दारु कंपन्यांना पाणी देण्यावरुन राज्य सरकारला कोर्टाने झापले

दारु कंपन्यांना पाणी देण्यावरुन राज्य सरकारला कोर्टाने झापले

दारू कंपन्यांना पाणी पुरवठा करण्याबाबत आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. आधी पिण्यासाठी मग शेतीसाठी आणि त्यानंतर उद्योगांसाठी अशी पाण्याची क्रमवारी असताना शेतीला डावलून उद्योगांना पाणी कसं देता, असा सवाल कोर्टाने सरकारला विचारलाय.

नगर-नाशिक जिल्ह्यातील पाण्याचा मराठवाड्याकडील प्रवास सुरू नगर-नाशिक जिल्ह्यातील पाण्याचा मराठवाड्याकडील प्रवास सुरू

अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून सोडलेल्या पाण्याचा जायकवाडी धरणाकडे प्रवास सुरु झाला आहे. यात मुळा धरणातून जवळपास पाऊण टीएमसी, भंडारदरा आणि निळवंडे मधून साडेसहा टीएमसी, गंगापूर धरणातून १ पॉईंट ३६ टीएमसी तर दारणा धरणातून सव्वा तीन टीएमसी पाणी सोडण्यात आलं आहे. 

मीरा-भाईंदरमध्ये तब्बल २०० सोसायटयांची तहान टँकरवर मीरा-भाईंदरमध्ये तब्बल २०० सोसायटयांची तहान टँकरवर

 मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातल्या तब्बल २०० सोसायटयांना टँकरच्या पाण्यावर दिवस काढावे लागतायत. पाण्याची कमतरता असल्यामुळे पालिकेकडे पैसे भरूनही तब्बल 36 तासांनी, तोदेखील अपुरा पुरवठा या इमारतींना केला जातोय..

झी मीडियाचा दणका, दलित समाजाला मिळाले पाणी झी मीडियाचा दणका, दलित समाजाला मिळाले पाणी

जिल्ह्यातल्या खिरवडे गावातल्या दलित समाजावर पिण्याच्या पाण्यासाठी अघोषित बहिष्कार टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. या विषयाला वाचा फोडल्यानंतर दलित समाजाला न्याय मिळाला.

पाणीप्रश्न : भुजबळांचे विधानसभा वेलमध्ये ठिय्या आंदोलन पाणीप्रश्न : भुजबळांचे विधानसभा वेलमध्ये ठिय्या आंदोलन

नाशिक जिल्ह्यातल्या नद्यांचं पाणी गुजरातला वळवण्यावरुन विधानसभेत पुन्हा एकदा वाद उफाळून आलाय. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेत ठिय्या आंदोलन केले.

दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी सोडण्यास अहमदनगरवासियांचा विरोध दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी सोडण्यास अहमदनगरवासियांचा विरोध

दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याला पाणी सोडण्यास अहमदनगरवासियांचा विरोध अजूनही कायमच आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडीच्या जलसाठ्यात 8 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिलेत. मात्र त्याविरोधात हायकोर्टात समाधानकारक निर्णय न मिळाल्यानं, प्रवरा सहकारी साखर कारखाना आता सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. 

मराठवाड्यासाठी सर्व आमदार एकत्र!

मराठवाड्यावरील होणारा अन्याय आता सहन करणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत आज मराठवाड्यातील सर्वच आमदार औरंगाबादेत एकत्र आले.

पुण्यात पाणीबाणी

पुण्यामध्ये लवकरच पाणीबाणी येणार आहे. महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावातील नागरिकांना दरडोई ४० लिटर इतकेच पाणी देण्याबाबतचे धोरण प्रशासनानं तयार केलं आहे. त्याच प्रमाणे अनधिकृत नळजोड दंड भरून नियमित करण्याचा प्रस्तावदेखील सादर करण्यात आला आहे.

IPL : सामान्यांचं पाणी सामन्यांना!

महाराष्ट्रात दुष्काळानं थैमान मांडलय. दुष्काळग्रस्ताचे डोळ्यातलं पाणी तर केव्हाच आटलंय.

घोटभर पाण्यासाठी सख्या भावालाच फेकले विहिरीत

विहिरीतून पाणी घेण्याच्या वादावरून सख्या भावाला विहिरीत फेकून हत्या केल्याची खळबळजनक घटना अहमदनगरमध्ये घडलीये. पाराजी पुंड यानं आपल्या दोन मुलांच्या आणि सुनेच्या मदतीने सख्या भावाचा खून केलाय.

अहमदनगरमध्ये पाणी पेटले, आमदारांचे आत्मदहन?

अहमदनगरमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. पाण्याच्या प्रश्नावर भाजप आमदार राम शिंदे यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन राम शिंदे यांना ताब्यात घेतलं यावेळी पोलीस आणि शिंदे यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली.पाणीप्रश्न चांगलाच पेटलाय. शेतक-यांनी मुळा प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यांचे दरवाजे उघडून पाणी सोडलयं.

विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर `पाणी`...

सर्वोच्च न्यायालयानं देशभरातील शाळांमध्ये मुलभूत सोयी येत्या सहा महिन्यांत पुरवण्याचे आदेश दिलेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे विद्यार्थी सध्या डोक्यावरून पाणी वाहून शाळेत आणतात... पाण्याच्या टाक्या आहेत पण, रिकाम्या...

कालव्याद्वारे सोडवला शेतकऱ्यांचा प्रश्न

दुष्काळात सगळीकडे ओरड होत असली तरी वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शेतकरी मात्र सुखावलाय. इथल्या पूर्ती साखर कारखान्याच्या अभियंत्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी विधायक कामाचा दाखला देत अवघ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याचा विवंचनेतून मुक्त केलंय.

पाणीप्रश्नावर राष्ट्रवादीची 'बंद'ची हाक

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सीना कोळेगाव प्रकल्पाचे पाणी सोलापूरला देण्याच्या निर्णयावरून पुन्हा एकदा संघर्ष पेटलाय. सोलापूरला एक टीमसी पाणी देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं परांडा तालुका बंदी हाक दिली आहे.