महिला बँकेसाठी हव्यात ११५ प्रोबेशनरी ऑफिसर!

महिलांसाठी महिलांद्वारे संचालित केली जाणारी पहिली राष्ट्रीयकृत बँक म्हणजेच ‘भारतीय महिला बँक’ नोव्हेंबर महिन्यापासून आपल्या कामाला सुरुवात करेल, अशी आशा व्यक्त केली जातेय. यासाठी बँकेत सुरुवातील ११५ महिला अधिकाऱ्यांची भरती होणार आहे.

देशात पहिली `महिला बँक`

देशातली पहिली महिला बँक स्थापन करण्याची घोषणा चिदंबरम यांनी केली. या महिला बँकेसाठी एक हजार कोटी रूपयांची तरतूदही करण्यात येणार आहे.