सेल्फी काढताना तरुणाचा समुद्रात पडून मृत्यू

सेल्फी काढताना तरुणाचा समुद्रात पडून मृत्यू

मुरूड इथे सेल्फी काढताना पर्यटकाचा मृत्यू झालाय.

चोरुन गुटखा विक्री, रोहा येथे भरलेला कंटेनर जप्त चोरुन गुटखा विक्री, रोहा येथे भरलेला कंटेनर जप्त

बंदी असली तरी राज्याच्या अनेक भागात गुटखा मोठया प्रमाणात चोरून विकला जातोय. रायगड जिल्हयाच्या रोहा तालुक्यातील बाहे येथील तरूणांनी गावाशेजारीच असलेला गुटख्यानं भरलेला कंटेनरच पकडून दिला.

१४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, महाविद्यालयाचे संस्थाचालक, शिक्षकांवर गुन्हा १४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, महाविद्यालयाचे संस्थाचालक, शिक्षकांवर गुन्हा

रायगड जिल्ह्यातील मुरुडमधील समुद्रात पुणे कॅम्प भागातील आबेदा इनामदार महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी आज मंगळवारी महाविद्यालयाचे संस्थाचालक आणि सहल घेऊन गेलेल्या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

गाडी बाजूला घ्‍यायला सांगितल्‍याने दोघा पोलिसांना बेदम मारहाण गाडी बाजूला घ्‍यायला सांगितल्‍याने दोघा पोलिसांना बेदम मारहाण

गाडी बाजूला घ्‍यायला सांगितल्‍याचा राग येऊन सेवेवर तैनात दोघा पोलिसांना बेदम मारहाण केल्याची घटना रायगडमध्ये घडलीय. 

रायगड जि.प. अध्यक्षांवर अविश्वास ठराव, विरोधकांवर डाव पलटला रायगड जि.प. अध्यक्षांवर अविश्वास ठराव, विरोधकांवर डाव पलटला

रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्यासह सर्व सभापतींविरूदध अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचाली विरोधकांकडून सुरू होत्या. मात्र सत्ताधा-यांनीच अविश्वास ठराव दाखल करीत विरोधकांची अडचण केलीय.

रायगडमध्ये भाजपचा धुव्वा, सेना-राष्ट्रवादीने गड राखलेत रायगडमध्ये भाजपचा धुव्वा, सेना-राष्ट्रवादीने गड राखलेत

येथे नगर पंचायत निवडणुकीत भाजपचे पानिपत झाले. तर एका ठिकाणी शेकापने जोरदार मुसंडी मारली. शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपले गड शाबुत राखल्याचे निकालावरुन स्पष्ट झालेय.

रायगड पोलीस ऑनलाईन, थेट करु शकता  ऑनलाईन तक्रार रायगड पोलीस ऑनलाईन, थेट करु शकता ऑनलाईन तक्रार

रायगड पोलिसांनी नवीन वर्षाचे स्वागत आपला संकल्प प्रत्यक्षात आणत केलाय. रायगड पोलीस विभाग आता ऑनलाईन झालाय.

पत्नीची क्रूर हत्या...  रायगडच्या अतिफला दुबईत देहदंडाची शिक्षा! पत्नीची क्रूर हत्या... रायगडच्या अतिफला दुबईत देहदंडाची शिक्षा!

मूळचा रायगड जिल्ह्यातल्या नांदवी गावचा असलेल्या अतिफ पोपेराला दुबईच्या सर्वोच्च न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलीय. स्वत:च्या पत्नीचाच खून केल्याच्या गुन्ह्याखाली अतिफला ही शिक्षा सुनावण्यात आलीय.

हमीभाव न मिळाल्याने ८४ हजार क्विंटल भात गोदामात सडतेय हमीभाव न मिळाल्याने ८४ हजार क्विंटल भात गोदामात सडतेय

भाताला हमीभावाबरोबरच २०० रुपये बोनस देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात जाहीर केला खरा. मात्र केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे रायगड जिल्ह्यात यंदाही एकही भात खरेदी केंद्र सुरु झालेलं नाही. दुसरीकडे ८४ हजार क्विंटल भात जिल्ह्यातील गोदामात सडत पडतेय.

रायगडात शुद्ध पाण्यासाठी 'एनी टाइम वॉटर कार्ड' रायगडात शुद्ध पाण्यासाठी 'एनी टाइम वॉटर कार्ड'

रायगडमध्ये शुद्ध पाण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थांना एटीडब्ल्यू अर्थात रायगडात शुद्ध पाण्यासाठी 'एनी टाइम वॉटर कार्ड' देण्यात आले आहे.

मुंबई, ठाण्यात रिमझिम पावसाची हजेरी! मुंबई, ठाण्यात रिमझिम पावसाची हजेरी!

लोकांना घामाच्या धारांत भिजवणारं ऊन जरासं बाजुला सारून पावसानं आज दुपारी पुन्हा एकदा हजेरी लावली. महाराष्ट्रात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पनवेल, पेण, रायगड या ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरींनी नागरिकांना सुखद धक्का दिला.

रायगड दुचाकी स्फोट : पोलीस प्रल्हाद पाटील बडतर्फ रायगड दुचाकी स्फोट : पोलीस प्रल्हाद पाटील बडतर्फ

रायगड जिल्ह्यात अलिबाग इथल्या पोलीस मुख्यालयात दुचाकी स्फोट घडवून सहकाऱ्याचा खून करणाऱ्या प्रल्हाद पाटील याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. रायगडचे पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी ही कारवाई केली.

बाईक स्फोटातील 'त्या' पोलिसाचा मृत्यू बाईक स्फोटातील 'त्या' पोलिसाचा मृत्यू

रायगड जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या आवारात काल झालेल्या दुचाकी स्फोटात जखमी पोलीस कर्मचारी निकेश पाटील यांचा मृत्यू झालाय. सकाळी त्यांचं पार्थिव पोस्टमॉर्टेमसाठी मुंबईत जे जे रुग्णालयात नेण्यात आले. 

रायगडमध्ये मोटारसायकल स्फोटात पोलीस जखमी रायगडमध्ये मोटारसायकल स्फोटात पोलीस जखमी

रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या आवारात आज दुपारी मोटारसायकलचा स्फोट झाला. यात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला. मोटारसायकल सुरु करताना हा स्फोट झाला.

गोंधळात गोंधळ... खेड, चिपळूण, संगमेश्वर रायगडच्या ताब्यात! गोंधळात गोंधळ... खेड, चिपळूण, संगमेश्वर रायगडच्या ताब्यात!

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम पुन्हा एकदा वादात सापडलंय. कारण, मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची नव्याने विभागणी करताना निम्मा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्ह्याच्या स्वाधीन करण्यात आलाय. त्यामुळे भूमिसंपादन असेल किंवा चौपदरीकरणासंदर्भात इतर कोणतंही काम असेल तर रायगडलाच जावं लागेल. या भीतीने नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. तसंच हा आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी होऊ लागलीय.

वाळू माफियांनी तहसिलदाराच्या अंगावर घातला ट्रक वाळू माफियांनी तहसिलदाराच्या अंगावर घातला ट्रक

जिल्ह्यात वाळू माफियांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. वाळू चोरी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यावर पुन्हा एकदा प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. 

इंद्राणीनं मिखाईलला मारण्यासाठी दिली होती सुपारी, कॉन्ट्रॅक्ट किलर अटकेत इंद्राणीनं मिखाईलला मारण्यासाठी दिली होती सुपारी, कॉन्ट्रॅक्ट किलर अटकेत

शीना बोरा हत्याप्रकरणात आणखी एक खुलासा झालाय. इंद्राणी मुखर्जीनं आपला मुलगा मिखाईल बोराला मारण्यासाठी मुंबईतील एका कॉन्ट्रॅक्ट किलरला सुपारी दिली होती.

शीना हत्याप्रकरण : पेणच्या जंगलात 10 ते 12 मानवी हाडं सापडलीत शीना हत्याप्रकरण : पेणच्या जंगलात 10 ते 12 मानवी हाडं सापडलीत

शीना हत्याप्रकरणी पेणच्या जंगलात मुंबई पोलिसांना महत्वाचे पुरावे सापडले आहेत. खोदकामात 10 ते 12 मानवी हाडं आढळलीत. आता डीएनए चाचणीनंतर गुढ उलगडण्यास मदत होणार आहे.

रायगडच्या जंगलात सापडले शीनाच्या मृतदेहाचे अवशेष रायगडच्या जंगलात सापडले शीनाच्या मृतदेहाचे अवशेष

आज सकाळी शीना बोरा हत्या प्रकरणी मुंबई पोलिसांचं पथक रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये दाखल झालं. इथल्या जंगलात त्यांना शीनाच्या मृतदेहाचे अवशेष सापडले आहेत. दरम्यान, या हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जीसोबतच तिचा माजी पती संजीव खन्ना यालादेखील ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 

शीना हत्याप्रकरण: इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्नाला कोलकातातून अटक शीना हत्याप्रकरण: इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्नाला कोलकातातून अटक

शीना बोरा हत्याप्रकरणात स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जींची पत्नी इंद्राणीच्या अटकेनंतर प्रकरणाला आणखी वेगळं वळण लागलंय. तर तिकडे कोलकातामधून पोलिसांनी इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्नाला अटक केलीय.