लोकल ट्रेनला तीन वर्षांत साडेतीन हजार कोटींचा तोटा

लोकल ट्रेनला तीन वर्षांत साडेतीन हजार कोटींचा तोटा

गेल्या तीन वर्षांत लोकल ट्रेनला सुमारे साडेतीन हजार कोटींचा तोटा सहन करावा लागलाय. वाहतुकीसाठी सोसावा लागणारा खर्च आणि प्रवाशांना स्वस्त दरात दिले जाणारे मासिक पास यामुळं हा तोटा सहन करावा लागतोय. 

लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजांच्या संकल्पनेला कंपनीचा नकार लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजांच्या संकल्पनेला कंपनीचा नकार

बंद दरवाजाच्या लोकल मुंबईच्या उपनगरीय मार्गावर सुरू करण्याच्या रेल्वे मंत्रालयाच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसलाय. स्वयंचलित दरवाजे पुरवणाऱ्या कंपनीनंच या संकल्पनेला नकार दिलाय. 

आपच्या बेशिस्तीनं मुंबईकर त्रस्त!

आम आदमी पक्षाचे समन्वयक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मुंबईतली रिक्षातली सवारी आणि लोकलवारी चांगलीच चर्चेची ठरली. केजरीवाल सकाळी साडे दहाच्या सुमारास दिल्लीहून विमानानं आले. त्यानंतर त्यांनी थेट रिक्षातून अंधेरी स्टेशन गाठलं. त्यांच्यासह त्यांचे कार्यकर्तेही रिक्षातूनच आले खरे मात्र यावेळी त्यांनी सर्व वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्यानं काही काळ वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती.

मेगाब्लॉकने मुंबईकरांचे हाल

आज तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला. त्यात उकाड्याने हैराण झालेल्या रेल्वे प्रवासी घामाच्या धारांनी चिंब भिजलेल्याने अधिकच हैराण झाले होते.

मध्ये रेल्वेवर दगडफेक, कर्जत सेवा ठप्प

अंबरनाथ लोकलमध्ये विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकादरम्यान बिघाड झाल्याने वाहतूक काही वेळ खोळंबली. मात्र, लोकल उशीरा धावत असल्याचे पाहून संतप्त प्रवाशांनी अंबरनाथ येथे रेल्वे रोखल्या आणि गाड्यांवर दगडफेक केली. त्यामुळे वाहतुकीचा अधिकच खोळंबा झाला. मध्य रेल्वेच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक रूळावर

माटुंग्याजवळ आज सकाळी ओव्हरहेड वायरचा खांब झुकल्याने मध्य रेल्वेची वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, ही वाहतूक सुरळीत झाली आहे.

आज मध्यरात्री विशेष रेल्वेसेवा

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आज मध्यरात्री होणारी गर्दी लक्षात घेऊन पश्चिम आणि मध्य रेल्वेने उशिरापर्यंत विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यरात्री १.१० ते रात्री २.४० वाजता या गाड्या धावणार आहेत.

सीएसटी स्थानकात हार्बर रेल्वे रोखल्या

गेल्या एका आठवडय़ापासून हार्बर गाडय़ांचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने संतप्त प्रवाशांनी रात्री छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात (सीएसटी) उपनगरी गाडय़ा रोखून धरल्याने गोंधळ निर्माण झाला.

लोकल ट्रेनच्या प्रवासात गमावला डोळा

मुंबईतला रेल्वे प्रवास हा नेहमीच धोक्याचा मानला जातो. लोकल प्रवास करणाऱ्या लोकांना त्यांचा जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. अशीच काही घटना मुबंईत घडली आहे लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेला आपला डोळा गमवाला लागला.