बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्युची नोंद जन्मवहीत!

बाळासाहेब ठाकरेंसह अनेक जणांच्या मृत्यूची नोंद जन्मवहीत करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण संपूर्ण मुंबईमधील स्मशानभूमींमध्ये मृत्यूवहीच उपलब्ध नाहीत.

मला माझ्या कृत्याचा पश्चात्ताप नाही- शाहीन

पालघर फेसबुक प्रकरणी शाहीन आणि रीनु या दोघा मुलींची पालघरच्या प्रथमवर्ग न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. शिवाय या प्रकरणात तक्रारदार असलेले शिवसेनेचे सेनेचे शहरप्रमुख भुषण संखे यांचा या दोन्ही मुलींवर कारवाई करण्याची मागणी करणारा अर्जही न्यायालयाने फेटाळून लावला.

बाळासाहेबांच्या अंत्यदर्शनाला मान्यवरांची उपस्थिती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज शिवाजी पार्कवर अंत्यविधी होणार आहे. यापूर्वी सेना भवन येथे अंत्यदर्शनाला मान्यवरांची उपस्थिती जाणवली.

महाराष्ट्रातील सर्व परीक्षा रद्द

बाळासाहेब ठाकरेंच्या निधनामुळे पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी होणाऱ्या प्रज्ञा शोध परीक्षा तसंच सीएच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.

रविवारी रिक्षा आणि टॅक्सी बंद

उद्या दादार येथे बाळासाहेबांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवतीर्थावर ठेवण्यात येणार आहे. यावेळी सर्व शिवसैनिकांनी सार्वजनिक वाहनांतून वाहतूक करून यावं असं आवाहन करण्यात आलंय. उद्या मुंबईतील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येणार आहेत. तसंच मुंबईतील सर्व रिक्षा आणि टॅक्सी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोकण रेल्वे मार्गावर रात्री विशेष गाडी

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर अखा महाराष्ट्रासह देश शोकसागरात बुडाला आहे. कोकणातील शिवसैनिकांसाठी मुंबईत येणाऱ्यासाठी मडगाव ते मुंबई खास रेल्वे सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही रेल्वे रात्री दहावाजता मडगाववरून सुटेल.

बाळासाहेबांसाठी बॉलिवूडने ट्विटरवरून ढाळले अश्रू

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. मुंबईमध्ये तर अघोषित बंद पुकारला गेला आहे. बाळासाहेबांना भेटायला गेले दोन दिवस मुख्यमंत्र्यांपासून ते बॉलिवूडच्या कलाकारांपर्यंत प्रत्येक मातोश्रीवर दाखल होत होते. बाळासाहेबांच्या निधनानंतर मायानगरी बॉलिवूडवरही शोककळा पसरली आहे. ट्विटरमार्फत बॉलिवूडने आपली श्रद्धांजली व्यक्त केली आहे.