ठाकरे कुटुंबाने एकत्र येणाचे अडवाणींचे आवाहन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर तरी उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार का, ही चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही नेमक्या याच विषयाला हात घातलाय. ठाकरे कुटुंबाने एकत्र यावे असं आवाहन अडवाणी यांनी केलंय.

क्रिकेटपटूंचा निषेध का करू नये?

बाळासाहेब हे जसे राजकारणी होते तसेच ते एक कलाकारही होते. मात्र खेळाडू आणि क्रिकेटपटूंबद्दलही त्यांच्या मनात एक आपुलकी होती. या आपुलकीमुळेच त्यांनी अनेक महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंना या ना त्या परीने नेहमीच मदत केली. मात्र त्यांची ही मदत हे खेळाडू आणि क्रिकेटपटू विसरले. या क्रिकेटपटूंचा निषेध का करू नये?

बाळासाहेबांना श्रद्धांजली : मुंबईत स्वयंस्फूर्तीने बंद

बाळासाहेब ठाकरे यांना मूक श्रद्धांजली अर्पण कण्यासाठी मुंबईत आज सोमवारी स्वयंस्फूर्तीने चित्रपट, नाट्य गृह आणि शाळा, महाविद्यालय, सराफा दुकान, कापड दुकाने बंद आहेत तर नवी मुंबईत एफएमसी मार्केट बंद ठेवण्यात आले आहेत.