चार महिन्यांपासून १३ वर्षीय मुलीवर सतत बलात्कार

Last Updated: Tuesday, March 18, 2014, 11:41

मुंबईतील परळ भागात एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर मागील चार महिन्यांपासून बलात्कार होत असल्याची घटना उघडकीस आलीय. भीतीपोटी या मुलीनं आपल्यावरील अत्याचाराबाबत मौन बाळगलं होतं. मात्र काल ज्यावेळी घरच्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

प्रेमाचा विरोध केला म्हणून आईला पाजला विषारी चहा

Last Updated: Friday, March 14, 2014, 18:19

मुरादाबादच्या मझोला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शाहपूर इथं एक धक्कादायक प्रकार घडलाय. प्रेमाला विरोध करणाऱ्या आईला मुलीनं विषारी चहा पाजला. गुरूवारी सकाळी हा प्रकार घडल्यानंतर महिलेच्या शेजाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती केलंय. त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे.

धक्कादायक: तिसरीही मुलगी झाली म्हणून विवाहितेला जाळलं

Last Updated: Tuesday, December 31, 2013, 18:42

पुरोगामी महाराष्ट्रात रोज नवनवीन धक्कादायक घटना घडतायेत. नागपूरात असाच एक गंभीर प्रकार घडलाय. तिसरीही मुलगीच जन्मली म्हणून संतापलेल्या सासू-सासर्‍यानं आपल्या सुनेचा जाळून खून केल्याची खळबळजनक घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवनगर इथं घडली. दरम्यान, पोलिसांनी या दोघांनाही अटक केलीय.

व्हिडिओ : पोलीस स्टेशनमध्ये डिस्को...

Last Updated: Monday, December 30, 2013, 12:03

पोलीस स्टेशनमध्ये डिस्को... तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत. पोलीस स्टेशनमध्ये डीस्कोचा प्रकार घडलाय हरियाणामध्ये…

अनैतिक संबंधातून पिंपरीत ठेकेदाराची हत्या

Last Updated: Sunday, December 29, 2013, 20:14

पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या घटना थांबता थांबत नाहीयेत. शहरात आज सकाळी एका ठेकेदाराची हत्या करण्यात आलीय. धक्कादायक म्हणजे त्याच्याच कामगाराने त्याची हत्या केलीय. ही हत्या अनैतिक संबंधांच्या संशयावरुन झाल्याची माहिती मिळतेय.

मुस्लीम आहे सांगितलं म्हणून वाचला त्याचा जीव!

Last Updated: Friday, September 27, 2013, 17:25

जम्मूमध्ये क्रूर दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी कसं थैमान घातलं याच्या हादरवून टाकणाऱ्या कथाच आता समोर येत आहेत. या दहशतवाद्यांनी एका दुकानदाराला केवळ तो मुस्लिम आहे असं त्यानं सांगितलं म्हणून सोडून दिलं.

मुंबई गँगरेप: ‘त्या’ नराधमांचा आणखी एक गुन्हा उघड

Last Updated: Tuesday, September 03, 2013, 13:30

मुंबई बलात्कार प्रकरणातल्या पाच आरोपींविरोधात आणखी एक तक्रार दाखल झालीय. एका महिलेनं शक्ती मिलमध्येच ३१ जुलैला आपल्यावर गँगरेप झाल्याची तक्रार दाखल केलीय. ना. म. जोशी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित मुलीनं गँगरेपप्रकरणातल्या तीन आरोपींना ओळखलंय.

गुवाहाटीमध्ये पोलीस स्टेशनजवळ स्फोट

Last Updated: Monday, July 29, 2013, 07:36

गुवाहाटीतल्या रेल्वे स्थानकानजीकच्या गजबजलेल्या फलटन बाजारात पोलिस स्टेशनच्या बाहेर झालेल्या ग्रेनेडच्या स्फोटात सहा जण जखमी झाले आहेत.

एसटी धावणार महिलांच्या सुरक्षेसाठी...

Last Updated: Tuesday, February 05, 2013, 14:49

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी राज्य परिवहन महामंडळाने म्हणजेच एसटीनं पुढाकार घेतला आहे.

पोलीस स्टेशनमध्ये हाणामारी

Last Updated: Thursday, February 09, 2012, 08:32

परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये निवडणुकीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटांनी लाठ्याकाठ्यासह दगडफेक केली. जमावानं गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये घुसून दगडफेक आणि मोडतोड केली आहे.

रिक्षाचालकाला सावकाराची मारहाण

Last Updated: Wednesday, November 30, 2011, 16:36

वसईत सावकारी कर्जातून एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली. तुलसीराम यादव असं या रिक्षाचालकाचं नाव असून, झेंडाबाजार परिसरात या रिक्षाचालकाला बेदम मारहाण करण्यात आली.

डोंबिवलीत दरोडा सत्र, पोलीस मात्र झोपेत गर्क..

Last Updated: Monday, November 28, 2011, 06:49

डोंबिवलीत दरोड्यांच सत्र सुरुच आहे. विशेष म्हणजे मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कालच दरोडा पडला होता. त्यानंतर आजही याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत दरोडा पडलाय. खोनी गावात हा दरोडा पडला असून साडेतीन लाखांचा ऐवज लुटून नेण्यात आला.

'सद रक्षणाय' की 'सदा झोपणाय'....???

Last Updated: Sunday, November 27, 2011, 14:25

कल्याण-डोंबिवलीमध्ये पोलीस काय करत आहेत ? असा संतप्त सवाल सध्या सामान्य नागरिकांकडून विचारला जातो आहे. त्याचं उत्तर पहा झी 24 तासवर. दरोडेखोरांनी हल्ला केल्यानंतर सर्वसामान्यांनी जीवाची पर्वा न करता सामना केला.