छत्तीसगड येथील बस अपघातात १३ ठार, ५३ जखमी

छत्तीसगड येथील बस अपघातात १३ ठार, ५३ जखमी

छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यात मध्यरात्री एका छोट्या पुलावरुन बस कोरड्या नदीत कोसळून झालेल्या अपघातात १३ ठार तर ५३ प्रवासी जखमी झालेत.

ठाण्यात दारुड्या बस चालकाने पोलिसाला चिरडलं ठाण्यात दारुड्या बस चालकाने पोलिसाला चिरडलं

टीएमटीच्या मद्यधुंद बस चालकानं एका पोलीस शिपायाला चिरडलंय. या प्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली.

नवसारी बस दुर्घटनेतील मृतांचा आकडा ४० वर, महाराष्ट्रातील ६ नवसारी बस दुर्घटनेतील मृतांचा आकडा ४० वर, महाराष्ट्रातील ६

एस टी पूर्णा नदीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातातील मृत्यांचा आकडा ४० वर पोहचलाय. यात महाराष्ट्रीतल ६ जण जणांचा समावेश आहे. या अपघातात २३ जण जखमी झालेत. 

कल्याणमध्ये बसने मुलीला उडवलं, मुलगी जागीच ठार कल्याणमध्ये बसने मुलीला उडवलं, मुलगी जागीच ठार

कल्याणमध्ये शिळ रोड नजीक तीन वर्षांच्या एका मुलीला बसनं चिरडलं. यात ती जागीच ठार झाली. त्यामुळे संतप्त जमावाने बस दगडफेक केली.

गोदावरी नदीच्या पात्रात बस कोसळून २२ ठार गोदावरी नदीच्या पात्रात बस कोसळून २२ ठार

आंध्र प्रदेशच्या धवलेश्वरम इथं गोदावरीच्या पात्रात बस कोसळून एकाच कुटुंबातल्या २२ जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये सहा लहान मुलं आणि ८ महिलांचा समावेश आहे.

पन्ना इथं बस पूलावरून पडली, 35 जणांचा जळून मृत्यू पन्ना इथं बस पूलावरून पडली, 35 जणांचा जळून मृत्यू

एका खाजगी कंपनीची बस नाल्यात पडल्यानं आग लागून त्यातील 35 प्रवाशांचा जळून मृत्यू झालाय. तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पांडव झऱ्याजवळ घडली.

एसटी बसचा अपघात, १५  शाळकरी विद्यार्थी जखमी एसटी बसचा अपघात, १५ शाळकरी विद्यार्थी जखमी

अचलपूरजच्या चमक गावाजवळ एका एसटी बसला अपघात झालाय. बस उलटल्यामुळं १५ जणं जखमी झाले आहेत. 

इजिप्तमध्ये दोन बसना भीषण आग, 33 ठार इजिप्तमध्ये दोन बसना भीषण आग, 33 ठार

इजिप्तमधील दक्षिण सिनाई भागातील शर्म अल शेख या रिसॉर्टजवळील महामार्गावर दोन पर्यटन प्रवासी बसची धडक लागून लागलेल्या आगीत 33 प्रवाशी जळून खाक झालेत. तर 41 प्रवासी जखमी झाले आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

भोस्ते घाटात बस दरीत कोसळली; 30 जखमी

कणकवली-मुंबई रातराणी एसटी बसला झालेल्या अपघातामध्ये 30 जण जखमी झालेत. या अपघातात कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही.

बस दरीत कोसळली; 17 जण ठार

जम्मू आणि काश्मीरच्या जम्मू भागात मंगळवारी सकाळी एक प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळून भीषण अपघात झालाय. या भीषण दूर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला तर 27 जण जखमी अवस्थेत आहेत.

कर्नाटकात बसला आग, 6 जणांचा होरपळून मृत्यू

कर्नाटकमध्ये बंगळुरूच्या दिशेनं निघालेल्या एका प्रवासी बसला चित्रदुर्गजवळ आग लागली. या दुर्घटनेत सहा जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर 12 जणं जखमी झालेत.

नेपाळमधील बस अपघातात १४ ठार

पल्पा जिल्ह्यातील पर्वत भागात आज गुरुवारी सकाळी भालूकोला नदीमध्ये बस नदीत कोसळल्याने झालेल्या अपघातात १४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात सात जण जखमी झाले आहेत.

९ जणांचे बळी घेणाऱ्या संतोष मानेची फाशी कायम

बेदरकारपणे एस टी चालवून ९ जणांचे बळी घेणाऱ्या चालक संतोष माने याला दिलेली फाशीची शिक्षा कायम करण्यात आली आहे. संतोषची फाशीची शिक्षा आज पुणे सत्र न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आली. खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, चोरी आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे या गुन्ह्यांत त्याला आरोपी ठरविण्यात आले आहे.

संतोष मानेच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती...

स्वारगेट स्थानकातून भरधाव वेगात बस पळवून नऊ जणांना चिरडणाऱ्या संतोष मानेच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलीय. संतोष मानेचे वकील जयदीप माने यांनी ही माहिती दिलीय.

मंथनची विंडो सीटची विनंती शेवट ठरली...

मुंबई-गोवा महामार्गावर आगवे येथे लक्झरी बस उलटून दहा वर्षीय मंथनसह तिघेजण ठार झालेत. तर २२ जण जखमी झाले. मुंबईत एक अन्य प्रवाशी बसला होता. मात्र, बोलक्या मंथनने त्यांना विनंती करून विंडो सीट मिळवली होती. या विंडो सीटने मंथनचा घात केला.

व्यास नदीत बस कोसळून ३२ जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशमध्ये कुलू-मंडी राष्ट्रीय महामार्गावर एका खासगी बसला झालेल्या अपघातात ३२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं प्रवाशांनी भरलेली बस व्यास नदीत कोसळली.

रत्नागिरी बस अपघातातील जखमींची नावे

जखमींना डेरवण रूग्णालय, खेड नगरपालिका रूग्णालय आणि कळबनी ग्रामीण रूग्णालय या तीन रूग्णालयात दाखल केले आहे. यातील १४ जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

रत्नागिरी बस अपघातातील मृतांची नावे

प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस जगबुडी नदीत कोसळून भीषण दुर्घटना घडलीय. या अपघातात ३७ जण ठार झाले आहेत.

`किस` करणं, ठरलं `जीवघेणं`

आपल्याला आवडणाऱ्या मुलीचा किस घेणं बिजनौरच्या एका आशिकाला चांगलंच महागात पडलं. यात त्याला त्याचा जीव गमवावा लागला.

नेपाळमध्ये बस अपघात, ३९ मृत्यूमुखी

नेपाळमध्ये रविवारी प्रवाशांना घेऊन जाणारी बस त्रिवेणी नदीत कोसळल्यामुळे किमान ३६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये अधिकांश लोक भारतीय असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बस अपघातात १५ भाविक ठार

हिमाचल प्रदेशात बस दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात पंधरा जण ठार आणि १८ जण जखमी झाले आहेत. या बसमधून भाविक देवदर्शनासाठी गेले होते.