राज्यातील उद्योजकांना वीज दरात सवलत

राज्यातील उद्योजकांना वीज दरात सवलत

राज्यातील उद्योगांना विभाग निहाय सवलत मिळणार आहे. ही सवलत पुढील तीन वर्षांसाठी ही सवलत दिली जाणार आहे. 

माहितीच्या अधिकाराखाली राज्यातील 'मृत' वनक्षेत्राबद्दल धक्कादायक माहिती समोर माहितीच्या अधिकाराखाली राज्यातील 'मृत' वनक्षेत्राबद्दल धक्कादायक माहिती समोर

गेल्या दहा वर्षात राज्यात तब्बल ४५४ चौरस किलोमीटर वनक्षेत्र नष्ट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. त्यामुळंच की काय, येत्या १ जुलैला दोन कोटी झाडं लावण्याचा संकल्प वनमंत्र्यांना हाती घ्यावा लागलाय.

राज्यावर पसरतायत मान्सूनचे ढग राज्यावर पसरतायत मान्सूनचे ढग

राज्यामध्ये मान्सून सक्रीय व्हायला सुरुवात झाली आहे.

'हमाल' बनायला २५३ पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार उत्सुक 'हमाल' बनायला २५३ पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार उत्सुक

'महान राष्ट्र' म्हणून स्वत:ची पाठ थोपटवून घेणाऱ्या महाराष्ट्रात बेरोजगारीची समस्या किती मोठी आहे, याचं एक धक्कादायक उदाहरण नुकतंच समोर आलंय.

महाराष्ट्रातला पाऊस 'मेड इन चायना' महाराष्ट्रातला पाऊस 'मेड इन चायना'

दुष्काळाग्रस्त मराठवाड्याला चीनने मदतीचा हात देऊ केला आहे. जर महाराष्ट्रा सरकारने होकार दिला तर, कृत्रिम पावसाचे तंत्रज्ञान ‘क्लाऊड सीडिंग’ उपलब्ध करुन देणं, तसेच हवामान विभागातील कर्मचाऱ्यांना त्याबाबतचे प्रशिक्षण देण्याची ऑफर चीनने महाराष्ट्र सरकारला दिली आहे. यामुळे पुढील वर्षी मराठवाडा दुष्काळमुक्त होईल असा विश्वास चीनने दर्शविला आहे.

येत्या 24 तासात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार येत्या 24 तासात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार

विदर्भातून प्रवेश केलेला मान्सून आज संपूर्ण महाराष्ट्र पसरेल अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. येत्या 24 तासात मान्सूनचे ढग मुंबई आणि मराठवाड्यावर मेहरबान होतील असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय.

विदर्भाच्या वाटेनं मान्सून महाराष्ट्रात दाखल, ४८ तासांत होणार सक्रीय विदर्भाच्या वाटेनं मान्सून महाराष्ट्रात दाखल, ४८ तासांत होणार सक्रीय

सर्वच जण ज्याची चातकाप्रमाणे वाट पहाताहेत तो मान्सूनचा पाऊस पुढच्या ४८ तासांत महाराष्ट्रात दाखल होतोय असा अंदाज कुलाबा वेधशाळेचे संचालक व्ही के राजीव यांनी वर्तवलाय.

ज्योतिषशास्त्रानुसार कधी येणार पाऊस ज्योतिषशास्त्रानुसार कधी येणार पाऊस

 येत्या १८ ते २३ जून रोजी दरम्यान शनी आणि मंगळाची युती तुटल्यानं यावेळी मान्सून धडकण्याची शक्यता असल्याचे ज्योतिष विकास रायकर यांनी भाकीत वर्तविले आहे. एव्हढंच नाही तर २३ नंतर ही युती पुन्हा होणार असल्यानं २३ जूननंतर पाऊस पुन्हा विसावा घेईल असंही त्यांनी म्हटलंय.   

कोकणात अतिवृष्टीचा इशारा कोकणात अतिवृष्टीचा इशारा

मान्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण असून पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वृष्टी होण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून कोकण किनारपट्टीवर चांगला पाऊस होईल. त्याचवेळी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.

देशात नोकरीच्या सर्वाधिक संधी देणारी महाराष्ट्रातील २ शहरं देशात नोकरीच्या सर्वाधिक संधी देणारी महाराष्ट्रातील २ शहरं

राज्याची सांस्कृतीक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या पुण्याला आता आणखी एक ओळख मिळाली आहे. नोकरीच्या संधी निर्माण करण्यात पुणे देशात सहाव्या स्थानावर आहे. ३ महिन्यात पुण्यात ४९ हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होत्या. नोकरीच्या एकूण संधींमध्ये सहा टक्के वाटा हा पुण्याचा असल्याचा द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इन्डस्ट्रीज ऑफ इंडिया संघटनेने सांगितले आहे. तीन महिन्यात देशात साडे आठ लाख संधी निर्माण झाल्या होत्या. देशातील नोकरीच्या संधी निर्माण करणाऱ्या शहरांमध्ये पुणे सहाव्या स्थानावर आहे.

त्वचेविना जन्माला आलेल्या नागपुरातल्या 'त्या' बाळाचा मृत्यू त्वचेविना जन्माला आलेल्या नागपुरातल्या 'त्या' बाळाचा मृत्यू

'हर्लेक्विन' नावाचा गंभीर आजार घेऊन जन्म घेतलेल्या त्या बाळाचा जन्मानंतर दोनच दिवसांनंतर मृत्यू झाला... आणि डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले. 

'सॅव्ही' मॅगझीनच्या कव्हर पेजवर मिसेस मुख्यमंत्री 'सॅव्ही' मॅगझीनच्या कव्हर पेजवर मिसेस मुख्यमंत्री

'सॅव्ही' नावाच्या एका मॅगझीनच्या जून २०१६ कव्हर पेजवर मिसेस मुख्यमंत्री दिसणार आहेत. 

४८ तासात महाराष्ट्रात सर्वदूर मान्सून  ४८ तासात महाराष्ट्रात सर्वदूर मान्सून

येत्या ४८ तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची चिन्ह आहेत. काल केरळमध्ये दाखल झालेला मान्सून आज तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर पोहोचलाय. 

खुशखबर! मान्सून केरळमध्ये दाखल, लवकरच महाराष्ट्रात खुशखबर! मान्सून केरळमध्ये दाखल, लवकरच महाराष्ट्रात

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होत असला तरी अनेकांना प्रतिक्षा आहे ती मान्सून महाराष्ट्रात लवकर दाखल होण्याची. मान्सूनच्या आगमनाची वेळ आता जवळ आली आहे. मान्सूनचं केरळमध्ये आगमन झालं आहे. हवामान विभागाने याची अधिकृत माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यात येत्या १-२ दिवसात पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या पोलीस दाम्पत्याकडून एव्हरेस्ट सर महाराष्ट्राच्या पोलीस दाम्पत्याकडून एव्हरेस्ट सर

महाराष्ट्र पोलीस दलाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेलाय. पुण्यातील एका पोलिस दाम्पत्याने नुकतीच एव्हरेस्ट मोहीम फत्ते केली आहे.  

लवकरच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन लवकरच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन

केरळात पुढील दोन तीन दिवसात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा काही भागात मान्सून पूर्व पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळा वर्तविला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस

हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात तीन दिवसांपासून वादळी वारे वाहू लागलेत. सोसाट्याच्या वा-यामुळे मोठी झाडं उन्मळून पडलीत. त्यातच काही घरांचं देखील नुकसान झालंय. त्यातच काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह तुरळक पाऊसही सुरू आहे. या दोन जिल्ह्यात वीज पडून ठार होण्याचा आकडा आता दहावर गेलाय. परभणीत दोन ठिकाणी वीज पडून 2 ठार 2 जखमी झालेत. सेलू तालुक्यातील नरसापुर येथे एक जण ठार तर मायलेक गंभीररित्या भाजले आहेत. जिंतूर तालुक्यातील गीते पींपरी येथे 38 वर्षीय सूर्यभान मस्केवर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय.

खडसेंची चौकशी करण्याची दमानियांची मागणी खडसेंची चौकशी करण्याची दमानियांची मागणी

महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवल्यानंतर आमच्या आंदोलनाला यश आल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिलीये. 

एक्सक्लुझिव्ह : महाराष्ट्रातला आरोप आणि राजीनाम्याचा इतिहास एक्सक्लुझिव्ह : महाराष्ट्रातला आरोप आणि राजीनाम्याचा इतिहास

राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे सध्या आरोपांच्या फेऱ्यात आहेत. विरोधक खडसेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यापूर्वीही राज्याच्या राजकारणात आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिल्याची उदाहरणे आहेत. याच उदाहरणांचा दाखला देत खडसे राजीनामा का देत नाहीत? असा सवाल आता विरोधक उपस्थित करत आहेत.

महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेसाठी उद्या मिळणार खुशखबर... महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेसाठी उद्या मिळणार खुशखबर...

पुढील २४ तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा काही भागात पावासाची शक्यता असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रामध्ये एक दोन दिवसांत रिमझीम पाऊस महाराष्ट्रामध्ये एक दोन दिवसांत रिमझीम पाऊस

दुष्काळाचा प्रचंड मार सहन करत असलेल्या महाराष्ट्रामध्ये येत्या एक दोन दिवसांत रिमझीम पाऊस पडेल असा अंदाज, भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे.