पालघर फेसबुक प्रकरण : कारवाई चुकीची, पोलीस निलंबित

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी फेसबूकवर वादग्रस्त विधान करणाऱ्या दोन मुलींना अटक केल्यावरून वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच एका न्यायाधिशाची बदली करण्यात आलीय.

Tuesday 27, 2012, 02:12 PM IST

बाळासाहेबांना न भेटण्याचा पस्तावा - शाहरुख

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनावर विविध स्तरांतून शोक व्यक्त होतोय. बऱ्याच काळानंतर बॉलिवूड बादशाह शाहरुख खान यानं बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आपलं मौन सोडलंय.

साहेबांचे शेवटचे काही दिवस आणि शेवटचा एक तास...

आठवडाभरापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रकृती अस्वास्थ्याचा त्रास जाणवू लागला. ` मातोश्री `च्या दुसऱ्या मजल्यावरील त्यांच्या खोलीतच त्यांच्यावर उपचार सुरू होते.

पोलिसांवरचा ताण वाढला; पोलीस आयुक्तांच्या मुलीचं लग्न रद्द

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रभर ठिकठिकाणी उत्स्फुर्तपणे बंद सुरू झालाय. याचाच परिणाम पोलिसांच्या खाजगी जीवनावरही झालाय. पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांची मुलगी रिचा हिचं रविवारी होणारं लग्न पुढे ढकललं गेलंय.

मातोश्री... बाळासाहेबांच्या मृत्यूची घोषणा होण्याअगोदर!

बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत दुपारी साडे तीन वाजता मालवल्याचं बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉ. जलील पारकर यांनी जाहीर केलं. पण ही घोषणा होण्याअगोदर बाळासाहेबांची प्रकृती जास्त बिघडल्यानं मातोश्रीवर बराच वेळ तणाव निर्माण झाला होता. हा तणाव उद्धव ठाकरे यांना सहन झाला नाही आणि ते चक्कर येऊन पडले.

बाळासाहेबांच्या आयुष्यातले चढ-उताराचे क्षण...

बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रवासावर एक नजर...

उद्या मुंबईत मेगाब्लॉक रद्द, उत्स्फूर्त बंद

उद्या, रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गावरचा प्रस्तावित मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. देशभरातून येणा-या शिवसैनिकांना तसेच सर्वसामान्यांना बाळासाहेब ठाकरे यांचे अंत्यदर्शन घेता यावे यासाठी हा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

महाराष्ट्राची मोठी हानी – सचिन तेंडुलकर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राची मोठी हानी झाली असल्याचेही सचिनने ट्विटरवर म्हटले आहे.

... अन् भुजबळांना अश्रू झाले अनावर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे माझ्यासाठी वडिलांप्रमाणेच होते... ते आपल्यात नाहीत ही कल्पनासुद्धा करवत नाही, असं म्हणत छगन भुजबळ भावूक झाले. ते ‘झी २४ तास’शी बोलत होते.

महाराष्ट्र अनाथ झाला- लता मंगेशकर

मराठी माणसाच्या नेत्याचे निधन झाल्याने अवघा महाराष्ट्र पोरका झाला आहे. मराठी माणूस अनाथ झाला आहे, अशा भावना सुप्रिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी व्यक्त केल्या आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन

हिंदुह्रद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत अखेर मालवली आहे.