विरोधकांचा गोंधळ

गोव्याच्या मुद्द्यावरुन राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ

गोव्याच्या मुद्द्यावरुन राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ

गोव्यामध्ये १३ जागा जिंकणाऱ्या भाजपने दुसऱ्या स्थानावर असूनही राज्यात सरकार स्थापन केलं. या मुद्द्यावरुन राज्यसभेत चांगलाच गोंधळ झाला. काँग्रेसने आरोप केले आहेत की, निकाल आल्यानंतर भाजपने पैशाचा वापर केला आणि बहुमत मिळवलं. काँग्रेस नेत्यांनी याला लोकशाहीची हत्या असल्याचं म्हटलं आहे.

Mar 17, 2017, 12:34 PM IST
दोन्ही सभागृहात विरोधकांचा गोंधळ, जेटलींनी विरोधकांना धरलं धारेवर

दोन्ही सभागृहात विरोधकांचा गोंधळ, जेटलींनी विरोधकांना धरलं धारेवर

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या आठवड्याची सुरूवातही गोंधळातच झाली. नोटाबंदीच्या मुद्यावरून विरोधकांनी गोंधळ कायम ठेवल्यानं दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय. अधिवेशनाच्या कामकाजाचा सलग चौथा दिवस पाण्यात गेला आहे.

Nov 21, 2016, 03:57 PM IST
उद्धव ठाकरेंच्या ‘महापालिका’ एंट्रीवर विरोधकांचा गोंधळ!

उद्धव ठाकरेंच्या ‘महापालिका’ एंट्रीवर विरोधकांचा गोंधळ!

मुंबई महापालिकेत महापौर निवडीदरम्यान विरोधकांनी गोंधळ घातला. महापौरपदी निवडून आलेल्या स्नेहल आंबेकर यांचं अभिनंदन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभागृहात आले.

Sep 9, 2014, 03:42 PM IST

लोकसभेचे कामकाज स्थगित

संसदेचे आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले. मात्र, काही मिनिटातच ते स्थगित करण्यात आले आहे. या अधिवेशनात आसाममधील हिंसाचाराचे पडसाद उमटले.

Aug 8, 2012, 11:42 PM IST

माथाडींच्या घराचा प्रश्न: विरोधकांचा गोंधळ

माथाडी कामगारांच्या घराच्या प्रश्नावरुन मंगळवारी विधानसभेत विरोधकांनी गदारोळ घातला. घराबाबत मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन द्यावं, अशी मागणी विरोधक आणि सत्ताधारी आमदारांनी केली. या प्रश्नावरुन विधानसभेचं कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं.

Jul 10, 2012, 01:50 PM IST

लोकसभेतील गोंधळाने कोट्यवधींचा चुराडा

संसदेत होणा-या गदारोळामुळं जनतेच्या पैशाचा मोठा चुराडा होत आहे. याचे विरोधकांसह खासदारांना देणे घेणे नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Dec 1, 2011, 06:22 AM IST

'रिटेल'मुळे विरोधक 'नॉट सेटल', संसदेत गोंधळ

संसदेत रिटेलच्या मुद्द्यावरून विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज हे दुपारी १२ वाजेपर्य़ंत तहकूब करण्यात आलं आहे. रिटेलच्या मुद्द्यावर थेट परदेशी गुंतवणूक करण्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

Nov 28, 2011, 06:00 AM IST