू असतानाच, विदर्भालाही मुसळधार पावसानं झाडपून काढलंय.  सोमवारी मध्यरात्री यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्या सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आलीय. चार तासात 135 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आलाय.