मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वॉर्ड फेररचना होणार!

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वॉर्ड फेररचना होणार!

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वॉर्ड फेररचना पुढच्या आठ दिवसात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. महापालिका प्रशासनाच्यावतीने आज मुख्यायलात आयोजित पत्रकार परिषदेत ही शक्यता व्यक्त करण्यात आली.

राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याचा आज दुसरा दिवस राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याचा आज दुसरा दिवस

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्याद्वारे काँग्रेसने मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचं बिगुल वाजवलंय.

जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम - अनिल देसाई जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम - अनिल देसाई

जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचं शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी स्पष्ट केलंय. तर मुख्यमंत्र्यांच्या बीएमसी निवडणूक सेना-भाजप एकत्र लढणार या भूमिकेचंही देसाई यांनी स्वागत केलंय. पत्रकार परिषदेत देसाई यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलीय.

मुंबई राखली, आता महाराष्ट्र जिंका !

शिवसेनेनं अखेर मुंबईत 'जिंकून दाखवलंच'. या शहरावर शिवसेनेच्या वाघाची पकड किती मजबूत आहे, हेच यातून दिसून आलं. शिवसेनाप्रमुखांची जंगी सभा आणि वॉर्डा-वॉर्डात पसरलेलं शिवसैनिकांचं जाळं या ताकदीवर मुंबई महापालिकेवरील भगव्याचा डौल पुन्हा कायम राहिला.

प्रकाश मेहतांची हकालपट्टी करा- आठवले

रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपचे घाटकोपर पूर्वचे आमदार प्रकाश मेहता यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

बाळा नांदगावकर गटनेतेपद सोडणार?

आ.बाळा नांदगावकरांनी गटनेतेपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे

पंतगराव कदमांचा काँग्रेसला घरचा आहेर

मुंबईत काँग्रेस नेत्यांमध्ये समन्वय नव्हता, अशी टीका करत वनमंत्री पतंगराव कदम यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. मात्र पराभवाला केवळ काँग्रेसच जबाबदार नसून राष्ट्रवादीही जबाबदार आहे, अशी बाजूही सावरुन घेतली

विभागप्रमुख मिलिंद वैद्यांचा राजीनामा

शिवसेनेच्या मिलिंद वैद्यांनी पक्षाचा दादरमध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारत पक्षाच्या विभागप्रमुखपदाचा आहे.

प्रभाग क्रमांक - २२५ ब्रेबॉर्न स्टेडियम

 

 

 विजयी उमेदवार

 

१)   सुषमा साळुंखे   (काँग्रेस)

 

 

प्रभाग क्रमांक - २२७ कुलाबा दांडी नेव्हीनगर

 

 

 विजयी उमेदवार १) अॅड. मकरंद सुरेश नार्वेकर  (अपक्ष)

 

 

प्रभाग क्रमांक - २२६ ससून डॉक्स गीतानगर

 

 

 विजयी उमेदवार १)  यादव अनिता रमेश  (काँग्रेस)

 

 

महापालिकांसाठी सरासरी २० टक्के मतदान

राज्यात दहा महापालिकांसाठी ११.३० वाजेपर्यंतचे झालेले मतदान पुढील प्रमाणे मुंबईत - १४ टक्के तर ठाण्यात - २३ टक्के, उल्हासनगर १३.५ टक्के, नागपूर- १६.३ टक्के, पुणे - १४ टक्के, नाशिक २१ टक्के, पिंपरी-चिंचवड २३ टक्के, सोलापूर ३४ टक्के, अकोला ३० टक्के आणि अमरावती २८ टक्के मतदान झाल ं आहे.

१० महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर या राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे.

मुंबई-ठाणेकरांना कोणी वाली आहे का?

मंदार मुकुंद पुरकर मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकांसाठी मतदान १६ फेब्रुवारी रोजी होत आहे. या दोन्ही महापालिकांच्या सत्तास्थानी कोण असेल हे १७ फेब्रुवारीच्या दुपारपर्यंत स्पष्ट होईल. मुंबई आणि ठाण्यात शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता गेल्या दोन दशकाहून अधिक काळ सत्तेत अबाधित राहिली आहे.

मुंबईत ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना रंगणार

मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज ख-या अर्थानं रंगत येणार आहे. मुंबईत आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष ठाकरे आमने-सामने उभे ठाकणार आहेत.

मुंबईनामा भाग- १

[jwplayer mediaid="45480"]

मनसेची जंग, सेना-राष्ट्रवादी करते बेरंग

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. मनसेला मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदान मिळू नये म्हणून दोन्ही पक्ष एकत्र असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलं आहे. बोरिवलीत रोड शोच्या दरम्यान त्यांनी ही टीका केली.

कमळ रुतलं बंडखोरीच्या चिखलात

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनीच बंडखोरीचे निशाण फडकावलं आहे. विलेपार्लेत प्रभाग क्रमांक ८० मध्ये पराग अळवणींच्या पत्नीने अपक्ष उमेदवारी भरल्यानंतर आता राज पुरोहितांच्या सूनेनंही तोच कित्ता गिरवला आहे.

मुंबई पालिकेसाठी भाजपाची दुसरी यादी

मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची दुसरी यादी भारतीय जनता पक्षाने जाहीर केली आहे. या यादीत विद्यमान नगरसेवक भालचंद्र शिरसाट वगळता नवीन चेहऱ्यांना पक्षाने पसंतीक्रम दिला आहे.