अमेरिकेत वादळाचे २१ बळी

Last Updated: Saturday, February 15, 2014, 12:35

अमेरिकेत पुन्हा एकादा वादळाचा तडाखा बसला आहे. याआधी जोरदार बर्फसृष्टी झाली होती. हिवाळी वादळाचा जोरदार तडाखा बसल्याने शुक्रवारी २१ जणांचा बळी गेला.

अबब! अमेरिका @ उणे ५२!

Last Updated: Wednesday, January 08, 2014, 12:36

ध्रुवीय वादळाच्या तडाख्यामुळं निम्मी अमेरिका बर्फमय झालीय. उत्तर अमेरिकेत कॅनडाच्या सीमेवर असलेल्या मोंटाना राज्यात तर उणे ५२ अंश इतके तापमान नोंदवलं गेलंय. शतकातलं सर्वात थंड तापमान म्हणून हे नोंदवलं जाण्याची शक्यता आहे.

लहेर चक्रीवादळाची शक्यता, आंध्र प्रदेश किनारपट्टीवर सतर्कतेचे आदेश

Last Updated: Wednesday, November 27, 2013, 10:53

लहेर चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत. ऊद्या दुपारपर्यंत हे चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकेल अशी शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यसरकारने या नैसर्गीक आपत्तीचा सामना करण्यासाठी उपाययोजना सुरू केली आहे.

आंध्र प्रदेशला चक्रीवादळ, मुसळधार पावसाचा तडाखा

Last Updated: Friday, November 22, 2013, 16:34

आंध्र प्रदेशला पुन्हा एकदा चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. हेलेन या चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला आहे. फायलिन वादळानंतर हेलेनने तडाखा दिला आहे. या वादळबरोबरच मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे.

`हैयान`च्या विनाशकारी तांडवात १० हजार नागरिकांचा मृत्यू

Last Updated: Sunday, November 10, 2013, 17:38

फिलिपिन्सला बसलेल्या हैयान या चक्रिवादळानं सुमारे दहा हजारांहून अधिक जणांचा बळी घेतला असून वादळानं हजारो जणांना बेघर केलंय. या वादळाचा मोठा फटका मध्यवर्ती फिलिपिन्सलाही बसलाय. आतापर्यंत देशातली ही सर्वात मोठी आपत्ती आहे.

फायलिनला भारताने हरवलं

Last Updated: Sunday, October 13, 2013, 13:16

फायलिनला भारताने हरवलं आहे. शनिवारी ओडिशा आणि आंध्रच्या किनारपट्टीवर धडकलेल्या फायलिन चक्रीवादळाचा वेग मंदावलाय. गोपालपूरमध्ये वारे आता ताशी 90 ते 100 किमी वेगाने वारे वाहत आहेत.

फायलीनचं संकट उंबरठ्यावर, तीन जणांचा मृत्यू

Last Updated: Saturday, October 12, 2013, 18:05

फायलीन चक्रीवादळ वेगाने भारताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. ‘फायलीन’ ओडिशामध्ये धडकण्यापूर्वीच वादळामुळे झाडं उन्मळून पडल्यानं तीन जणांचा मृत्यू झालाय.

फायलीन चक्रीवादळ : विमानसेवेवर परिणाम, मच्छिमारांना इशारा

Last Updated: Saturday, October 12, 2013, 15:08

फायलीन चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. काही उड्डाणं रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय.

शिवसेनेत फायलीन वादळ, रामदास कदमांचा जोशींवर हल्लाबोल

Last Updated: Saturday, October 12, 2013, 15:27

शिवसेना नेते रामदास कदम यांनी मनोहर जोशींवर हल्लाबोल केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या वादाला मनोहर जोशी जबाबदार असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. जोशी सरांच्या टीकेमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोपही रामदास कदमांनी केला आहे.

फायलीन चक्रीवादळाचा वेग वाढलाय

Last Updated: Saturday, October 12, 2013, 09:50

फायलीन चक्रीवादळाचं काउंटडाऊन सुरु झाले आहे. फायलिनचा वेग आणखी वाढला आहे. हे वादळ ओडिशाच्या भोपालपूरपासून ३४५ किमी दूर आहे. आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हे वादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय.

फायलीन चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशला धोका

Last Updated: Friday, October 11, 2013, 15:58

फायलीन चक्रीवादळाचा वेग आणखीन वाढलाय. सध्या हे चक्रीवादळ पश्चिमोत्तर दिशेने पुढे जात असून, हे वादळ ओडिशातील पारादीपपासून ८५० किलोमीटरवर केंद्रीत आहे. उद्या रात्री हे वादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामानखात्यानं दिलीये.

अमेरिकेत ३२० ताशीचे चक्रीवादळ, २४ जणांचा मृत्यू

Last Updated: Wednesday, May 22, 2013, 09:38

अमेरिकेच्या ओक्लोहोमा शहरात चक्रीवादळाने थैमान घातले असून, या वादळाने २४ जणांचा बळी एका दिवसात घेतला आहे.

अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा

Last Updated: Monday, February 11, 2013, 17:14

अमेरिकेच्या ईशान्य भागात हिमवादळाच्या तडाख्यात ९ जणांना प्राण गमवावा लागला आहे. या भीषण वादळाने सुमारे ५० लाख घरांचा वीजपुरवठा खंडीत झाल्याने सर्वत्र अंधार झाला आहे.

`सॅण्डी` वादळानंतर `फिस्कल क्लिफ` वादळ लवकरच येणार?

Last Updated: Tuesday, December 25, 2012, 15:44

सॅण्डी वादळानंतर आता पुन्हा अमेरिकेवर फिस्कल क्लिफ नावाचे नवे वादळ घोंघावत आहे. हे वादळ मात्र नैसर्गिक नसून मानवनिर्मितच आहे.

‘सॅण्डी’ हा अमेरिकेला अल्लाचाच तडाखा -मौलवी

Last Updated: Saturday, November 03, 2012, 11:52

‘सॅण्डी’ या भयंकर वादळाचा अमेरिकेला बसलेल्या तडाख्यानंतर इजिप्तमधील मुल्ला मौलवींचे मत आहे. ‘सॅण्डी’ हा अमेरिकेला ‘अल्ला’ने दिलेला तडाखा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आंध्र,तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका

Last Updated: Tuesday, October 30, 2012, 20:54

जग सध्या वादळांच्या दहशतीच्या छायेत आहे. अमेरिकेत `सँडी` वादळानं थैमान घातलय. तर भारतातली आंध्र आणि तामिळनाडू ही राज्य नीलम या चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडण्याची चिन्ह आहेत.

'सँडी' वादळाने अमेरिकेत हाहाकार, १३ जणांचा मृत्यू

Last Updated: Tuesday, October 30, 2012, 14:24

'सॅंडी' चक्रीवादळाने अमेरिकेत हाहाकार माजवला आहे. १४४ किलोमीटर प्रतितास वेगाने धडकणारे हे वादळ काल आठ वाजता न्यूजर्सीच्या किना-यावर येऊन धडकले.

मृत्यूचं तूफान...

Last Updated: Monday, October 29, 2012, 21:15

जागतीक महासत्ता म्हणून मिरवणा-या अमेरिकेचं धाबं दणाणलेत...सगळ्या जगाला धाकात ठेवणारी अमेरिका घाबरलीय ती सँडी नावाच्या वादळाला...हे आस्मीनी संकट अमेरिकेच्या पूर्व भागात येवून थडकलं असून त्यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवलीय जातेय..सँडी हे गेल्या ७० वर्षातील सर्वात मोठं वादळ ठरण्याची शक्यता आहे.११०० किमीपेक्षा जास्त परिसरातला याचा तडाखा बसणार आहे...एव्हड्या मोठ्या संकटाचा अमेरिका कसा सामना करणार हा प्रश्न अवघ्या जगाला पडला आहे. काय आहे हे मृत्यूचं तूफान..

`सँडी`च्या दहशतीखाली अमेरिका

Last Updated: Monday, October 29, 2012, 11:49

येत्या काही तासांत अमेरिकेच्या किनारपट्टी भागात सॅन्डी वादळ धडकणार आहेत. या वादळाचे संकेत म्हणून तुफानी वारे वाहू लागलेत. तर समुद्रही खवळलाय. समुद्रात दैत्यकाय लाटा निर्माण झाल्यात.

खोपोलीला वादळाचा तडाखा

Last Updated: Sunday, October 28, 2012, 22:01

खोपोली परीसराला जोरदार पावसासह चक्री वादळाने झोडपून काढलं. चक्री वादळानं इंथल्या झेनिथ कंपनीचं प्रचंड नुकसान केलंय. तसचे नागरिकांच्या घरावरील पत्रे, कौले उडून गेल्यानं त्याचही मोठ नुकसान झालंय.

कोकणातील उध्वस्त कुटुंबांचा आक्रोश

Last Updated: Wednesday, August 08, 2012, 03:41

तीन वर्षांपूर्वी कोकणात झालेल्या फियान वादळाच्या आठवणी आजही कोकणात ताज्या आहेत. अनेकांचे बेपत्ता झालेले नातेवाईक आजही परतलेले नाहीत. ते परत येतील या एकाच आशेनं त्यांच्या पत्नी, मुलं वाटेकडे डोळे लावून बसलेत. शासनाच्या निकषामुळे ही कुटुंब मदतीपासून वंचित आहेत.

मृणाल गोरे यांच्याच शब्दात...

Last Updated: Wednesday, July 18, 2012, 06:39

मृणाल गोरे यांच्याच शब्दात...लग्न होऊन गोरेगावात आले तेव्हा इथे तर बाबुराव सामंतांच्या नेतृत्वाखाली समाजवादी विचारधारेचं बीज आधीच रुजलं होतं. सामंत आणि बंडू गोरे एकमेकांचे चांगलेच मित्र. त्यामुळे त्यांच्याबरोबर लगेचच इथल्या राजकारणात माझा प्रवेश झाला.

समाज हितासाठी लढणारे 'मृणाल' वादळ

Last Updated: Wednesday, July 18, 2012, 05:53

मृणालताईंचा स्वभाव, राजकीय सामाजिक कारकीर्द याविषयीच्या अनेक पैलूंना मान्यवरांनी उजाळा दिला. सामान्य माणसांच्या प्रश्नांची तड लावणे, त्यांना न्याय मिळवून देणे हेच ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांचे आयुष्य झाले होते. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली. त्यांच्या कार्याची माहिती असणारे आणि त्यांना जवळून पाहिलेल्यापैकी काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया. त्यांच्यात शब्दात..

पावसाळी अधिवेशन होणार वादळी

Last Updated: Sunday, July 08, 2012, 12:55

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रालय आगीचा मुद्दा उचलणार असल्याची घोषणा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केलीय. याबाबत स्थगन प्रस्ताव मांडला जाईल अशी माहिती खडसे यांनी दिली आहे. त्यामुळं विधिमंडळ अधिवेशनाच्या सुरूवातीला आगीचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.

अमेरिका अंधारात चाचपडतेय

Last Updated: Thursday, July 05, 2012, 10:39

जगावर राज्य करणारा देश असा तोरा मिरवणाऱ्या अमेरिकेला तुफान संकटामुळे अडचणीत यावे लागले. चक्क आपला स्वातंत्र्यदिन अंधारात साजरा करावा लागला तर काही ठिकाणचे कार्यक्रम रद्द करण्यात आलेत.

गेला 'मान्सून' कुणीकडे?

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 12:39

मान्सून गेला कुठे असा प्रश्न मुंबईकरांना पडलाय. रविवारी वन-डे खेळून मान्सून गायब झालाय. चीनमधल्या वादळामुळे मान्सूनवर परिणाम झाल्याचं बोललं जातंय.

अमेरिकेत वादळाचा तडाखा

Last Updated: Wednesday, April 04, 2012, 12:13

अमेरिकेतील उत्तर टेक्सासमध्ये आलेल्या दोन वादळांमुळे जबरदस्त नुकसान झाले आहे. या वादळाचा परिणाम विमानसेवेवर झाला आहे. त्यामुळे विमानसेवा विस्कळीत झाली आहे. दरम्यान, जीवित अथवा वित्तहानीचे वृत्त नाही.

काश्मीरमध्ये 'तुफान' तडाखा

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 10:28

जम्मू आणि काश्‍मीरमध्ये आलेल्या वादळाने जोरदार तडाखा दिला आहे. या वादळामुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. हजारो घरांचे नुकसान झाले आहे. या वादळाचा एक बळी गेला असून दोघे जण बेपत्ता आहेत. तसेच हिमकडा कोसल्याने पाच जण फसल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. खोऱ्यात वादळ कायम असल्याने शाळांना सुटी जाहीर कऱण्यात आली आहे.

मध्य अमेरिकेवर वादळी संकट

Last Updated: Saturday, March 03, 2012, 10:48

मध्य अमेरिकेमध्ये लागोपाठ आलेल्या ७० हून जास्त चक्रीवादळांमुळे आत्तापर्यंत कमीत कमी १४ जणांचा मृत्यू झालेला आहे. एवढंच नव्हे तर मेरिसविल हे शहर पूर्णपणे उध्वस्त झाले. चक्रीवादळाने केवळ घरंच उध्वस्त केली नाहीत, तर शाळा आणि दुकानंही जमीनदोस्त झाली आहेत.

'थेन'चे ४० बळी, तमिळनाडूत मुसळधार

Last Updated: Saturday, December 31, 2011, 07:44

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या शक्तिशाली 'थेन' चक्रीवादळाने चांगलाच दणका दिला आहे. सततचा पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता बळींचा आकडा ४० वर पोहचला आहे.

थेन चक्रीवादळाने घेतले अठरा बळी

Last Updated: Friday, December 30, 2011, 03:10

बंगालच्या उपसागरात आलेले 'थेन' चक्रीवादळ तामिळनाडूत घुसल्याने सहा जण ठार झाले आहेत. तामिळनाडूतील कडड्लोर आणि पॉंडेचरीमध्ये वादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पॉंडेचरीचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे.

आंध्र, तामिळनाडूला वादळाचा धोका

Last Updated: Thursday, December 29, 2011, 07:04

बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत जोरदार वादळ घुसण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासात तुफानी वादळाचा सामना करावा लागेल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

फिलिपिन्सला वादळासह पुराचा तडाखा

Last Updated: Tuesday, December 20, 2011, 11:33

दक्षिण फिलिपिन्समधील बेटांना वादळाचा जोरदार तडाखा बसल्याने एक हजारपेक्षा अधिक नागरिक मृत्यूमुखी पडल्याची भिती सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सिंधूदुर्ग किनारपट्टीला वादळाचा इशारा

Last Updated: Monday, November 28, 2011, 12:47

सिंधूदुर्गात किनारपट्टीत वादळाचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहे त्यामुळे येथील स्थानिक मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.