विधानभवन

अधिवेशन सरकारची डोकेदुखी वाढवणारे ठरले

अधिवेशन सरकारची डोकेदुखी वाढवणारे ठरले

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तीन आठवडे चाललं. या अधिवेशनात सरकारची चुकलेली रणनीती आणि ढिसाळपणामुळे विरोधकही अधिवेशनावर विशेष प्रभाव पाडू शकले नाहीत. अधिवेशनाच्या आदल्या दिवशीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विसंवाद निर्माण झाला होता. मात्र त्यांनी हा विसंवाद बाजूला सारून सरकारला अडचणीत आणण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. 

Aug 11, 2017, 06:41 PM IST
आम्हालाच आता लाज वाटायला लागली - धनंजय मुंडे

आम्हालाच आता लाज वाटायला लागली - धनंजय मुंडे

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाईच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आज शेवटच्या दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.

Aug 11, 2017, 06:31 PM IST
महागड्या गाडीतून विधानभवनात आलेल्या आमदाराने पत्रकारांना पाहून घेतला यूटर्न

महागड्या गाडीतून विधानभवनात आलेल्या आमदाराने पत्रकारांना पाहून घेतला यूटर्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या नेत्यांना साधं राहणीमान ठेवण्यास सांगतात. पण महाराष्ट्रातील भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी सगळ्यांना तेव्हा हैराण केलं जेव्हा ते त्यांची अलीशान लँबोर्गिनी कार घेऊन विधानसभेत पोहोचले. या कारची किंमत जवळपास ५.५ कोटी आहे. नारंगी रंगांची ही लँबोर्गिनी घेऊन जेव्हा आमदार मेहता हे विधानसभेत पोहोचले तेव्हा पत्रकारांनी त्यांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यास सुरुवात केली. त्यानंतर आमदार मेहता यांनी पत्रकारांना पाहून यूटर्न घेतला आणि विधानसभेत जाण्याऐवजी तेथून निघून गेले.

Apr 7, 2017, 06:38 PM IST
वेगळ्या विदर्भाची मागणी हा जनतेचा आवाज - नाना पटोले

वेगळ्या विदर्भाची मागणी हा जनतेचा आवाज - नाना पटोले

वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव खासदार नाना पटोलेंनी लोकसभेत मांडला आणि त्याचे पडसाद राज्यात उमटले. दरम्यान स्वतंत्र विदर्भाची मागणी ही विदर्भातल्या सामान्य जतनेचा आवाज असल्याचं, नाना पटोलेंनी म्हंटलंय. 

Jul 30, 2016, 08:21 AM IST
पवारांचा वाढदिवस महत्त्वाचा... शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं काय?

पवारांचा वाढदिवस महत्त्वाचा... शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं काय?

शरद पवार यांच्या पंच्चाहत्तरी निमित्त दिल्लीत मोठा कार्यक्रम होतोय. त्याचे पडसाद नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उमटणार आहेत. 

Dec 10, 2015, 10:26 AM IST
भाजप आमदारांना दर तासाला म्हणावं लागेल 'हजर'!

भाजप आमदारांना दर तासाला म्हणावं लागेल 'हजर'!

राज्यातल्या भाजपा आमदारांना आता विधीमंडळात दर तासाला हजेरी द्यावी लागणार आहे. 

Jul 16, 2015, 03:39 PM IST

विधानभवनातील सीसीटीव्ही बिनकामाचे...

सचिन सूर्यवंशी मारहाण प्रकरणात विधान भवनातील सीसीटीव्ही कॅमेरात या मारहाणीचं स्पष्ट रेकॉर्डिंग झालीच नसल्याची माहिती आता पुढे आल्यानंतर आता चर्चा सुरू झालीय विधानभवनातील सीसीटीव्हींची...

Mar 30, 2013, 09:32 AM IST

मी पोलिसाला मारले नाही- राम कदम

मनसे हा नेहमी पोलिसांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. मनसे पक्षाचे ‘संस्कार’ माझ्यावर आहेत, मी पोलिस अधिकाऱ्यावर अजिबात हात उचलला नाही. उलट त्याने दिलेल्या धक्क्यामुळे मी जमिनीवर कोसळलो, असल्याचे स्पष्टीकरण मनसेचे आमदार राम कदम यांनी आज दिले.

Mar 19, 2013, 08:14 PM IST

दोषी असेन, तर मी राजीनामा देईन- क्षितिज ठाकूर

विधानभवन परिसरात पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण करणारे आमदार क्षितीज ठाकुर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. आपल्याकडील मोबाइल फुटेज आणि सीडी पत्रकारांकडे सुपुर्त करत सर्व प्रकरणाची जबाबदारी स्वतःवर घेतली.

Mar 19, 2013, 08:14 PM IST

का मारलं आमदारांनी पोलीस निरीक्षकांना?

आमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे. त्यामुळे यात पोलीस निरिक्षक सचिन सूर्यवंशी जखमी झाले आहेत.

Mar 19, 2013, 05:50 PM IST

आमदार विरुद्ध पोलीस; अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

विधानभवनाच्या परिसरात पोलीस अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या घटनेचा सर्वच पक्षांनी केलाय. परंतू, आमदार विरुद्ध पोलीस संघर्ष शिगेला पोहचल्याचं चित्र सध्या विधानभवनाबाहेर दिसून येतंय.

Mar 19, 2013, 04:45 PM IST

वाळू माफियांना ‘मोक्का’ लागणार?

राज्यात वाळू माफियांवर कायमची जरब बसवण्यासाठी त्यांच्यावर `मोक्का` लावण्याची मागणी विरोधकांनी विधान परिषदेत लाऊन धरलीय.

Mar 19, 2013, 08:49 AM IST

आपण काहीच शिकणार नाही ?

मंत्रालयातल्या अग्नितांडवानंतर राज्य सरकार खडबडून जागं झालंय. अनेक महत्वाच्या सरकारी इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणाच नसल्याचं धक्कादायक वास्तव मंत्रालयातल्या आगीनंतर समोर आलंय. नागपुरातील मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या विधानभवन परिसरातल्या इमारतीही याला अपवाद नाहीत.

Jun 28, 2012, 11:11 AM IST

मिनीमंत्रालयातील धक्कादायक वास्तव

मंत्रालयातल्या अग्नितांडवानंतर राज्य सरकार खडबडून जागं झालंय.. अनेक महत्वाच्या सरकारी इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणाच नसल्याचं धक्कादायक वास्तव मंत्रालयातल्या आगीनंतर समोर आले आहे. नागपुरातील मिनीमंत्रालय समजल्या जाणा-या विधानभवन परिसरातल्या इमारतीही याला अपवाद नाहीत.

Jun 28, 2012, 10:54 AM IST