राष्ट्रवादी कॉंग्रेस

‘राष्ट्रवादीच्या सदस्यांची पंधरा कोटींना विक्री’

‘राष्ट्रवादीच्या सदस्यांची पंधरा कोटींना विक्री’

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी मंत्री सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे पाच सदस्य पालकमंत्री पंकजा मुंडे यांना पंधरा कोटी रुपयात विकले असा घणाघाती आरोप विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केल, या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.

Nov 14, 2017, 08:51 AM IST
देशात लोकशाही मुल्यांना धोका - शरद पवार

देशात लोकशाही मुल्यांना धोका - शरद पवार

  सत्तेचे केंद्रीकरण झाले की, भ्रष्ट मार्गाने जाते. सध्या देशात असेच वातावरण आहे, असे सांगतानाच देशात लोकशाही मुल्यांवर मर्यादा येत आहेत, असा थेट हल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप प्रणीत केंद्र आणि राज्य सरकारवर चढवला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते मंगळवारी बोलत होते.

Nov 7, 2017, 04:54 PM IST
पवारांनी साधले टायमिंग; शेट्टीना हात, खोतांना टोला

पवारांनी साधले टायमिंग; शेट्टीना हात, खोतांना टोला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि राज्याचे कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील कलगीतुऱ्यावरून शरद पवार यांनी टायमिंग साधत चांगलाच टोला हाणला आहे. राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवारांची ही प्रतिक्रीया भिविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारी नसेल तरच नवल.

Aug 22, 2017, 04:02 PM IST
आबांची उणीव भरून निघणारी नाही: शरद पवार

आबांची उणीव भरून निघणारी नाही: शरद पवार

स्वर्गीय आर. आर. पाटील, आबा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक अतिशय महत्त्वाचे नेतृत्व होते, त्यांची उणीव भरून निघणारी नाही, अशी भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची आज (16 ऑगस्ट) जयंती आहे.

Aug 16, 2017, 05:11 PM IST
अठरा पगड जातीच्या प्रश्नालाही मराठा समाजाची साथ राहील: शरद पवार

अठरा पगड जातीच्या प्रश्नालाही मराठा समाजाची साथ राहील: शरद पवार

मराठा समाजाच्या सर्वसमावेशक प्रश्नाकडे राज्य सरकार गांभीर्याने पाहील अशी अपेक्षा आहे- शरद पवार

Aug 9, 2017, 03:12 PM IST
मराठा आरक्षण: विधनपरिषदेत खडाजंगी; राजदंड पळविण्याचा प्रयत्न

मराठा आरक्षण: विधनपरिषदेत खडाजंगी; राजदंड पळविण्याचा प्रयत्न

मराठा मोर्चा: चर्चा नको आरक्षण द्या - धनंजय मुंडे यांची मागणी

Aug 9, 2017, 01:22 PM IST
परभणीत राष्ट्रवादीला काँग्रेसकडून दे धक्का, शिवसेना-भाजप सात-सात

परभणीत राष्ट्रवादीला काँग्रेसकडून दे धक्का, शिवसेना-भाजप सात-सात

महापालिकेच्या ६५ जागांसाठी ४१८ उमेदवार रिंगणात होते. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. पुणे, पिंपरी-चिंचवड गमावल्यानंतर आता परभणीतील वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेससमोर होते. येथे मित्रपक्ष काँग्रेसने सत्ता काबीज केली.

Apr 21, 2017, 02:43 PM IST
राष्ट्रवादी कॉंग्रेसची पिछेहाट नाही - सुनील तटकरे

राष्ट्रवादी कॉंग्रेसची पिछेहाट नाही - सुनील तटकरे

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला त्यामुळे पक्षाची पिछेहाट झाली असे मी अजिबात मानत नाही असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

Feb 27, 2017, 09:53 AM IST

आघाडीत बिघाडी?

पवारांच्या वक्तव्याला काँग्रेसनं उत्तर दिलं आहे. पुढच्या निवडणूकीत आघाडी ठेवायची की नाही याचा विचार करु, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिलाय.

Mar 24, 2012, 10:08 PM IST

आघाडीत बिघाडी, कोकणाकडे लक्ष

कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी न होता बिघाडी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसचा कस लागणार आहे.

Jan 28, 2012, 05:04 PM IST

...आणि अजित पवार भडकले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत स्थानिक नेत्यांची चांगलीच कानउघडणी केलीये. राष्ट्रवादीच्या निवड समितीच्या सदस्यांनी आणि नेत्यांनी आपल्या समर्थक आणि नातेवाईकांच्या तिकीटासाठी फिल्डिंग लावल्यानं अजित पवार नाराज झालेत.

Jan 25, 2012, 09:00 AM IST

नाराजी, बंड आणि तोडफोड

महापालिका निवडणुकांचे वारे जोराने वाहायला सुरुवात झालीय. आघाडी आणि युतीच्या बोलणी झाल्यानंतर आता राजकीय पक्षांना आता अनेकांच्या नाराजीचा सामना करावा लागतोय.

Jan 13, 2012, 05:07 PM IST

आघाडीचा निर्णय लांबणीवर

संध्याकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर्षा बंगल्यावर काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुनच सोमवारी आघाडीचा निर्णय घेण्यावर एकमत झालं आहे.

Jan 8, 2012, 12:13 AM IST

राष्ट्रवादी उपाध्यक्षाच्या हद्दपारीचे आदेश

जळगावमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसचा उपाध्यक्ष अनिल चौधरीला पोलिसांनी हद्दपारीचे आदेश दिलेत.

Dec 7, 2011, 05:44 AM IST

अजित दादांना आव्हान हर्षवर्धन पाटलांचे

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजितदादा असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. काँग्रेसनं पिंपरी चिंचवडची जबाबदारी हर्षवर्धन पाटलांवर टाकली आहे. तर राष्ट्रवादीच्या अजिदादांकडं पिंपरी चिंचवडचं पालकत्व आहे.

Dec 5, 2011, 08:53 AM IST