पोलिसांना लाच द्यायला त्याला आईचं मंगळसूत्र विकावं लागलं

पोलिसांना लाच द्यायला त्याला आईचं मंगळसूत्र विकावं लागलं

पोलिसांना लाच देण्यासाठी आईचे मंगळसूत्र विकावे लागल्याची घटना नांदेडमध्ये समोर आलीय. 

पोलिसांचा वर्दीतील झिंग झिंग झिंगाट डान्स...

पोलिसांचा वर्दीतील झिंग झिंग झिंगाट डान्स...

तुम्ही पोलिसांना वर्दी घालून नाचताना पाहिलं आहे का... नाही तर आम्ही तुम्हांला जो व्हिडिओ दाखविणार आहोत, त्यात सैराटच्या झिंग झिंग झिंगाट गाण्यावर बेभान होऊन नाचणारे ट्रॅफीक पोलीस दिसत आहे. 

हरवलेल्या चिमुरडीला पोलिसांत सापडलं मायेचं छत्रं!

हरवलेल्या चिमुरडीला पोलिसांत सापडलं मायेचं छत्रं!

पोलिसांमध्ये एक हळवा माणूस दडलेला असतो याचा प्रत्यय औरंगाबादच्या जवाहरनगर पोलीस ठाण्यात आला. एका किडनॅप झालेल्या मुलीला जंग जंग पछाडत पोलिसांनी शोधलं आणि तेव्हापासून ही चिमुकली पोलिसांच्या मायेत अडकली... आता औरंगाबादचं जवाहरनगर पोलीस ठाणं म्हणजे या मुलीसाठी आपुलकीची, खेळण्याची जागा आहे... 

 व्हॉटसअॅपवर व्हायरल झालेला हाच तो 'खाकीतला माणूस'

व्हॉटसअॅपवर व्हायरल झालेला हाच तो 'खाकीतला माणूस'

पोलिसांमध्ये एक हळवा माणूस दडलेला असतो याचा प्रत्यय, औरंगाबादच्या जवाहरनगर पोलीस ठाण्यात आला.

भिलवडी बलात्कारप्रकरणी एकाला अटक

भिलवडी बलात्कारप्रकरणी एकाला अटक

भिलवडी बलात्कारप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. माळवाडीमधील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार करुन, तिची हत्या करण्यात आली होती.

सौरव गांगुलीला धमकीचं पत्र पाठवणाऱ्याला अटक

सौरव गांगुलीला धमकीचं पत्र पाठवणाऱ्याला अटक

टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीला धमकीचे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलीय. 

अपंग भिकाऱ्याला पोलिसाची अमानुष मारहाण

अपंग भिकाऱ्याला पोलिसाची अमानुष मारहाण

मनमाड रेल्वे स्थानक बुकिंग ऑफिस परिसरात झोपलेल्या एका अपंग भिकाऱ्याला मनमाड लोहमार्ग पोलिसांनी लाठ्याकाठ्यांनी अमानुषपणे बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

ओम पुरी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झालाच नाही?

ओम पुरी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झालाच नाही?

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या निधनाच्या बातमीनं अख्खं बॉलिवूड हळहळलं... सुरुवातीला हृदयविकाराच्या धक्क्यानं ओम पुरी यांचं निधन झालं असं सांगितलं गेलं असलं तरी आता मात्र पोस्टमॉर्टेम रिपोर्टनंतर त्यांच्या मृत्यूभोवतालचं गूढ आणखी वाढलंय. 

जेव्हा रक्षकच होतात भक्षक

जेव्हा रक्षकच होतात भक्षक

जर रक्षकच भक्षक झाले तर याला काय म्हणणार. छत्तीसगडमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात तैनात पोलिसांवर १६ आदिवसी महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. 

मुंबईतील व्यापाऱ्याचे अपहरण, तिघांना रायगड येथे अटक

मुंबईतील व्यापाऱ्याचे अपहरण, तिघांना रायगड येथे अटक

मुंबईतल्या व्यावसायिकाचं अपहरण करून त्याच्याकडची ४० लाखांची रोकड लुटणा-या तिघा पोलीस कर्मचा-यांना रायगड पोलिसांनी अटक केलीय. त्यांना १३ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय.

खाक्या वर्दीतला माणूस... वृद्धांना मायेचा आधार!

खाक्या वर्दीतला माणूस... वृद्धांना मायेचा आधार!

खाकी वर्दीच्या आत एक माणूस लपलेला असतो हेच दाखवून दिलंय रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण पोलिसांनी...

२००० रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या फॅक्टरीचा भांडाफोड, बाजारात ७० लाख चालविलेत

२००० रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या फॅक्टरीचा भांडाफोड, बाजारात ७० लाख चालविलेत

देशाच्या चलनातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर रिर्झव्ह बॅंकेने चलनात ५०० आणि २००० रुपयांची नव्या नोटा चलनात आणल्या. या नव्या नोटांची कोणीही नक्कल करु शकणार नाही, असे  सांगण्यात आले. मात्र, देशात काही ठिकाणी २००० रुपयांच्या नकली नोटा सापडत आहेत. तर उत्तर प्रदेशात चक्क नोटा छपाईंचा कारखानाच असल्याचे समोर आले. या कारखान्यातून ७० लाखांचे चलन बाजारात आले आहे.

गुन्हेगारांची कुंडली उघडणार 'चरित्र' अॅप!

गुन्हेगारांची कुंडली उघडणार 'चरित्र' अॅप!

पोलिसांनी आपला खाक्या दाखवला की सराईत गुन्हेगांराच्याही कुंडल्या जगासमोर येतात. पण, आता मात्र केवळ संशयिताचे नाव समजताच त्या गुन्हेगारांची कुंडली मिळणार आहे. 'चरित्र' या सॉफ्टवेअरमुळे ठाणे पोलिसांना आता अवघ्या काही मिनिटांमध्ये गुन्हेगारांची कुंडली मिळणार आहे. 

‘चरित्र’ देणार काही मिनिटांमध्ये गुन्हेगारांची पोलिसांना कुंडली

‘चरित्र’ देणार काही मिनिटांमध्ये गुन्हेगारांची पोलिसांना कुंडली

  ‘चरित्र’ या सॉफ्टवेअरमुळे ठाणे  पोलिसांना आता अवघ्या काही मिनिटांमध्ये गुन्हेगारांची कुंडली मिळणार आहे. 

मुंबईतील जेलमध्ये भ्रष्टाचाऱ्यांनी बनवलं रेट कार्ड...

मुंबईतील जेलमध्ये भ्रष्टाचाऱ्यांनी बनवलं रेट कार्ड...

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मोबाईलचा मुक्त संचार झी 24 तासने उघड केल्यावर आता कुंपण राखणारेच भ्रष्ट झाल्याचं समोर आलंय. मुंबई विभागातल्या भ्रष्टाचाराही नमूना आता समोर आलाय. विशेष म्हणजे भ्रष्टाचा-यांनी आपलं रेट कार्डचं बनवलंय. 

लोकं पोलीस ठाण्यात येताना घाबरायला नको - मुख्यमंत्री

लोकं पोलीस ठाण्यात येताना घाबरायला नको - मुख्यमंत्री

पोलिसांना त्यांची विश्वासार्हता टिकवायची असेल तर पोलिसांना त्यांची कार्यपद्धती बदलावी लागेल. इंग्रजांच्या काळातील पोलिसिंग आता चालणार नाही. लोकं पोलीस ठाण्यात येताना घाबरायला नको. त्यांना न्यायाचा भरोसा असायला हवं असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

Good News  : पोलिसांची ड्युटी आता ८ तासांची!

Good News : पोलिसांची ड्युटी आता ८ तासांची!

पोलिसांसाठी एक आनंदाची बातमी. पोलिसांना नव्या वर्षाची भेट मिळालीय. पोलिसांची ड्यूटी आता आठ तासांचीच होणार आहे.

दारुड्यांना धडा शिकवण्यासाठी पोलिसही 'कॅशलेस'!

दारुड्यांना धडा शिकवण्यासाठी पोलिसही 'कॅशलेस'!

न्यू इयर सेलिब्रेशनचा धांगडधिंगा लक्षात घेता मुंबई पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात जोरदार मोहीम सुरू केलीय. यावर्षी पोलीस कॅशलेस पद्धतीने दंड वसूल करणार आहेत. मुंबईत मद्य पिऊन गाडी चालणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढतच चाललीय. यावर अंकूश आणण्यासाठी मुंबई पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केलेत. पण त्यांना यश येताना दिसत नाहीय.

थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांमध्येही दिसणार मुंबई पोलीस!

थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांमध्येही दिसणार मुंबई पोलीस!

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि थर्टी फर्स्टच्या पार्ट्या लक्षात घेता मुंबई पोलिसांनी मुंबईत महिलांसाठी चोख बंदोबस्त ठेवलाय. त्यासाठी थोडेथिडके नव्हे तर तब्बल सात हजार पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

पवई हाऊटबोट दुर्घटनेतील तीन जणांचे मृतदेह हाती

पवई हाऊटबोट दुर्घटनेतील तीन जणांचे मृतदेह हाती

मुंबईतल्या पवई तलाव हाऊसबोट दुर्घटनेतल्या बेपत्ता तीन जणांचे मृतदेह अखेर सापडले आहेत. तब्बल 19 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्या तिघांचे मृतदेह सापडले आहेत. 

मोदींच्या कार्य़क्रमात विघ्न नको,  संजय निरुपम पोलिसांच्या नजरकैदेत

मोदींच्या कार्य़क्रमात विघ्न नको, संजय निरुपम पोलिसांच्या नजरकैदेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत.  पोलिसांनी खबरदारी घेतली असून संजय निरुपम यांना घरातच नजरकैदेत ठेवले आहे.