संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होते आहे. येत्या १८ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात सरकार १६ नवी विधेयकं मांडणार आहे.

भ्याड हल्ल्यानंतर भारताच्या वतीनं चोख प्रत्तुत्तर देण्याचा निर्णय

भ्याड हल्ल्यानंतर भारताच्या वतीनं चोख प्रत्तुत्तर देण्याचा निर्णय

 दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताच्या वतीनं त्यांना चोख प्रत्तुत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हल्ल्याचा निषेध नोंदवताना यात्रा सुरूच ठेवण्यात येणार आहे. आज सकाळी वेळापत्रकानुसार यात्रेकरूची गट कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथच्या दिशेनं रवाना झाले. जम्मू बालताल मार्गावर हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आलीय.  त्याचप्रमाणे देशात सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

इस्राईलमध्ये मोदी ज्या हॉटेलमध्ये थांबलेत ते आहे खास

इस्राईलमध्ये मोदी ज्या हॉटेलमध्ये थांबलेत ते आहे खास

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इस्राईल दौऱ्यावर आहेत. ते जरूसलमच्या किंग डेविड होटलमध्ये थांबले आहेत. या हॉटेलचे मालक म्हणतात की भारतीय पंतप्रधान यावेळी जगाची कोणताही काळजी न करता सर्व चिंता सोडून येथे आराम करु शकतात.

इस्राईलने मोदींच्या सन्मानात फुलाचं नाव ठेवलं 'मोदी'

इस्राईलने मोदींच्या सन्मानात फुलाचं नाव ठेवलं 'मोदी'

इस्रायल भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम याद वाशेम या स्थळाला भेट दिली. याद वाशेम हे इस्रायलचं ऐतिहासिक स्मारक आहे. दुस-या महायुद्धात नाझींनी हत्याकांड केलेल्या असंख्य ज्यूंना हे स्मारक समर्पित करण्यात आलं आहे. त्याआधी नरेंद्र मोदी यांचं आकर्षक फुलांचा गुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. रंगीबेरंगी अशी ही अत्यंत मोहक फुलं सर्वांचंच लक्ष वेधून घेणारी अशी होती. मोदींना ही फुलं भेट दिल्यानंतर, इस्रायलमध्ये या फुलांचं नामकरण मोदी असं करण्यात आलं आहे. 

मोदींच्या इस्राईल दौऱ्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला

मोदींच्या इस्राईल दौऱ्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला

पंतप्रधानांच्या इस्त्रायल दौऱ्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला होईल, असा दावा इस्त्रायलचे भारतातले वाणिज्य दूत डेव्हिड अकाव यांनी केला आहे. भारताबाहेर सर्वाधिक मराठी बोलणारी जनता इस्त्रायलमध्ये राहते. त्यामुळे आमच्या देशाशी महाराष्ट्राचे जवळचे संबंध असल्याचं अकाव म्हणाले.

इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी मोदींच्या योग प्रसाराची केली तोंडभरून स्तुती

इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी मोदींच्या योग प्रसाराची केली तोंडभरून स्तुती

 इस्त्रायलचे पंतप्रधान बेजामिन नित्यान्याहू यांनी मोदींच्या योग प्रसाराची तोंडभरून स्तुती केली. काल मोदींच्या सन्मार्थ दिलेल्या डिनरच्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत नित्यान्याहू यांनी मोदी हे त्याच्यांसाठी योगाची प्रेरणा ठरल्याचं नमूद केल. याशिवाय भारत-इस्त्रायल संबंध आणि योगासनांची सांगडही घातली. तर दहशतवादाशी लढण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र येणं ही काळाची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधोरेखित केलं.

पंतप्रधान मोदी इस्त्रायलच्या राष्ट्रपतींची घेणार भेट

पंतप्रधान मोदी इस्त्रायलच्या राष्ट्रपतींची घेणार भेट

 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इस्त्रायल दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान इस्त्रायलच्या राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. त्याचप्रमाणे राजधानी तेल अव्हिवमध्ये मोदी भारतीय नागरिकांच्या समुदायाला संबोधित करतील. दोन्ही देशात अनेक सामंजस्य करारांवर सह्या होणार आहेत. या प्रत्येक करारासंदर्भातल्या अधिकरी स्तरारावरच्या चर्चा आज पूर्ण करण्यात येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं इस्राईलमध्ये होणार भव्य स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं इस्राईलमध्ये होणार भव्य स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या इस्राईल दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी सवा दहा वाजता दिल्लीहून ते इस्राईलसाठी रवाना होणार आहेत. गेल्या 70 वर्षात इस्राईलचा दौरा करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहे. मोदींच्या या दौऱ्यादरम्यान आता भारत खंबीरपणे इंस्राईलशी संबंध जगासमोर ठेवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायल दौरा अनेक गोष्टींसाठी ऐतिहासिक असणार आहे. भारत आणि इस्राईल यांच्यातील कुटनिती संबंधांना 25 वर्षे पूर्ण होत आहेत. या 25 वर्षामध्ये नरेंद्र मोदी भारताचे पहिले पंतप्रधान आहेत जे इस्रायलच्या भूमीवर पाऊल ठेवणार आहेत.

मोदींच्या इस्राईल दौऱ्यात गायिका लेआरा इत्झेक गाणार राष्ट्रगीत

मोदींच्या इस्राईल दौऱ्यात गायिका लेआरा इत्झेक गाणार राष्ट्रगीत

मुळची भारतीय आणि इस्रायलची गायिका लेआरा इत्झेक 4 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौ-यावर भारत आणि इस्रायलचे राष्ट्रगीत गाणार आहे.

सोशल मीडियाचे जागतिक लीडर मी आणि मोदी : ट्रम्प

सोशल मीडियाचे जागतिक लीडर मी आणि मोदी : ट्रम्प

अमेरिका दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा सुरु आहे.  

मोदी-ट्रम्प यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील ११ महत्त्वाचे मुद्दे

मोदी-ट्रम्प यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील ११ महत्त्वाचे मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेला सामोरं गेले.

ट्रम्प यांच्या पत्नीने असं केलं मोदींचं खास स्वागत

ट्रम्प यांच्या पत्नीने असं केलं मोदींचं खास स्वागत

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा खास आहे. राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप हे जितके या दौऱ्यामुळे खूश आहेत तितकीच त्यांची पत्नी देखील खूश आहे. अमेरिकेच्या पहिल्या महिला नागरिक मेलानियाने मोदींचं स्वागत एका खास अंदाजात केलं. 

मोदींकडून ट्रम्प यांना सहकुटुंब भारतात येण्याचं निमंत्रण

मोदींकडून ट्रम्प यांना सहकुटुंब भारतात येण्याचं निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंध, दहशतवाद, अफगाणिस्तानातील अस्थिरता या आणि अशा अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत फर्स्ट अमेरिकेन आणि मेक इन इंडियाच्या या दोन देशांच्या दोन भिन्न धोरणांवरही चर्चा करण्यात आली.

लखनऊमध्ये मोदी आणि योगींची एकत्र योगासनं

लखनऊमध्ये मोदी आणि योगींची एकत्र योगासनं

आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. देशातला सर्वात मुख्य कार्यक्रम उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पार पडला. लखनऊच्या रमाबाई आंबेडकर मैदानात घेण्यात आला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः हजेरी लावली. दरवर्षी प्रमाणे यंदाही मोदी स्वतः सर्वसामान्य मुलामध्ये जाऊन योगासनं करताना दिसले. अतिशय उत्साहात मोदींनी इतरांपेक्षा जवळपास अर्धातास आधीच सगळी योगासनं संपवली.

अत्याधुनिक लढाऊ विमानं F-16 भारतात तयार होणार

अत्याधुनिक लढाऊ विमानं F-16 भारतात तयार होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडिया कार्यक्रमाला या करारामुळे मोठी उभारी मिळणार

कृषीतज्ज्ञ स्वामीनाथन यांच्याकडून मोदी सरकारचं कौतुक

कृषीतज्ज्ञ स्वामीनाथन यांच्याकडून मोदी सरकारचं कौतुक

हरीतक्रांतीचे जनक अशी ख्याती असलेले कृषीतज्ज्ञ एमएस स्वामीनाथन यांनी मोदी सरकारवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

दहशतवादाविरोधातील लढाईमध्ये भारत-फ्रान्स एकत्र

दहशतवादाविरोधातील लढाईमध्ये भारत-फ्रान्स एकत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सचे नवे राष्ट्रपतींनी आश्वासन दिलं आहे की, दहशतवादाविरोधील युद्धामध्ये फ्रान्स भारतासोबत उभा राहिल. दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पीएम मोदी फ्रान्समध्ये होते. त्यांनी फ्रान्सचे नवे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रों यांची भेट घेतली.

मोदी सरकारची तीन वर्ष, हे आहेत टॉप १० निर्णय

मोदी सरकारची तीन वर्ष, हे आहेत टॉप १० निर्णय

२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षानं काँग्रेसला धूळ चारत मोठ्या बहुमताने सत्ता स्थापन केली.

२०१९ निवडणुकीआधी मोदींच्या हातात असतील देशाचे आर्थिक आकडे

२०१९ निवडणुकीआधी मोदींच्या हातात असतील देशाचे आर्थिक आकडे

मोदी सरकारचा ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होतोय. देशाचे आर्थिक आकडे असंच दाखवत आहेत की देशाच्या आर्थिक स्थितीत मागील ३ वर्षात सुधार झाला आहे. केंद्रात मोदी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे हे आकडे समोर आले आहेत. या आकड्यांचा प्रभाव पुढच्या २ वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेवर दिसणार आहे. २०१९ पर्यंत भारताचे आर्थिक आकडे आणखी चांगले असतील. एका हिंदी न्यूज चॅनेलने दिलेल्या बातमीनुसार भारत २०१९ पर्यंत अधिक मजबूत स्थितीत असेल.

मोदींपासून योगींपर्यंत... पाहा काय आहे नेत्याचं शिक्षण

मोदींपासून योगींपर्यंत... पाहा काय आहे नेत्याचं शिक्षण

देशात खूप मोठ्या अंतरानंतर भाजपची बहुमताची सरकार आली. भाजपच्या या यशामध्ये अनेक भाजप नेत्यांचा मोठा हात होता. अशाच काही भाजप नेत्यांचं शिक्षण किती याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

मोदीजी मला वाचवा, माझाकडून चूक झाली, युवकाचा व्हिडिओ व्हायरल

मोदीजी मला वाचवा, माझाकडून चूक झाली, युवकाचा व्हिडिओ व्हायरल

कर्जबाजारीपणामुळे हैराण एका युवकाने पंतप्रधान मोदींकडे मदत मागितली