मराठा मोर्चाची दखल घेतली अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्टने

मराठा मोर्चाची दखल घेतली अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्टने

भारतात सरकारी नोकरी आरक्षणासाठी हजारोंचा मोर्चा - वॉशिंग्टन पोस्ट

Saturday 12, 2017, 12:30 PM IST
मराठा मोर्चा सुट्टी, मुंबईत शनिवारी पूर्ण दिवस शाळा

मराठा मोर्चा सुट्टी, मुंबईत शनिवारी पूर्ण दिवस शाळा

मध्य आणि दक्षिण मुंबईतील पालिकेच्या शाळा येत्या शनिवारी पूर्ण दिवस असणार आहेत. मराठा क्रांती मूक मोर्चासाठी दिलेल्या एका दिवसाच्या सुटीची भरपाई करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.

राणेंच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त जवळ आल्याची चर्चा

राणेंच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त जवळ आल्याची चर्चा

मराठा मोर्चाच्या निमित्तानं नारायण राणे यांचं महत्व वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला... आता त्यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरवण्याच्या हालचाली सुरू झाल्याहेत....

मोर्चेकरांकडून उर्से टोलनाक्याची तोडफोड

मोर्चेकरांकडून उर्से टोलनाक्याची तोडफोड

 मराठा क्रांती मोर्चासाठी मुंबईला गेलेल्या काही मोर्चेकरांनी मोर्चाहून परतत असताना उर्से टोलनाक्याची तोडफोड केली. 

मराठा मोर्चादरम्यान 'यांनी' बजावली महत्त्वाची भूमिका!

मराठा मोर्चादरम्यान 'यांनी' बजावली महत्त्वाची भूमिका!

मुंबईत मराठा मोर्चाच्या यशस्वी आयोजनात मुंबई पोलिसांचीही भूमिका महत्त्वाची ठरलीय. लाखांचा हा मोर्चा मुंबईत आल्यानंतर पोलिसांनी अत्यंत जबाबदारीनं आपल्या कर्तव्याचं पालन केलं. 

एकच चर्चा, मराठा मोर्चा... पण नेमकं हाती काय लागलं?

एकच चर्चा, मराठा मोर्चा... पण नेमकं हाती काय लागलं?

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राजधानी मुंबईत बुधवारी मराठा समाजाचा महाविराट मूक मोर्चा निघाला. शांततामय मार्गानं काढण्यात आलेल्या या मोर्चासाठी रेकॉर्डब्रेक जनसमुदाय लोटला. या मोर्चातून नेमकं काय हाती लागलं, पाहूयात हा रिपोर्ट...

मराठा आरक्षणावर नारायण राणेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं स्वागत

मराठा आरक्षणावर नारायण राणेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं स्वागत

मराठा समाजाच्या मोर्चाचे विधानसभेत पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर विरोधकांनी मात्र असमाधान व्यक्त केलं... यावेळी, विरोधकांत बसलेले एक नेते मात्र सत्ताधाऱ्यांच्या बाजुनं बोलताना दिसले... ते म्हणजे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे...

मोर्चेकरी संतप्त... छत्रपती संभाजीराजे, नितेश राणेंना स्टेजवरच रोखलं!

मोर्चेकरी संतप्त... छत्रपती संभाजीराजे, नितेश राणेंना स्टेजवरच रोखलं!

मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून ठोस आश्वासन न मिळाल्यानं मराठा मोर्चेकरी संतप्त झालेत. 

मुख्यमंत्र्यांचं मुस्लिम समाजाशी काय वैर - अबू आझमी

मुख्यमंत्र्यांचं मुस्लिम समाजाशी काय वैर - अबू आझमी

मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद विधानभवनात उमटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन सादर केलं. यावेळी राज्यात सर्व म्हणजेच ६०५ कोर्सेससाठी शिष्यवृत्ति लागू केली जाईल... यासाठी ६० टक्क्यांची अट काढून टाकली जाईल... म्हणजेच मराठा विद्यार्थ्यांनाही ओबीसीप्रमाणेच सर्व सवलती मिळतील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. 

मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर विधानसभेत विरोधकांच्या 'गोल... गोल'च्या घोषणा

मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर विधानसभेत विरोधकांच्या 'गोल... गोल'च्या घोषणा

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन सादर केलं. यासाठी, आरक्षणासंदर्भात ठराविक कालावधीत अहवाल द्यावा, असे आदेश मागासवर्ग आयोगास देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर विरोधकांकडून 'गोल... गोल'च्या घोषणा दिल्या गेलाय. 

मराठा समितीच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन...

मराठा समितीच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन...

मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद विधानसभेतही उमटले. भायकळ्यातून निघालेला मोर्चा आझाद मैदानात धडकल्यानंतर मराठा समाजातील २४ सदस्यांची समिती मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहचली. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात ही बैठक नुकतीच पार पडली. 

अठरा पगड जातीच्या प्रश्नालाही मराठा समाजाची साथ राहील: शरद पवार

अठरा पगड जातीच्या प्रश्नालाही मराठा समाजाची साथ राहील: शरद पवार

मराठा समाजाच्या सर्वसमावेशक प्रश्नाकडे राज्य सरकार गांभीर्याने पाहील अशी अपेक्षा आहे- शरद पवार

दिग्दर्शक रवी जाधव यांनी दिला मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा

दिग्दर्शक रवी जाधव यांनी दिला मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा

रितेश देशमुखसोबतच आता मराठीतील लोकप्रिय दिग्दर्शक आणि आता नव्याने होऊ घातलेला अभिनेता रवी जाधव याने देखील या मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दिला आहे.

मराठा रणरागिणींचा एल्गार, सरकारला दिला इशारा

मराठा रणरागिणींचा एल्गार, सरकारला दिला इशारा

आज मुंबईत मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील तरुण, महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक या मोर्चात सामील झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण, कोपर्डी बलात्कारप्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अॅट्रोसिटी कायद्यात बदल अशा विविध मागण्यांसाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आज हे वादळ मुंबईत धडकले आहे. मराठा समाजातील लाखो बांधव या मोर्चात सहभागी झाले आहेत. 

 मुंबईतील मराठा मोर्चाच्या भगव्या वादळाचे दोन फोटो... होताहेत व्हायरल

मुंबईतील मराठा मोर्चाच्या भगव्या वादळाचे दोन फोटो... होताहेत व्हायरल

 मराठा क्रांती मूक मोर्चासाठी अभूतपूर्व संख्येने मराठा समाज  मुंबईत धडकला. राज्यभरातून मराठा बांधव मंगळवारीच मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत.  मोर्च्यापूर्वी मुंबईतील रस्ते आणि मोर्चा सुरू झाल्यानंतर भगवामय झालेले रस्ते याचे सुंदर फोटो आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी काढले आहे. 

मराठा आरक्षण : राज्य सरकारचा खोटारडेपणा उघड -  धनंजय मुंडे

मराठा आरक्षण : राज्य सरकारचा खोटारडेपणा उघड - धनंजय मुंडे

राज्यात याआधी मराठा मोर्चे काढण्यात आले. मात्र, त्याची साधी दखल घेण्यात आलेली नाही. राज्य सरकारचा खोटारडेपणा उघड झालाय. 

मराठा आरक्षण: विधनपरिषदेत खडाजंगी; राजदंड पळविण्याचा प्रयत्न

मराठा आरक्षण: विधनपरिषदेत खडाजंगी; राजदंड पळविण्याचा प्रयत्न

मराठा मोर्चा: चर्चा नको आरक्षण द्या - धनंजय मुंडे यांची मागणी

 सरकारचा वेळकाढूपणा - अजित पवार

सरकारचा वेळकाढूपणा - अजित पवार

 9 ऑगस्ट ला भारत छोड़ो आंदोलन झाले. आज सकल मराठा मोर्चा आहे. 57 मोर्चे निघाले. सर्वांना वाटत होते की सरकार निर्णय घेईल, पण सत्ताधारी पक्ष वेळकाढूपणा काढत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मराठा मोर्चा संदर्भात सरकारवर टीकेची झोड उठवली. 

मराठा आरक्षणावरुन सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

मराठा आरक्षणावरुन सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

मराठा क्रांती मूक मोर्चाला मुंबईत सुरुवात झाली आहे. मुंबईत भगवं वादळ धडकलं आहे. मुंबईचं वातावरण मराठामय झालं आहे. तर दुसकरीकडे  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधीमंडळातही सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. विरोधकांनी विधानभवनाबाहेर जोरदार घोषणाबाजीही केली. विधानसभेचं कामकाज सुरु होण्याआधीच आमदार आक्रमक झाले होते. अखेर विधानसभेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करावं लागलं. 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाडांचं शिवसेनेला आव्हान

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाडांचं शिवसेनेला आव्हान

मराठा क्रांती मोर्चाला मुंबईत उत्साहात सुरुवात झाली आहे. मोर्चासाठी प्रचंड गर्दी मराठा बांधवांनी केली आहे. राज्यभरातून मराठा माणूस मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाला आहे. दुसरीकडे विरोधी पक्षातील नेते आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेनेला आव्हान केलं आहे

मराठा क्रांती मोर्चात आता अभिनेता रितेश देशमुखची उडी

मराठा क्रांती मोर्चात आता अभिनेता रितेश देशमुखची उडी

लाखोंच्या संख्येने मराठा क्रांती मोर्च्यात सहभागी झाले आहेत. मुंबईसह राज्यभरातून मराठा मोर्चासाठी मराठा बांधव दाखल झाले आहेत. असं असताना आता बॉलिवूडमधील स्टार अभिनेता रितेश देशमुखने देखील या मराठा क्रांती मोर्चात उडी घेतली आहे.