मनसेचा मोर्चा, एसटी प्रवाशांचे मात्र झाले हाल

महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेकडून मुंबईतल्या आझाद मैदानात मोर्चा काढण्यात आला आहे.

राजचा मोर्चा हिंदूचा विश्वासघात- बाळासाहेब

रझा अकादमीच्या कार्यक्रमात मनसेचे आमदार बाळा नांदगावकर सामील झाल्याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांनी मनसेच्या विराट मोर्चावर टीकास्त्र सोडले आहे. मोर्चा काढणारे पक्ष रझा अकादमीच्या कार्यक्रमात सहभागी होत असतील, तर हा हिंदूंचा विश्वासघात आहे, असा जोरदार हल्ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ` सामना ` च्या अग्रलेखातून केला आहे.

अजितदादा गृहखातं घेऊन टगेगिरी दाखवा - राज

राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यावर आपले ठाम मत मांडले.

उद्धव ठाकरेंनी केलं राजच्या मोर्चाचं कौतुक

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समेटाच्या चर्चेला जोर चढला असताना उद्धव ठाकरेंनी पुन्हा राज यांच्या मंगळवारच्या मोर्चाचं कौतुक केलंय. असे मोर्चे पुन्हा निघायला हवेत असं उद्धव यांनी स्पष्टपणे नमूद केलंय.

राज ठाकरेंना `सामना`चे कव्हरेज

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्य़ा मोर्चाच्या बातमीला शिवसेनेचं मुखपत्र सामनानं ठळक प्रसिद्धी दिलीये. राज ठाकरेंची बातमी पहिल्या पानावर ठळकपणे छापलीये. शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर राज ठाकरेंबाबतच्या बातम्यांना सामनात प्रसिद्धी मिळत नव्हती.

मनसे मोर्चा आयोजकावर गुन्हा दाखल

मनसेच्या बहुचर्चित मोर्चा आज निघाला आणि राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवा अध्याय रचला. मनसेने काढलेल्या भव्य मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही ही रॅली काढण्यात आली.

...तेव्हा कुठे गेले दलित नेते?

लखनौमध्ये तोडण्यात आलेल्या बुद्ध मूर्तींबद्दलही राज ठाकरेंनी जाब विचारला. कुणीही येतं आणि पोलिसांवर हल्ले करतं. बाबरी मशिदीची प्रतिक्रिया मुंबईत उमटली. आता आसाममधल्या दंग्याची प्रतिक्रियाही आधी मुंबईत. नंतर बिहार, झारखंड, लखनऊमध्ये उमटली. काय केलं त्यांनी ?

xxx अबू आझमी निवडून येतोच कसा? - राज

भाषणामध्ये राज ठाकरेंनी पुन्हा एकदा परप्रांतियांचा मुद्दा खास ‘ठाकरी’ शैलीत लोकांसमोर मांडला. अर्थातच टार्गेट होतं... अबू आझमी.

आबा लाज असेल तर राजीनामा द्या- राज ठाकरे

मला महाराष्ट्र धर्माची भाषा कळते. पोलिसांवर आणि भगिणींवर कोणी हात उचलत असेल ते खपवून घेतले जाणार नाही. वाकड्या नजरेने कोण पाहिल त्याची आम्ही गैर करणार नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.यावेळी आर आर आबा तुम्हाला थोडीशी तरी लाज असेल तर राजीनामा द्या, असे आव्हान राज यांनी गृहमंत्री पाटील यांना दिले.

राज ठाकरे यांचे भाषण सुरू

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या विराट मोर्च्याचे नेतृत्व आपल्या हाती घेऊन मरीन ड्राइव्हपासून मोर्च्यात सामील झाले आहेत. आता ते आझाद मैदानापर्यंत ते पायी मोर्च्याचे नेतृत्व करणार आहेत. सध्या राज ठाकरे आझाद मैदानात पोहचले असून थोड्याच वेळात बाषणाला सुरूवात करणार आहेत.

यापूर्वी राज ठाकरे गिरगाव दुपारी १३० मिनिटांनी चौपाटीकडे रवाना झाले आहेत. गिरगाव चौपाटीवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. आज सभेमध्ये राज ठाकरे सरकारला जाब विचारणार आहेत. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशीच मागणी मनसेने केली आहे.

मनसे `सुसाट`, मोर्चाने कोणाची लागणार `वाट`?

मनसेनं उद्याच्या मोर्चासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वच जण तयारीला लागले आहेत.