दानवे, मंत्री पंकजा मुंडे, राजेश टोपे यांनी थकविली शेतकऱ्यांची देणी

दानवे, मंत्री पंकजा मुंडे, राजेश टोपे यांनी थकविली शेतकऱ्यांची देणी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री पंकजा मुंडे आणि राजेश टोपे यांनी शेतकऱ्यांची देणी थकविल्याचे पुढे आलेय. ऊस उत्पादकांची थकीत रक्कम न दिल्याप्रकरणी दानवे, मुंडे, टोपे संचालक असलेल्या १६ साखर कारखान्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

कॉलेजमध्ये पुन्हा रणधुमाळी

कॉलेजमध्ये आता निवडणुकांचे फड रंगणार आहेत. विद्यापीठांमध्ये निवडणुका घेण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्याबाबत विविध पक्षनेत्यांशी चर्चा करण्यात येत आहे. येत्या १५ दिवसांत या बाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

मनसेने काढला शिक्षणमंत्र्यांचा घोटाळा बाहेर

राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी नवी मुंबईतल्या शिक्षण संस्थेतला गोंधळ समोर आलाय. वाशीच्या सिलिकॉन टॉवर या निवासी इमारतीच्या एका मजल्यावर केवळ 4-5 खोल्यांमध्ये हे कॉलेज सुरू आहे.

आदर्श घोटाळ्याप्रकरणी तीन मंत्र्यांना समन्स

मुंबईतल्या आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांना चौकशी आयोगानं समन्स बजावलाय. तसंच राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनाही चौकशी आयोगानं समन्स बजावलाय.

अखेर प्राध्यापकांचा संप मागे

राज्यातला प्राध्यापकांचा संप अखेर मागे घेण्यात आलाय. उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या लेखी पत्रानंतर हा संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आलीय.

उच्च शिक्षण मंत्र्यांचा प्राध्यापकांना इशारा

उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार घालणाऱ्या प्राध्यापकांना दोन दिवसांत संप मागे घेऊन कामावर हजर होण्याचं आवाहन सरकारनं केलंय. दोन दिवसांत संप मागे घेतला नाही तर कारवाई करू, असा सज्जड इशारा उच्चशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिलाय.

एमआयटी महाविद्यालयात विद्यार्थी संसद परिषद

पुण्यातलं एम आय टी महाविद्यालय आयोजीत दुसऱ्या विद्यार्थी संसद परिषदेला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. शिक्षण मंत्री राजेश टोपे, पद्माकर वळवी, सिने अभिनेत्री नंदिता दास यांच्या उपस्थितीत या परिषदेचा उद्घाटन समारंभ पार पडला.