२९ मार्चला सादर होणार मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प

२९ मार्चला सादर होणार मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प

आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या मुंबई महापालिकेचा 2017-18 या वर्षीचा अर्थसंकल्प येत्या बुधवारी, 29 मार्चला स्थायी समिती सभेत सादर केला जाणार आहे. दरवर्षी फुगवून अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र यावेळी पहिल्यांदाच ही परंपरा मोडीत काढली जाणार असून यंदाचा अर्थसंकल्प मागील वर्षापेक्षा 10 हजार कोटी रूपयांनी कमी असणार आहे.

मुंबई पालिकेत विरोधी पक्ष नेत्याशिवाय सभागृह, भाजपमुळे तिढा?

मुंबई पालिकेत विरोधी पक्ष नेत्याशिवाय सभागृह, भाजपमुळे तिढा?

बीएमसीच्या सभागृहात विरोधी पक्षनेताच नाही. मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा वाढतच चालला आहे. आज निवडणुकीनंतर  महापालिकेचे पहिले सभागृह हे विरोधी पक्षनेत्याविनाच झाले आहे. विरोधी पक्ष नेते पद हे भाजप घेण्यास तयार नाही. त्यामुळे तिढा वाढलाय.

मुंबई स्थायी समिती निवडणूक बिनविरोध, सातमकर-म्हात्रे यांचा पत्ता कापला

मुंबई स्थायी समिती निवडणूक बिनविरोध, सातमकर-म्हात्रे यांचा पत्ता कापला

महापालिका स्थायी समितीसह सर्व अध्यक्षपदांची निवडणूक बिनविरोध होणार असली, तरी आयत्या वेळी मातोश्रीवरून आलेल्या आदेशांमुळं नावांची अदलाबदल झाली. त्यामुळे मंगेश सातमकर आणि शीतल म्हात्रे यांचा पत्ता कापला गेला.

मुंबई महापालिका तिरोजीच्या चाव्या कोणाकडे?

मुंबई महापालिका तिरोजीच्या चाव्या कोणाकडे?

महापौरपदाच्या निवडणुकीनंतर आता मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे राहणार याची उत्सुकता लागली आहे. 

मुंबई पालिकेत बाळासाहेब... बाळासाहेब... मोदी मोदी घोषणायुद्ध

मुंबई पालिकेत बाळासाहेब... बाळासाहेब... मोदी मोदी घोषणायुद्ध

मुंबई महापालिकेच्या सभागृहात घोषणाबाजीची जुगलबंदी पाहायला मिळाली. त्यामुळे सभागृहातील वातावरण थोडे गरम झालेले दिसून आले.

मुंबई पालिकेवर भगवा, पण महापौरांसमोर अडथळ्यांच्या शर्यत

मुंबई पालिकेवर भगवा, पण महापौरांसमोर अडथळ्यांच्या शर्यत

महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा कायम राखण्यात अखेर शिवसेनेला यश आलं. भविष्यातल्या अडथळ्यांच्या शर्यतीचीही चुणूक पाहायला मिळाली. 

मुंबई महापालिका : स्थायी समिती सदस्यांची यादी

मुंबई महापालिका : स्थायी समिती सदस्यांची यादी

एक सदस्याची निवड अजून होणार आहे. मुंबई महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर, तर उपमहापौरपदी हेमांगी वरळीकर यांची निवड झाली. 

मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपमध्ये घोषणायुद्ध

मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपमध्ये घोषणायुद्ध

मुंबई महानगरपालिका सभागृहात महापौरांच्या निवडणुकीत भाजपनं शिवसेनेला पाठिंबा दिला असला तरी तत्पूर्वी घोषणायुद्ध पाहायला मिळालं. भाजपच्या नगरसेवकांनी मोदींच्या नावानं जोरदार घोषणाबाजी केली. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकांनीही बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

मुंबईत भाजपने शिवसेनेला पाठिंबा देण्यामागची १० कारणे

मुंबईत भाजपने शिवसेनेला पाठिंबा देण्यामागची १० कारणे

भाजपने महापौर आणि सर्वच विषय समितीतून माघार घेतली. त्यामुळे भाजपने अचानक असा निर्णय का घेतला याची चर्चा आहे. या १० कारणांमुळे भाजपच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला असावा.

एकाच दगडात मारले अनेक पक्षी, खडसेंची प्रतिक्रिया

एकाच दगडात मारले अनेक पक्षी, खडसेंची प्रतिक्रिया

मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजप उमेदवार देणार नाही, या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेने एका दगडात अनेक पक्षी मारलेच गेले नाही तर ते सैरभैर झालेत अशी प्रतिक्रिया माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगाव मध्ये दिली. 

भाजपच्या माघारीने गीता गवळी, मनसेचे महत्व झाकोळले!

भाजपच्या माघारीने गीता गवळी, मनसेचे महत्व झाकोळले!

 शिवसेनेचा आता महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने अभासे आणि मनसेला आलेले महत्व कमी झालेय.

काँग्रेसची महापौर पदासाठी विठ्ठल लोकरे यांना उमेदवारी

काँग्रेसची महापौर पदासाठी विठ्ठल लोकरे यांना उमेदवारी

काँग्रेसनेही महापौरपदासाठी नगरसेवक विठ्ठल लोकरे यांना उमेदवारी दिलीय. विठ्ठल लोकरे यांनी दुपारी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

भाजप मुंबई पालिकेवर आपला अंकुश ठेवणार?

भाजप मुंबई पालिकेवर आपला अंकुश ठेवणार?

महापौर, उपमहापौर निवडणुकीतून भाजपने माघार घेतली असली तरी आपला अंकुश ठेवण्यासाठी व्युहरचना केली आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी आयुक्तांसह एक स्वतंत्र उपलोकायुक्ताची नियुक्ती करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

शिवसेनेकडून महापौरपदासाठी विश्वनाथ महाडेश्वर यांचे नाव निश्चित

शिवसेनेकडून महापौरपदासाठी विश्वनाथ महाडेश्वर यांचे नाव निश्चित

मुंबई महापौरपदाच्या शर्यतीत शिवसेनेकडून नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नावाची घोषणा झालीय. महाडेश्वर हे शिवसेनेचे वॉर्ड क्रमांक 87 मधील विजयी नगरसेवक आहेत. तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून हेमांगी वरळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. 

महापौरपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

महापौरपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.. सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता  येणार आहेत.

मुंबई महापौर निवडीबाबत मनसेनेने केली भूमिका जाहीर

मुंबई महापौर निवडीबाबत मनसेनेने केली भूमिका जाहीर

महापालिकेत शिवसेनेचा की भाजपचा महापौर बसणार याकडे लक्ष लागले आहे. यात सर्वात महत्वाची भूमिका ही आता मनसेची असणार आहे. त्यामुळे ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले होते. आता मनसेनेने आपले मौन सोडले आहे. त्यामुळे आता अधिकच रंगत आलेय. 

सेना भवनातून गीता गवळी माघारी, मुख्यमंत्र्याची घेणार भेट

सेना भवनातून गीता गवळी माघारी, मुख्यमंत्र्याची घेणार भेट

 शिवसेना भवनात चर्चेसाठी गेलेल्या गीता गवळी माघारी परतल्या. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी त्यांना चर्चेसाठी थेट वर्षावर निमंत्रण दिलेय.

 अशी होईल मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक

अशी होईल मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक

 मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत राज्यात उत्सुकता ताणवली गेली आहे. त्यामुळे ही निवडणूक नेमकी कशी होणार यावर चर्चा होत आहे. पण नेहमी ही प्रक्रिया कशी होणार जाणून घ्या... 

 मुंबईच्या महापौरपदासाठी तीन पॉवर सेंटर्स राज्याचे लक्ष

मुंबईच्या महापौरपदासाठी तीन पॉवर सेंटर्स राज्याचे लक्ष

देशातली सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबईच्या चाव्या कुणाकडे राहणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलीये... सध्या कुणीच आपले पत्ते उघड करत नाहीये. शिवसेनेचा सूर मवाळ झाला असला आणि भाजपानंही युतीसाठी पाऊलं टाकल्याचं दिसत असलं, तरी अद्याप सगळंच अधांतरीत आहे. नवनिर्वाचित भाजपा नगरसेवक मुख्यालयात आले, तेव्हा याचाच प्रत्यय आला... 

मुंबई महापौर कोण होणार, निवड एक दिवसआधीच

मुंबई महापौर कोण होणार, निवड एक दिवसआधीच

महापालिकेच्या महापौरांची निवड ८ मार्चलाच १२ वाजता होणार आहे. ४ मार्चला महापौरपदाच्या उमेदवारीचा अर्ज भरता येणार आहे. 

मुंबई महापौर निवडणूक : एक दिवस आधी, घटनात्मक पेच?

मुंबई महापौर निवडणूक : एक दिवस आधी, घटनात्मक पेच?

महापालिकेच्या महापौर निवडणूक ९ मार्चला घेणे अपेक्षीत आहे. मात्र, अचानक आयुक्तांनी सुचवलेल्या बदलांमुळे महापौरपदाची निवडणूक एक दिवस आधीच म्हणजे ८ मार्चला होण्याची शक्यता आहे.