महायुती

समाजवादी पार्टी-काँग्रेसचं महायुतीचं स्वप्न भंगलं

समाजवादी पार्टी-काँग्रेसचं महायुतीचं स्वप्न भंगलं

उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचं महायुतीचं स्वप्न भंगलं आहे.

Jan 21, 2017, 10:53 PM IST
गोव्यात महायुती, भाजपचेच मित्र विरोधात एकवटले

गोव्यात महायुती, भाजपचेच मित्र विरोधात एकवटले

गोव्यात निवडणुकांसाठी युती जाहीर झाली आहे. महाराष्ट्रवादी गोमांतक, सुभाष वेलिंगकरांचा गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेनेनं युती जाहीर केली आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना एकत्र आले आहेत. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष ३०, गोवा सुरक्षा मंच ६ आणि शिवसेना ४ जागा लढवणार आहे.

Jan 11, 2017, 09:52 AM IST
भाजपाच्या महायुतीमध्ये जनसुराज्य पक्ष सामील

भाजपाच्या महायुतीमध्ये जनसुराज्य पक्ष सामील

भाजपाच्या महायुतीमध्ये जनसुराज्य पक्ष सामील झाला. त्यामुळं महाराष्ट्रात भाजपा युतीची ताकद वाढली असल्याचा दावा भाजपनं केलाय. विधानसभा निवडणुकांवेळीच भाजप महायुतीत सहभागी व्हायचं ठरलं होतं, मात्र काही कारणानं ते शक्य झालं नाही, असं विनय कोरेंनी म्हटलंय. 

Oct 26, 2016, 11:46 PM IST
ठाण्यात महायुती विरूद्ध राष्ट्रवादी सामना

ठाण्यात महायुती विरूद्ध राष्ट्रवादी सामना

स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी ठाण्यात डावखरे विरूद्ध फाटक यांच्यात आज लढत झाली. कोणताही कटू प्रकार न होता ही निवडणूक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे याआधी चार वेळा इथून बिनविरोध निवडून गेले होते. खरं म्हणजे विधान परिषदेचे उपसभापती आणि वसंत डावखरे असं समीकरणच बनून गेलं होतं. 

Jun 3, 2016, 10:39 PM IST
विस्तार झाल्यावर मंत्री म्हणणार कोणी 'दालन देता का दालन...'

विस्तार झाल्यावर मंत्री म्हणणार कोणी 'दालन देता का दालन...'

राज्याच्या मंत्रीमंडळचा विस्तार लवकरच होत आहे. त्यानंतर मंत्रालयात आणखी 12 मंत्री लवकरच पदभार स्वीकारून त्यांचा कारभार सुरु करणार आहेत. मात्र यापैकी फक्त 4 ते 5 मंत्री मंत्रालयात सामावले जातील अशी शक्यता आहे. कारण तेवढीच दालनं सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे 7 ते 8 मंत्र्यांना मंत्रालयाबाहेर विधीमंडळातल्या दालनातून कारभार हाकावा लागणार आहे. 

Nov 20, 2015, 11:32 PM IST
भाजपकडून पुन्हा मित्रपक्षांना दगा, विधान परिषदेसाठी ठेंगा

भाजपकडून पुन्हा मित्रपक्षांना दगा, विधान परिषदेसाठी ठेंगा

विधान परिषदेच्या चार जागांसाठी होणाऱ्या  निवडणुकीत सरकारला पाठिंबा देणाऱ्या घटकपक्षांच्या तोंडाला पुन्हा पानं पुसण्याची तयारी भाजपनं केली आहे. या चारपैकी ३ जागा भाजप स्वतः लढवणार आहे. तर एक जागा शिवसेनेला सोडणार आहे. 

Jan 16, 2015, 05:23 PM IST
'धनगर समाजाला दिलेल्या शब्दापासून मागे हटणार नाही'

'धनगर समाजाला दिलेल्या शब्दापासून मागे हटणार नाही'

महायुतीने धनगर समाजाला जो शब्द दिला आहे, त्या शब्दापासून महायुती मागे हटणार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये केलं आहे, या शिवाय आदिवासी समाजाच्या आरक्षणातला वाटा, आम्ही कोणालाही देणार नसल्याचंही  मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

Jan 4, 2015, 05:59 PM IST
भाजपच्या मित्रपक्षांच्या सुपडा साफ!

भाजपच्या मित्रपक्षांच्या सुपडा साफ!

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मोदी लाट’ किंचितही ओसरलेली नाही असा दावा निवडणूक निकालानंतर केला खरा, पण ‘महायुती’ फुटल्यानंतर भाजपसोबत गेलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम या मित्रपक्षांना मात्र ‘मोदी लाट’ तारू शकली नाही. त्या पक्षांचा या विधानसभा निवडणुकीत साफ बाजार उठला आहे.

Oct 20, 2014, 04:26 PM IST
शिवसेनेचा मुख्यमंत्री करूनच दाखवेन - उद्धव ठाकरे

शिवसेनेचा मुख्यमंत्री करूनच दाखवेन - उद्धव ठाकरे

युतीच्या घटस्फोटानंतर महालक्ष्मी रेसकोर्सवर आज शिवसेनेची पहिलीच जाहीर सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंसोबत  युवासेना नेते आदित्य ठाकरे, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी उपस्थित होते

Sep 27, 2014, 08:00 PM IST
पितृपक्षाचे कावळे उडाले... सेनेनं सामनातून भाजपवर डागली तोफ!

पितृपक्षाचे कावळे उडाले... सेनेनं सामनातून भाजपवर डागली तोफ!

महायुती तुटल्यानंतर शिवसेनेनं सामना या आपल्या मुखपत्रातून भाजपवर चांगलंच तोंडसूख घेतलंय. भाजपच्या भूमिकेवर शिवसेनेनं टीकास्त्र सोडलंय. शिवसेना-भाजप युती राहावी असे आमच्यातील मित्रपक्षांना वाटत होते. त्यापेक्षाही महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेची ती भावना होती. या भावनेचा चोळामोळा करणारे महाराष्ट्राचे दुश्मनच म्हणायला हवेत, या शब्दात शिवसेनेनं आपली तिखट प्रतिक्रिया दिलीय. 

Sep 26, 2014, 08:37 AM IST
‘पक्ष’ संपले, ‘यूत्त्या’ बनवतायत!!!

‘पक्ष’ संपले, ‘यूत्त्या’ बनवतायत!!!

पितृ ‘पक्ष’ पंधरवडा संपला पण आमच्या पक्षांचा पंधरवडा काही करता संपेचना... आज तरी जेवतील, उद्या तरी जेवतील... सकाळी, दुपारी, संध्याकाळी, मध्यरात्री, पहाटे कधीतरी? पण नाहीच... 

Sep 25, 2014, 11:04 PM IST
'युती' इतिहासजमा... उरल्या फक्त आठवणी!

'युती' इतिहासजमा... उरल्या फक्त आठवणी!

शिवसेना भाजपची 25 वर्षांची युती तुटलीय. भाजप सेना युतीचा गेल्या पाव शतकाचा काळ म्हणजे जणू महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा काळ... आता इतिहास झालेल्या युतीच्या प्रवासाची काही क्षणचित्रांची, ही आठवण... 

Sep 25, 2014, 10:34 PM IST
शिवसेनेकडून योग्य प्रस्ताव नाही - भाजप

शिवसेनेकडून योग्य प्रस्ताव नाही - भाजप

शिवसेनेच्यावतीनं वेगवेगळे प्रस्ताव देण्यात आले आहेत. त्यावर विचार केला जातोय. मित्रपक्ष आणि आम्हांला जसं सामावून घेतलं पाहिजे, ते अजूनही आले नाहीयेत, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

Sep 25, 2014, 04:11 PM IST
'भाजपला युती तोडायची घाई'; सेनेनं भाजपचा डाव उलटला

'भाजपला युती तोडायची घाई'; सेनेनं भाजपचा डाव उलटला

ओम माथूर यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर आज शिवसेना नेते मीडियासमोर आले... शिवसेनेला अजूनही 'महायुती' हवीय, पण भाजपलाच महायुती तोडायची घाई झालीय, असं दिवाकर रावते यांनी म्हटलंय.

Sep 25, 2014, 04:05 PM IST
उद्धव ठाकरे २७ तारखेला बोलणार

उद्धव ठाकरे २७ तारखेला बोलणार

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस बाकी असताना महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा कायमच आहे... 

Sep 25, 2014, 08:57 AM IST