'हजार-पाचशेच्या नोटांसारखे काँग्रेस-राष्ट्रवादीला घरी पाठवा'

'हजार-पाचशेच्या नोटांसारखे काँग्रेस-राष्ट्रवादीला घरी पाठवा'

हजार पाचशेच्या नोटांसारखे काँग्रेस राष्ट्रवादीला घरी पाठवा अशी टीका ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनी केली आहे.

 पिंपरीत कार्यकर्ता गोंधळात, म्हणतो कोणता झेंडा घेऊ हाती...

पिंपरीत कार्यकर्ता गोंधळात, म्हणतो कोणता झेंडा घेऊ हाती...

निवडणूक म्हटलं की राजकीय पुढाऱ्यांच्या कोलांटउड्या ओघानं आल्याच. आयुष्यभर एका पक्षाशी निष्ठा दाखवत पद उपभोगायची पण ऐन निवडणुकीत तिकीट डावललं किंवा मनासारखं झालं नाही की दुसऱ्या पक्षात जायचं ही नेत्यांची 'चाल' जनतेला नवी नाही. पण नेत्यांच्या या कोलांटउड्यात जो कार्यकर्ता पक्षाकडून कसलीही अपेक्षा न बाळगता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतो आणि एका पक्षाशी निष्ठा दाखवतो त्याच्या पदरी मात्र निराशाच येते. 

 पुण्यात जागा वाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता

पुण्यात जागा वाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता

पुण्यात भाजप सेनेमध्ये युतीची चर्चा सुरु होताच काँग्रेस - राष्ट्रवादीलादेखील आघाडीची गरज वाटू लागलीय. आघाडी करण्याबाबत दोन्ही बाजूंनी सकारात्मक विचार सुरु असून जागावाटपाचे प्रस्ताव परस्परांना देण्यात आले आहेत. मात्र सध्या त्यावरूनच तिढा निर्माण होण्याची देखील शक्यता आहे.

सेनेच्या #Didyouknow? कॅम्पेनला जोरदार प्रत्यूत्तर

सेनेच्या #Didyouknow? कॅम्पेनला जोरदार प्रत्यूत्तर

मुंबई महापालिका निवडणूक जवळ येतेय, तशी सोशल मीडियावर देखील जोरदार लढाई सुरू झालीय. कोणत्या राजकीय पक्षाचं कॅम्पेन किती आकर्षक आहे, याची चर्चा सुरू झालीय. यानिमित्तानं मुंबईत सर्वत्र बॅनरबाजीही रंगलीय...

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादीच्या उमेदवारांना फोन..! पक्षात या नाही तर चौकशी लागेल..!

राष्ट्रवादीच्या उमेदवारांना फोन..! पक्षात या नाही तर चौकशी लागेल..!

निवडणुका जिंकायच्या म्हटलं तर साम दाम दंड भेद नीती काहीही वापरा तुम्हाला ते माफ असतं...! पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय पक्षांच्या आरोप प्रत्यारोपांमुळं त्याची जाणीव आता सर्वाना होऊ लागलीय....! 

नोटबंदीचे ऑपरेशन यशस्वी पेशंट डेड - शरद पवार

नोटबंदीचे ऑपरेशन यशस्वी पेशंट डेड - शरद पवार

 देशात काळा पैशाची समस्या होती, काळा पैसा चलनातून हद्दपार व्हायला हवा अशी भूमिका सर्वांची होती, पण त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नसल्याने ऑपरेशन यशस्वी पण पेशंट डेड अशी अवस्था झाल्याची उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली. 

भाजपला फाजील आत्मविश्वास, गोंधळलेल्या राष्ट्रवादीचा अजित पवारांवर विश्वास...!

भाजपला फाजील आत्मविश्वास, गोंधळलेल्या राष्ट्रवादीचा अजित पवारांवर विश्वास...!

निवडणुकींना सामोरं जाताना पक्षांची एक ठराविक स्थिती असते... पिंपरी चिंचवडमध्येही सध्या विविध राजकीय पक्षांची वेगवेगळी स्थिती आहे...! 

युती - आघाडीची दारे खुली, पण राष्ट्रवादी, भाजपचा स्वबळाचा नारा!

युती - आघाडीची दारे खुली, पण राष्ट्रवादी, भाजपचा स्वबळाचा नारा!

निवडणूक जाहीर होण्यापूर्वी स्वबळाची भाषा करणाऱ्या सर्व पक्षांनी आता आघाडी-युतीबाबत चर्चा सुरू असल्याची घोषणा केली आहे. या निवडणुकीत युती-आघाडी होणार नाही अशी चर्चा सुरू असतानाच निवडणुका जाहीर होताच दोन्ही पातळीवर फोनवरून संपर्क करण्यापर्यंत युती-आघाडीची दारं खुली झाली आहेत.

भाजपचे आशिष शेलारांवर भ्रष्टाचाराचे आरोप, ४० कोटीं भूखंड बिल्डरच्या घशात

भाजपचे आशिष शेलारांवर भ्रष्टाचाराचे आरोप, ४० कोटीं भूखंड बिल्डरच्या घशात

राष्ट्रवादीचे प्रवक्त नवाब मलिक यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला शेलार काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादीच्याच विरोधात आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादीच्याच विरोधात आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्याच विरोधात आंदोलन केलं. आमदार विद्या चव्हाणांच्या समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातच मोर्चा काढला.

पुण्याचा कारभारी कोण, सर्वांची प्रतिष्ठा पणाला

पुण्याचा कारभारी कोण, सर्वांची प्रतिष्ठा पणाला

राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या १० वर्षांची सत्ता येनकेन प्रकारे उलथवून टाकण्यासाठी सरसावलेला भाजप, पक्षाचा बालेकिल्ला राखण्याच्या इर्षेनं पेटून उठलेला राष्ट्रवादी काँग्रेस, गेल्या वेळच्या यशाची आशा बाळगून असलेला मनसे, अस्तित्वाच्या लढाईला सामोरं जात असलेला काँग्रेस; 

पानसरेंच्या प्रवेशाने भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष आणि  राष्ट्रवादीत...

पानसरेंच्या प्रवेशाने भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष आणि राष्ट्रवादीत...

 निवडणुकांच्या तोंडावर नेत्यांचं पक्षांतर नवं नाही....पिंपरी चिंचवड ही त्याला अपवाद नाही...! राष्ट्रवादीचे तगडे नेते आझम पानसरे यांनी केलेल्या भाजप प्रवेशामुळंही पिंपरी चिंचवड च्या राजकारणात अनेक परिणाम होण्याची चिन्ह आहेत...!

राष्ट्रवादीचं बँक ऑफ इंडिया समोर म्हशी बांधून आंदोलन

राष्ट्रवादीचं बँक ऑफ इंडिया समोर म्हशी बांधून आंदोलन

आज नोटाबंदीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं अनोखं आंदोलन केलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी या आंदोलनामधे बँक ऑफ इंडियाच्या समोर म्हशींना बांधून सरकारचा निषेध केला. यावेळी आंदोलकांनी बँकेसमोर आणलेल्या म्हशी बँकेमध्ये घुसवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवून आंदोलकांना रोखलं. त्यामुळं पोलिस आणि आंदोलक यांच्यामध्ये झोंबाझोंबी झाली.

तिरोड्यात सर्वाधिक राष्ट्रवादीचे नगरसेवक पण सत्ता भाजपची

तिरोड्यात सर्वाधिक राष्ट्रवादीचे नगरसेवक पण सत्ता भाजपची

तिरोडा - तिरोडा नगरपालिकेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असले तरी सत्ता मात्र भाजपच्या हाती गेली आहे. तिरोड्यात नगराध्यक्षपदी भाजपच्या सोनाली देशपांडे यांना विजय मिळाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 नगरसेवक निवडून आलेत.  तर भाजप-सेना युतीचे सात नगरसेवक विजयी झाले आहेत.

पुणे पालिकेत विरोधी पक्षनेत्यावरुन रणसंग्राम, पदासाठी चुरस निर्माण

पुणे पालिकेत विरोधी पक्षनेत्यावरुन रणसंग्राम, पदासाठी चुरस निर्माण

आगामी महापालिका निवडणुकीत महापौर कुणाचा होणार यावरून रणसंग्राम सुरु झालाय. मात्र त्याचवेळी  पुण्यामध्ये  विरोधी पक्षनेतापदाची चर्चा रंगलीय. आश्चर्य वाटेल पण हे खरय. मावळत्या महापालिकेत औट घटकेचं विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

शरद पवार आक्रमक, नोटा छापणाऱ्या छबूला फासावर लटकवा

शरद पवार आक्रमक, नोटा छापणाऱ्या छबूला फासावर लटकवा

बनावट नोटा छापल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा युवा पदाधिकारी छबू नागरे आणि त्याच्या ११ साथीदारांना नाशिक पोलिसांनी अटक केल्याने पक्षाची चांगलीच बदनामी झाली आहे. यामुळे राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. नोटा छापणाऱ्या छबूला फासावर लटकवा, अशी मागणी पवारांनी केली आहे.

 पुणेकरांनो राष्ट्रवादीने दिला आपला जाहीरनामा

पुणेकरांनो राष्ट्रवादीने दिला आपला जाहीरनामा

 पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.  राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अजित पवार यांच्या हस्ते  जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं. 

राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा, मुंबई पालिका निवडणुकीची पहिली यादी जाहीर

राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा, मुंबई पालिका निवडणुकीची पहिली यादी जाहीर

 राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील आपल्या ४५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहे.  

पिंपरीत काँग्रेसला खिंडार ७ नगरसेवक राष्ट्रवादीत!

पिंपरीत काँग्रेसला खिंडार ७ नगरसेवक राष्ट्रवादीत!

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला पुरते हैराण करणार अशा आविर्भावात असलेल्या भाजपला जोरदार धक्का देत अजित पवार यांनी काँग्रेसला खिंडार पाडत ७ नगरसेवक राष्ट्रवादीत आणले

 भाजपला जिंकायचं पुणं....

भाजपला जिंकायचं पुणं....

 नगरपालिका निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं आहे. त्याचीच पुनरावृत्ती भाजपला महापालिका निवडणुकीत करायची आहे. त्यातही मुंबई पाठोपाठ भाजपचं सर्वाधिक लक्ष पुण्यावर आहे. पुणे महापालिका काबीज करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांची सुरवातही चांगली झाली आहे. पण, त्याला पक्षीय राजकारणाचं ग्रहण लागताना दिसतंय.