बीएमसीची पोलखोल, महापालिका मुख्यालयासमोरच्या रस्त्यावर खड्डे

बीएमसीची पोलखोल, महापालिका मुख्यालयासमोरच्या रस्त्यावर खड्डे

पावसाने मुक्काम ठोकल्यानंतर आता मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डयांमुळे पालिकेचा ढिसाळ कारभार उघडा पडला आहे. खुद्द महापालिका मुख्यालयासमोरच्या रस्त्यावरच खड्डे पडले आहेत. पालिकेने बनवलेल्या सेल्फी पॉईंटजवळ काँक्रीटच्या रस्त्यावर हे खड्डे पडले असून ते बुजवण्याची तसदीही बीएमसीनं घेतलेली नाही. जर मुख्यालयासमोरच्या रस्त्यांवरील खड्डयांकडे दुर्लक्ष होत असेल तर मग शहरातील छोट्या रस्त्यांवरील खड्डे बीएमसीला दिसणार तरी कसे असा प्रश्न निर्माण होतो.

मलिष्काचा बोलविता धनी कोण? शिवसेनेचा सवाल

मलिष्काचा बोलविता धनी कोण? शिवसेनेचा सवाल

शिवसेना विरूद्ध आरजे मलिष्का वादाचे जोरदार पडसाद मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीतही उमटले.

मुंबईकरांच्या पार्किंगचे पैसे कुणाच्या घशात जातायत?

मुंबईकरांच्या पार्किंगचे पैसे कुणाच्या घशात जातायत?

उड्डाणपुलाखालची जागा 'नो पार्किंग घोषित करून दोन दिवस उलटले तरीही पार्किंग सुरूच आहेत. महापालिका, पोलीस कारवाईसाठी नेमकी कोणाची वाट पाहात आहेत हा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय. 

शिवसेना-भाजपमध्ये राडा, उद्धव ठाकरेंसमोर मोदी-मोदीचे नारे

शिवसेना-भाजपमध्ये राडा, उद्धव ठाकरेंसमोर मोदी-मोदीचे नारे

मुंबई महापालिकेत आज पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद पुन्हा एकदा भडकला आहे.

पालिकेच्या मुख्य लेखापालांची राज्य सरकारकडून 'घर वापसी'

पालिकेच्या मुख्य लेखापालांची राज्य सरकारकडून 'घर वापसी'

महापालिकेचे मुख्य लेखापाल सुरेश बनसोडे यांना राज्य सरकारला अवघ्या वर्षभराच्या आत पुन्हा आपल्या सेवेत माघारी बोलवून घेण्याची नामुष्की ओढवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. 

मुंबई महापालिकेनं पाणी दरवाढ 'करून दाखवली'

मुंबई महापालिकेनं पाणी दरवाढ 'करून दाखवली'

मुंबई महापालिकेनं पाण्याच्या दरामध्ये ५.३९ टक्के एवढी वाढ केली आहे.

कर्जरोख्यांमुळे पहिल्याच दिवशी पुणे महापालिकेच्या तिजोरीत २०० कोटी

कर्जरोख्यांमुळे पहिल्याच दिवशी पुणे महापालिकेच्या तिजोरीत २०० कोटी

पुणे महापालिकेने २४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी कर्जरोखे आणले आहेत.

नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर

नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर

दोन हजार दोनशे एकहात्तर कोटी ९७ लाखांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. 

...तर पुणेकरांना मिळणार २४ तास पाणी

...तर पुणेकरांना मिळणार २४ तास पाणी

संपूर्ण पुणे शहरात २४ तास तसंच समान पाणीपुरवठा करण्यासाठीची योजना पुणे महापालिकेनं हाती घेतलीय. 

तीन महापालिका निवडणुकांची उद्या मतमोजणी, उमेदवारांची धाकधूक वाढली

तीन महापालिका निवडणुकांची उद्या मतमोजणी, उमेदवारांची धाकधूक वाढली

पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महापालिकांची मतमोजणी उद्या म्हणजेच शुक्रवारी होणार आहे. 

भिवंडीत गाडीत सापडली साठ लाखांची कॅश

भिवंडीत गाडीत सापडली साठ लाखांची कॅश

आज भिवंडी महानगरपालिकेसाठी मतदान होतंय. या पार्श्वर्भूमीवर परिसरात एका गाडीत तब्बल साठ लाख रुपये पोलिसांना सापडलेत.

पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात

पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात

नव्याने स्थापन झालेल्या पनेवल महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झालीय. याशिवाय भिवंडी आणि मालेगावातही मतदानाला प्रारंभ झालाय.

...जेव्हा आयुक्त धारण करतात 'बाहुबली' अवतार!

...जेव्हा आयुक्त धारण करतात 'बाहुबली' अवतार!

ठाण्याचे आयुक्त संजीव जैस्वाल यांचा बाहुबली अवतार आज ठाणेकरांना अनुभवता आला. काल रात्री पालिका उपायुक्त संदीप साळवी यांना झालेल्या मारहाणीनंतर पालिका प्रशासनानं आज गावदेवी परिसरात फेरीवाले, दुकानदार आणि रिक्षावाल्यांवर आज जोरदार कारवाई केली. 

 कल्याण महापालिकेतील २७ गावे, दिव्याची पाणीटंचाई दूर होणार

कल्याण महापालिकेतील २७ गावे, दिव्याची पाणीटंचाई दूर होणार

कल्याण-डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील २७ गावे व दिवा परिसरातील भीषण पाणी टंचाईची दखल घेऊन २७ गावांकरता २५ एमएलडी व दिवा भागाकरता १० एमएलडी पाणी वाढवण्याचा निर्णय मंगळवारी येथे घेण्यात आला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हे निर्देश दिले.

पनवेल महापालिकेसाठी सेना-मनसेची जोरदार तयारी!

पनवेल महापालिकेसाठी सेना-मनसेची जोरदार तयारी!

समोर उभ्या ठाकलेल्या पनवेल महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना - मनसेनं पुन्हा एकदा कंबर कसलीय. 

दिल्ली महापालिकेवरही भाजपचं वर्चस्व... अंतिम निकालाकडे लक्ष

दिल्ली महापालिकेवरही भाजपचं वर्चस्व... अंतिम निकालाकडे लक्ष

उत्तर प्रदेशसह पाच राज्यातल्या विधानसभा निवडणूकीत जोरदार कामगिरी केल्यावर आता भाजपनं दिल्ली महापालिकेवर पुन्हा वर्चस्व स्थापन केलंय.

तीन महापालिका निवडणुकीत कोणी काय कमावलं? काय गमावलं?

तीन महापालिका निवडणुकीत कोणी काय कमावलं? काय गमावलं?

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपनं सुरू केलेली विजयाची घौडदौड याही निवडणुकीत पहायला मिळाली.

ओवेसींच्या दोन सभेनंतरही एमआयएमचं लातूरमध्ये पानिपत

ओवेसींच्या दोन सभेनंतरही एमआयएमचं लातूरमध्ये पानिपत

लातूर महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची करूनही एमआयएमला भोपळाही फोडता आलेला नाही.

परभणीत राष्ट्रवादीला काँग्रेसकडून दे धक्का, शिवसेना-भाजप सात-सात

परभणीत राष्ट्रवादीला काँग्रेसकडून दे धक्का, शिवसेना-भाजप सात-सात

महापालिकेच्या ६५ जागांसाठी ४१८ उमेदवार रिंगणात होते. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. पुणे, पिंपरी-चिंचवड गमावल्यानंतर आता परभणीतील वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेससमोर होते. येथे मित्रपक्ष काँग्रेसने सत्ता काबीज केली.

नाशिकची तिजोरीही भाजपकडे!

नाशिकची तिजोरीही भाजपकडे!

भाजपने नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीवर झेंडा फडकवला. निवडणुकीनंतर तातडीने गटनोंदणी करत स्थायी समिती बळकावण्यासाठी सेनेनं रिपब्लिकन पक्षाला सोबत घेतलं होतं.

नाशिक महापालिकेनं थकबाकी असलेले मोबाईल टॉवर सील केले पण...

नाशिक महापालिकेनं थकबाकी असलेले मोबाईल टॉवर सील केले पण...

नाशिक महानगरपालिकेनं थकबाकी असेलल्या मोबाईल टॉवर्स विरोधात मोहीम उघडलीय.