पुणे स्फोट

पुणे स्फोट : सीसीटीव्ही फुटेज 'झी 24 तास'च्या हाती

पुणे स्फोट : सीसीटीव्ही फुटेज 'झी 24 तास'च्या हाती

पुण्यात फरासखाना पोलीस चौकीजवळ 10 जुलैला स्फोट नेमका कसा झाला होता याचं सीसीटीव्ही फुटेज झी 24 तासच्या हाती आलेय.10 जुलैला दुपारी 2 वाजून 2 मिनिटांनी हा बॉम्बस्फोट झाला होता. 

Jul 30, 2014, 08:34 AM IST
इंडियन मुजाहिद्दीनच्या टार्गेटवर पुणे

इंडियन मुजाहिद्दीनच्या टार्गेटवर पुणे

पुण्यात झालेल्या स्फोटासाठी  वापरण्यात आलेली मो़डस ऑपरेंडी पाहता यात इंडियन मुजाहिद्दीनच्या नवीन स्लीपर सेलचा हाथ असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असल्याचं एटीएसच्या एका वरिष्ठ अधिका-यांनं सांगितलंय. 

Jul 10, 2014, 06:36 PM IST

बॉम्ब स्क्वॅडकडे बॉम्ब सुटच नाहीत!

पुण्यात झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटांच्या घटनेला सात दिवस झालेत. मात्र बॉम्ब सुट शिवायच जवानांनी जीवावर उदार होऊन, फक्त बुलेट प्रूफ जॅकेट्स घालून दोन बॉम्ब निकामी केलेत. ते बॉम्ब फुटले असते तर मृत्यू अटळ होता

Aug 8, 2012, 07:53 AM IST

पुणे स्फोट: CCTV फुटेजमधून धागेदोरे हाती

पुणे साखळी बॉम्बस्फोटाच्या तपासात एटीएसच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागलेत. सीसीटीव्ही फूटेजच्या तपासातून दोन संशयित आरोपींच्या सहभागाची माहिती पुढे आलीय.

Aug 8, 2012, 03:34 AM IST

‘तपास सुरू आहे...’ दॅटस् इट!

राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसंच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणांच्या प्रमुखांची बैठक घेतली. त्यानंतर दोघांनीही सारखीच प्रतिक्रिया दिलीय... दोघंही म्हणाले ‘अधिक काही बोलता येणार नाही, तपास सुरु आहे...’

Aug 5, 2012, 03:54 PM IST

पुण्यातील स्फोट गंभीर प्रकरण - गृहमंत्री शिंदे

पुण्यात झालेले साखळी स्फोट ही गंभीर बाब आहे. त्यादृष्टीने चौकशी सुरू आहे. आताच या स्फोटाबाबत काही माहिती सांगणे योग्य होणार नाही. कारण केंद्राने आणि राज्याने याची गंभीर दखल घेतली आहे, अशी माहिती केंद्रीय ग़हमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

Aug 4, 2012, 10:52 PM IST

आज सुशीलकुमार शिंदे पुण्यामध्ये

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज पुणे भेटीवर येणार आहेत. दुपारी चार वाजता ते पुण्यात दाखल होणार आहेत. पुणे स्फोटानंतर शिंदे पहिल्यांदाच पुण्यात येत आहेत.

Aug 4, 2012, 04:03 PM IST

पुण्यातील स्फोटांमागे इंडियन मुजाहिदीन?

पुणे बॉम्बस्फोटामागे कोणती संघटना आहे याचा अजून उलगडा झालेला नसला तरी यामागे इंडियन मुजाहिदीन ही दहशतवादी संघटना असल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी वर्तवला आहे.

Aug 3, 2012, 10:13 AM IST

पुण्यात स्फोटांची मालिका

 

 

 

व्हिडिओ पाहा :

 

Aug 2, 2012, 07:37 PM IST

देशात अस्थिरता पसरवण्याचा कट - मोदी

आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्यांबाबत केंद्र सरकारनं ‘शून्य सहिष्णुता नीती’चा अवलंब करायला हवा, असं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. काल पुण्यात झालेल्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलंय.

Aug 2, 2012, 06:24 PM IST

दहशतवादी हल्ला आहे, बोलणं घाईचं- आबा पाटील

पुण्यात झालेल्या स्फोटांमागे दहशतवाद्यांचा हात आहे हे बोलणं घाईचं ठरेल असं गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी म्हटलं. स्फोटानंतर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी घटनास्थळाचा दौरा केला

Aug 2, 2012, 09:22 AM IST

पुणे दहशतवाद्यांची धर्मशाळा – खडसे

पुण्यात झालेल्या स्फोटानंतर विरोधी पक्षाने सरकारवर सडकून टीका केली आहे. पुणे धर्मशाळा झाली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. ते म्हणाले, 'आजच पदभार स्विकारलेले गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज पुण्यात येणार होते आणि त्याच वेळी पुण्यात स्फोट होत आहेत हा काही योगायोग वाटत नाही.

Aug 1, 2012, 09:59 PM IST

पुण्यात चार बॉम्बस्फोट, एक जखमी

पुण्यातील गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावर संध्याकाळी आठच्या सुमारास पाच ठिकाणी कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट झाले . गरवारे कॉलेज, बालगंधर्व रंगमंदिर, मॅकडोनाल्ड आणि देना बॅंकेसमोर झालेले हे स्फोट कमी तीव्रतेचे असले तरी बॉम्बस्फोटच असून, यात एक जण जखमी झाला आहे. आर डेक्कन मॉलजवळ पाचवा स्फोट झाला आहे.

Aug 1, 2012, 09:23 PM IST