महायुती

जानकर आणि शेट्टींचे स्वबळावर लढण्याचे संकेत

महायुतीतील वाढता तणाव पाहता, युती तुटण्याच्याच मार्गावर आहे, असं चित्र दिसतंय. जर युती तुटली तर राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढेल, असे संकेत पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिले आहेत. स्वबळावर लढायचं असल्यास जानकर १५० जागांवर आपले उमेदवार उभे करतील. 

Sep 21, 2014, 03:27 PM IST

पुढील २४ तासांत युतीविषयी निर्णय घेतला जाईल - विनोद तावडे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नवीन आणि अंतिम प्रस्तावानंतर भारतीय जनता पक्षानं दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया दिलीय. पुढील २४ तासांत युतीविषयी निर्णय घेतला जाईल आणि प्रत्यक्ष भेटूनच उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी म्हटलंय. 

Sep 21, 2014, 02:47 PM IST

शिवसेनेचा भाजपला अखेरचा प्रस्ताव, १५१-११९-१८चा नवा फॉर्म्युला

मुंबई- एका महिन्यात महाराष्ट्रात भगवी दिवाळी साजरी करणार, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलंय. भाजपला अखेरचा प्रस्ताव आणि फॉर्म्युला शिवसेनेनं दिलाय. भाजपला ११९ पूर्ण जागा लढता याव्यात म्हणून ९ ज्यादा जागा आपल्या कोट्यातून देण्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलंय. यानुसार आता शिवसेना १५१, भाजप ११९ आणि इतर घटक पक्ष १८ जागा अशा हा फॉर्म्युला आहे. 

Sep 21, 2014, 12:25 PM IST