बसला अपघात

मुंबई-गोवा हायवेवर दोन भीषण अपघात, २ ठार, २२ जखमी

मुंबई-गोवा हायवेवर दोन भीषण अपघात, २ ठार, २२ जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर गॅस सिलेंडर नेणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला असून अपघातामुळे गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय. दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झालाय. यात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर पेण इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

May 24, 2015, 08:58 AM IST

बसला भीषण अपघात, १९ जण ठार तर १७ जखमी

बुलडाण्यातल्या संग्रामपूर तालुक्यात पार्थुडा-शेगाव ही एसटी बस खिरोडा इथल्या पूर्णा नदीच्या पुलावरुन कोसळून झालेल्या भीषण अपघातात १९ जण ठार झालेत तर १७ प्रवासी जखमी झालेत. जखमींवर अकोला रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Sep 26, 2012, 11:48 PM IST

बसला भीषण अपघात; ३२ जण ठार

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नळदुर्गजवळ एका खासगी बसला भीषण अपघात झालाय. नळदुर्गजवळच्या कुर्टा गावाजवळ एका पुलावरून ही बस २० फूट खाली नदीत कोसळली. या भीषण अपघातात ३२ जण ठार झालेत तर १५ जण गंभीर जखमी झालेत. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

Jun 16, 2012, 12:20 PM IST